मोठी बातमी : पुढील वर्षापासून फोनवर बोलणे ‘इतके’ महागणार ; वाचा सविस्तर…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-व्होडाफोन आयडिया पुढील वर्षाच्या म्हणजे 2021 पासून त्याच्या दरांच्या किंमतीत 15-20% वाढ करणार आहे. कंपनीला अजूनही बरेच नुकसान सहन करावे लागत आहे, म्हणून कंपनी आपले नुकसान भरून काढण्यासाठी दर वाढवू शकते. त्याचबरोबर भारती एअरटेल देखील व्होडाफोन-आयडिया सारखे दर वाढवू शकते.

तथापि, या दोन्ही कंपन्यांचे त्यांच्या प्रतिस्पर्धी रिलायन्सवर विशेष लक्ष असेल आणि त्यानुसार अन्य कंपन्याही दरांच्या किंमती बदलतील.

यापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये किंमती वाढविण्यात आल्या :- एका व्यक्तीने सांगितले की, आता दूरसंचार कंपन्या फ्लोर प्राइस फिक्स करण्यासाठी नियामकाची वाट पाहतील. गोष्ट अशी आहे की कंपन्या त्यांचे टॅरिफ दर जवळपास 25 टक्क्यांनी वाढवू शकतात, परंतु एकाच वेळी इतकी वाढ करणे फार कठीण आहे. यापूर्वी देशातील या तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी डिसेंबर 2019 मध्ये टॅरिफ दर वाढविले होते.

या कंपन्या किती पैसे कमवत आहेत ? :- व्होडाफोन-आयडियाचे एमडी रवींदर टक्कर यांनी असेही म्हटले आहे की सध्या अस्तित्त्वात असलेल्या किंमती टिकणार नाहीत आणि किंमती वाढतील. इतर स्पर्धक देखील किंमती वाढवतील अशी त्यांची आशा आहे. दुसर्‍या तिमाहीच्या निकालानंतर टक्कर म्हणाले होती की, डेटासाठी फ्लोर प्राइस निर्णयाची प्रतीक्षा करता येणार नाही आणि दर वाढतील. तथापि, ते म्हणाले की किंमती वाढवण्याची वेळ योग्य आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. ते म्हणाले की हे निश्चित शुल्क दर लवकरच वाढेल. व्होडाफोन सध्या प्रति यूजर 119 रुपये, एअरटेल 162 रुपये आणि रिलायन्स जिओ 145 रुपये प्रति यूजर कमाई करीत आहेत.

व्होडाफोन-आयडियाला सतावतेय ही भीती:-  तज्ज्ञांचे म्हणणे आहे की व्होडाफोनला आता टॅरिफचे दर वाढवणे फार महत्वाचे आहे, कारण लवकरच एजीआर हप्ता भरणे आवश्यक आहे. व्होडाफोनला 4 जी नेटवर्क मजबूत करण्यासाठी देखील गुंतवणूक करायची आहे, ज्यासाठी निधी आवश्यक आहे. तथापि, व्होडाफोनला भीती आहे की, एअरटेल आणि रिलायन्स जिओने दर वाढविले नाही तर कंपनीचे विद्यमान ग्राहक इतर कंपन्यांकडे जातील.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment