मोठी बातमी : Apple चे स्मार्टफोनसंदर्भात वॉटरप्रूफिंगचे दावे खोटे असल्याचा आरोप; 1.2 करोड़ डॉलरचा दंड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :- इटलीच्या एंटी-ट्रस्ट अथॉरिटी AGCM ने Apple ला 10 मिलियन युरो (सुमारे 12 मिलियन डॉलर्स) दंड केला आहे. कंपनीच्या आयफोनच्या वाटर रेजिस्टेंस क्षमतेबाबत दिशाभूल करणारे किंवा चुकीचे दावे केल्याबद्दल हा दंड आकारण्यात आला आहे.

इटलीच्या प्रतिस्पर्धा प्राधिकरणाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की प्रीमियम स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने त्यांच्या आयफोनला वॉटर रेसिस्टन्स किंवा वॉटरप्रूफ असल्याची जाहिरात केली, पण हे पाण्यापासून होणारे संरक्षण कोणत्या परिस्थितीत होते हे स्पष्ट केले नव्हते.

apple च्या वॉटरप्रूफ असल्याच्या दाव्यावर टीका करीत एजीसीएमने म्हटले आहे की हे दावे काही विशिष्ट परिस्थितीतच खरे आहेत. Apple ने असा दावा केला आहे की त्याचे वेगवेगळे आयफोन मॉडेल चार मीटरपर्यंत खोलीत 30 मिनिटांसाठी रेजिस्टेंट अर्थात वाटरप्रूफ आहेत.

केवळ काही स्थितींमध्येच फोन वॉटरप्रूफ

शुद्ध व स्थिर पाणी वापरणार्‍या लॅबमध्ये घेण्यात आलेल्या विशेष आणि नियंत्रित चाचण्यासारख्या विशिष्ट परिस्थितीतच हे मॉडेल वॉटरप्रूफ असल्याचे दिसून आले. ग्राहक सामान्यतः फोन वापरतात अशा सामान्य परिस्थितीत ते खरे असल्याचे आढळले नाहीत.

एसीजीएमने निवेदनात म्हटले आहे की Apple चा डिस्कलेमर लोकांना फसवत आहे कारण त्यात असे म्हटले आहे की पाण्यामुळे नुकसान झाल्यास आयफोनला वॉरंटी मिळणार नाही. नियामक म्हणाले की ग्राहकांना या संदर्भात कोणतीही माहिती दिली गेली नव्हती आणि त्यांच्या स्मार्टफोनमध्ये पाणी किंवा इतर द्रव्यांमुळे नुकसान झाले तेव्हा Apple ने त्यांना वॉरंटी कव्हर दिले नाही.

प्रथम अमेरिकेतही दंड ठोठावण्यात आला होता

यापूर्वी नोव्हेंबरमध्ये Apple ला 11.3 करोड़ डॉलर (838.95 करोड़ रुपये) दंड करण्यात आला होता. हा दंड अमेरिकेची 33 राज्ये आणि कोलंबिया जिल्ह्याने लावलेल्या आरोपावर केला आहे. बॅटरीशी संबंधित समस्या लपविण्यासाठी जुन्या आयफोनची गती कमी करण्याचा कंपनीवर आरोप आहे, जेणेकरुन वापरकर्ते नवीन डिव्हाइस खरेदी करतील.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment