जगात प्रचंड मागणी आहे ‘या’ प्रॉडक्टला! सुरू कराल हा व्यवसाय तर आयुष्यभर खेळाल लाखो रुपयात; जाणून घ्या माहिती

व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील पैशांची आवश्यकता भासते. त्यामुळे प्रत्येक जण कमीत कमी भांडवलामध्ये चांगला नफा देऊ शकेल अशा व्यवसायाच्या शोधात असतात. अशा प्रकारचे अनेक व्यवसाय आपल्याला सांगता येतील. त्यातीलच एक व्यवसाय म्हणजे पेपर नॅपकिन म्हणजेच टिशू पेपर बनवण्याचा व्यवसाय होय.

Ajay Patil
Published:
business idea

Profitable Business Idea:- नोकऱ्यांची उपलब्धता कमी असल्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करणे ही आता काळाची गरज आहे व त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर तरुणाई व्यवसायांकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत. व्यवसाय करायचे म्हटले म्हणजे आपल्याला अनेक प्रकारचे व्यवसाय हे करता येतात.

परंतु व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील पैशांची आवश्यकता भासते. त्यामुळे प्रत्येक जण कमीत कमी भांडवलामध्ये चांगला नफा देऊ शकेल अशा व्यवसायाच्या शोधात असतात. अशा प्रकारचे अनेक व्यवसाय आपल्याला सांगता येतील. त्यातीलच एक व्यवसाय म्हणजे पेपर नॅपकिन म्हणजेच टिशू पेपर बनवण्याचा व्यवसाय होय.

तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर याकरिता भांडवल तर कमी लागतेच. परंतु या माध्यमातून आयुष्यभर मोठ्या प्रमाणात पैसा कमावता येतो. आपल्याला माहित आहे की आजकालच्या कालावधीमध्ये टिशू पेपरला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

आधुनिक जीवनशैलीमध्ये हात आणि तोंड स्वच्छ करण्याकरिता प्रामुख्याने टिशू पेपरचा वापर केला जातो. रेस्टॉरंट असो किंवा हॉटेल तसेच ऑफिसेस व हॉस्पिटलमध्ये आता सर्वत्र टिशू पेपरचा वापर केला जातो.

टिशू पेपरचा व्यवसायासाठी किती गुंतवणूक करावी लागते?
तुम्हाला जर पेपर नॅपकिन म्हणजे टिशू पेपरचे उत्पादन युनिट उभारायचे असेल तर त्याकरता तुम्हाला जास्तीत जास्त साडेतीन लाख रुपयांची व्यवस्था करावी लागेल. तसेच तुम्ही सरकारच्या मुद्रा योजनेच्या माध्यमातून देखील या व्यवसाय करता कोणत्याही बँकेत कर्जाकरता अर्ज करू शकतात.

समजा तुमच्याकडे जर साडेतीन लाख रुपयांचे भांडवल असेल तर तुम्हाला बँकेकडून अंदाजे तीन लाख दहा हजार रुपये मुदत कर्ज दिले जाते व पाच लाख तीस हजार रुपयांचे खेळते भांडवल म्हणून कर्ज मिळते.अशा पद्धतीने तुम्ही टिशू पेपर युनिट उभारण्यासाठी पैशांची व्यवस्था करू शकतात.

टिशू पेपर व्यवसायातून किती कमाई करता येऊ शकते?
जर तुम्ही टिशू पेपर अर्थात पेपर नॅपकिन्स बनवण्याचा व्यवसाय उभारला तर तुम्ही एका वर्षामध्ये साधारणपणे एक लाख 50 हजार किलो पेपर नॅपकीन तयार करू शकतात.

आजचे बाजारपेठेतील जर टिशू पेपरचे रेट पाहिले तर ते 65 रुपये प्रति किलो इतके आहेत. या पद्धतीने जर तुम्ही बघितले तर एका वर्षाला तुम्ही 97.50 लाख रुपयांची उलाढाल या व्यवसायातून करू शकतात व सर्व खर्च वजा जाता तुम्हाला वर्षाला दहा ते बारा लाख रुपयांची बचत करता येऊ शकते.

विक्री व्यवस्था जर बघितली तर तुम्ही तुमचे पेपर नॅपकिन्स विक्रीकरिता बहुराष्ट्रीय कंपन्यांशी करार करू शकतात. अशाप्रकारे तुम्ही खर्च वजा जाता एका महिन्यात एक लाख रुपयापर्यंत निव्वळ नफा मिळवू शकतात.

मुद्रा योजना ठरेल फायद्याची
हा व्यवसाय उभा करण्यासाठी तुम्ही पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत कुठल्याही बँकेमध्ये कर्जाकरिता अर्ज करू शकतात. यामध्ये तुम्हाला या योजनेचा एक फॉर्म भरावा लागतो व त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण तपशील द्यावा लागतो.

आपल्याला माहित आहे की मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कुठल्याही तारणाची आवश्यकता नसते किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रोसेसिंग फी देखील द्यावी लागत नाही. या योजनेमधून मिळालेले कर्ज तुम्ही सुलभ हप्त्यांमध्ये परतफेड करू शकतात.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe