Telegram Channel Earning:- सध्या सोशल मीडियाचा वापर हा फार मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जगभरात केला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणावर फेसबुक तसेच व्हाट्सअप आणि युट्युब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खूप प्रसिद्ध आणि लोकांच्या पसंतीचे आहेत.
यामध्ये आपल्याला माहित आहे की युट्युब आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर माहितीचा खजिना उपलब्ध होतोच. परंतु त्यासोबत पैसे कमावण्याची संधी देखील मिळते. या सोशल मीडियामध्ये जर आपण पाहिले तर या सगळ्या प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त टेलिग्राम हे देखील लोकांच्या खूप आवडीचे असे प्लॅटफॉर्म असून

या telegram चॅनेल च्या माध्यमातून देखील आता टेलीग्राम वापरकर्त्यांना पैसे कमवण्याची संधी उपलब्ध होणार आहे व या संबंधीची महत्त्वाची माहिती कंपनीचे फाउंडर सीईओ पावेल डूरोव्ह यांनी दिली आहे.
काय सांगितले कंपनीचे फाउंडर सीईओ पावेल डूरोव्ह यांनी?
त्यांनी म्हटले की कंपनीच्या माध्यमातून लवकरच एक ऍड प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात येणार असून साधारणपणे पुढील महिन्यामध्ये हा ऍड प्लॅटफॉर्म लॉन्च झाल्यानंतर telegram चॅनल ओनर्सना स्वतःचा कंटेंट आता या टेलिग्राम चैनल वर मॉनिटाइज करता येणार असल्यामुळे या चॅनलमध्ये जाहिराती दाखवून
त्या माध्यमातून मिळणाऱ्या पन्नास टक्के नफा हा चॅनलच्या मालकांना मिळणार आहे. जे कोणी टेलिग्राम चॅनेलचे मालक असतील त्यांना त्यांच्या मॉनिटाइज झालेल्या कंन्टेन्टकरिता रिवार्ड मिळणारा आहेत व हे रिवार्ड टोनकॉइनच्या स्वरूपामध्ये असणार आहेत.
टॉन हे ब्लॉकचेनवर असणारे एक क्रिपटोकरन्सीचे नाव आहे. यामध्ये आता जाहिरातींच्या माध्यमातून टेलिग्रामला जे पैसे मिळतील त्यातील 50% पैसे कंपनी चॅनलच्या मालकांना देणार आहे.
जगातील शंभर देशांमध्ये सुरू होणार ही सुविधा
सध्या जर आपण टेलीग्राम या प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या चॅनेलचा विचार केला तर त्या सर्व चॅनल्सवर महिन्याला मिळून तब्बल एक ट्रिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज जनरेट होतात. परंतु यामध्ये केवळ दहा टक्के मॉनिटाईज करण्यात आलेले आहेत.
हे टेलिग्राम एड्स प्रमोशन टूल च्या साह्याने करण्यात आले असून मार्चमध्ये लॉन्च होणाऱ्या या टेलिग्राम ऍड प्लॅटफॉर्ममुळे जवळपास शंभर देशातील चॅनेल मालकांना आता पैसे कमवण्याची नामी संधी मिळणार आहे. तसेच याबाबतचा रेव्हेन्यू कसा प्रकारे शेअरिंग केला जाईल?
त्यासंबंधीचा क्रायटेरिया काय असेल व मॉनिटायझेशनचे नियम कशा पद्धतीचे असतील इत्यादी गोष्टींची माहिती लवकरच देणार असल्याचे देखील पावेल यांनी सांगितले.