… तर पेट्रोल पोहोचेल 100 रुपयांवर !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- दोन वर्षांच्या विक्रमी दराने विकत असलेले पेट्रोल-डिझेल आणखी महाग होऊ शकते. तज्ञांच्या मते, केंद्र किंवा राज्य सरकारांनी पेट्रोल-डिझेलवर कर कमी केले नाहीत तर पुढील दोन महिन्यांत पेट्रोलचे दर १०० रु./लिटरवर जातील.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या (क्रूड) दरात झालेली वाढ हे त्याचे कारण आहे. ऑक्टोबरमध्ये क्रूडचा सरासरी दर ३५.७९ डॉलर प्रति बॅरल होता, तो नोव्हेंबरमध्ये वाढून ४५.३४ डॉलर प्रति बॅरल झाला. म्हणजे एक महिन्यात क्रूडच्या दरात २६.६८% वाढ झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शेल क्रूडचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले होते.

त्यामुळे अमेरिका कच्च्या तेलाचा आयातदार होण्याऐवजी निर्यातदार झाला. आता नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी हे प्रोत्साहन देणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे अमेरिका पुन्हा आयातदार होईल. कोरोना लस तयार झाल्यानंतर आर्थिक घडामोडी वाढतील. त्यामुळे क्रूडच्या मागणीत वाढ होऊन दरही वाढतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment