Sarkari Yojana: केंद्र सरकार तरुणांना देणार 66 हजार रुपये! वाचा काय आहे सरकारची योजना? काय लागते पात्रता?

केंद्र सरकारने गुरुवारी पथदर्शक तत्त्वावर पंतप्रधान इंटर्नशीप योजना सुरू केली असून  या योजनेमध्ये ज्या विद्यार्थ्यांची किंवा ज्या तरुणांची निवड होईल त्यांना वर्षभर पाच हजार रुपयांचे महिन्याला अर्थसहाय्य दिले जाणार आहे व याशिवाय इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्याकरिता एक रकमी 6 हजार रुपये दिले जातील.

Ajay Patil
Published:
scheme for youth

Sarkari Yojana: भारतासमोर आज ज्या काही समस्या असतील त्यामध्ये सगळ्यात गंभीर आणि ज्वलंत समस्या असेल तर ती म्हणजे बेरोजगारी ही होय. दरवर्षी पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्यांची जर आपण संख्या पाहिली तर ती मोठ्या प्रमाणावर आहे.

परंतु त्या मानाने उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांची संख्या नगण्य असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगार तरुण-तरुणींची संख्या आपल्याला दरवर्षी वाढताना दिसून येत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारची पावले उचलण्यात येत असून तरुणांना रोजगार मिळावा व रोजगारासाठी ते पात्र व्हावेत याकरिता देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे प्लॅनिंग केल्या जात असून

त्याचाच भाग म्हणून केंद्र सरकारने गुरुवारी पथदर्शक तत्त्वावर पंतप्रधान इंटर्नशीप योजना सुरू केली असून  या योजनेमध्ये ज्या विद्यार्थ्यांची किंवा ज्या तरुणांची निवड होईल त्यांना वर्षभर पाच हजार रुपयांचे महिन्याला अर्थसहाय्य दिले जाणार आहे व याशिवाय इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्याकरिता एक रकमी 6 हजार रुपये दिले जातील. म्हणजेच याप्रकारे एकूण 66 हजार रुपयांची मदत अशा तरुणांना मिळणार आहे.

 सरकार देणार तरुणांना 66 हजार रुपये

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तरुणांना रोजगारासाठी पात्र बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने गुरुवारी एक पथदर्शक तत्वावर पंतप्रधान इंटर्नशीप योजना सुरू केली व या योजनेत ज्या तरुणांची निवड होईल त्यांना वर्षभर पाच हजार रुपयांचे मासिक अर्थसाह्य दिले जाणार आहे

व याशिवाय इंटर्नशीपमध्ये सहभागी होण्याकरिता एकरकमी 6000 रुपये देखील दिले जाणार असून अशाप्रकारे एकूण 66 हजार रुपयांची मदत अशा तरुणांना सरकार करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षांमध्ये जवळपास 1.25 लाख इंटर्नशीपच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून याकरिता आठशे कोटी रुपये खर्च होणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून पाच वर्षात एक कोटी तरुणांना देशातील सर्वांच्च असलेल्या 500 कंपन्यांत प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे व विविध व्यावसायिक वातावरणात बारा महिने कामाची कौशल्य शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

 काय आहे पंतप्रधान इंटरर्नशीप योजनेसाठीची पात्रता?

यामध्ये प्रशिक्षणार्थींना मिळणाऱ्या मासिक अर्थसाह्यापैकी चार हजार पाचशे रुपये सरकार उमेदवारांच्या खात्यात जमा करेल व पाचशे रुपये संबंधित कंपनी सीएसआर कोशातून अदा करणार आहे.

नोकरी न करणारे तसेच शिक्षण घेत नसलेले 21 ते 24 या वयोगटातील युवक या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत. यासाठी शैक्षणिक अट दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पॉलिटेक्निक डिप्लोमा तसेच बीए, बीएससी, बीकॉम, बीसीए, बीबीए तसेच बी फार्मा इत्यादी पदवीधारक यासाठी पात्र असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe