1 जानेवारी 2025 पासून होणारे ‘हे’ 5 मोठे बदल! सर्वसामान्यांच्या खिशावर होईल मोठा परिणाम

आपल्याला माहित आहे की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले काही बदल केले जातात व तसेच बदल 2025 या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक जानेवारी रोजी केले जातील अशी एक शक्यता आहे.

Ajay Patil
Published:
financial rule

Some Changes In January 2025:- आपल्याला माहित आहे की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले काही बदल केले जातात व तसेच बदल 2025 या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक जानेवारी रोजी केले जातील अशी एक शक्यता आहे.

जानेवारी महिन्याच्या या पहिल्या दिवसापासून अनेक नियमांमध्ये बदल होऊ शकतात व त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. त्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून जर बघितले तर नेमके हे बदल कोणते होतील किंवा होऊ शकतात? हे माहीत असणे तितकेच गरजेचे आहे.

एक जानेवारीपासून होऊ शकतात हे महत्त्वाचे बदल

1- गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ- जानेवारी 2025 पासून गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर आहेत. मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे गॅस सिलेंडरच्या किमती पुन्हा वाढू शकतात.

खास करून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य व्यक्तीच्या विशेषता गॅस सिलेंडर वापरणाऱ्या कुटुंबाच्या बजेटवर या निमित्ताने आर्थिक ताण येऊन बजेट विस्कटू शकतो.

2- मुदत ठेव योजनांच्या नियमांमध्ये होईल बदल- तुम्ही मुदत ठेव मध्ये गुंतवणूक केल्यास जानेवारीपासून रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नवीन नियम याकरिता लागू होऊ शकतात. जर हे नियम लागू झाले तर त्यानुसार एफडीच्या प्रक्रियेत आणि अटींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे व हे बदल तुमच्या गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे असू शकतात.

जर अशा प्रकारचे बदल झाले तर तुम्ही तुमची गुंतवणूक योजना वेळेत समजून घेऊन आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने नवीन नियमांच्या बाबत आधीच माहिती दिली आहे. जेणेकरून गुंतवणूकदार त्यांनी निवडलेल्या योजनेत बदल करू शकतील किंवा योजना निवडताना योग्य प्रकारे निवडू शकतील.

3- यूपीआय 123 पे व्यवहार लिमिट- फिचर फोन वापरकर्त्यांसाठी युपीआय 123 पे सुविधा प्रदान करण्यात आली आहे व ज्यामुळे डिजिटल पेमेंट करणे सोपे होते. जानेवारीपासून या सुविधेत काही बदल होऊ शकतात. रिझर्व बँक ऑफ इंडियाने यूपीआय 123 पे ची व्यवहार मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.

सध्या ही मर्यादा 5000 पर्यंत आहे व जर ही मर्यादा वाढवण्यात आली तर दहा हजार पर्यंत पेमेंट करण्याची मुभा या माध्यमातून मिळू शकते. फीचर फोन वापरणाऱ्या डिजिटल पेमेंट करू इच्छिणाऱ्या युजरसाठी हा बदल फायद्याचा ठरणार आहे.

4- शेतकऱ्यांना हमी शिवाय मिळेल इतके कर्ज- कर्जाशी संबंधित काही नवीन नियम जानेवारीपासून लागू होण्याची शक्यता आहे व विशेषतः शेतकऱ्यांना आता कुठल्याही तारणाशिवाय कर्ज मिळण्याची सोय उपलब्ध होणार आहे. सध्या शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतचे कर्ज कुठल्याही हमी शिवाय मिळते.

परंतु आता दोन लाख रुपयापर्यंत लिमिट वाढण्याची शक्यता असून दोन लाख रुपयापर्यंत कर्ज आता शेतकऱ्यांना कुठल्याही हमीशिवाय मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्जाच्या स्वरूपात जास्त रक्कम मिळू शकते व ती त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

5- शेअर बाजाराच्या नियमांमध्ये बदल- शेअर बाजाराशी संबंधित काही महत्त्वाचे नियम जानेवारीपासून बदलण्याची शक्यता आहे. विशेषतः सेन्सेक्स 50, सेन्सेक्स आणि सेन्सेक्स निर्देशांकाच्या मासिक कालबाह्यतेमध्ये बदल होऊ शकतात.

नवीन नियमानुसार प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवार ऐवजी मंगळवारी एक्सपायरी होईल. या व्यतिरिक्त दर तिसऱ्या आणि सहाव्या महिन्याचे करार शेवटच्या मंगळवारी संपतील. हे बदल व्यापाराच्या गतीत बदल घडवून आणतील आणि गुंतवणूकदारांकडून नवीन धोरणे याकरता आवश्यक असतील.

6- ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता- जानेवारी 2025 पासून कर दरांमध्ये काही बदल केले जाऊ शकतात व त्यामुळे ग्राहकपयोगी वस्तूंच्या किमती वाढू शकतात.

त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. वस्तूच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडण्याची शक्यता असून या बदलामुळे सर्वसामान्यांना त्यांच्या आर्थिक बजेटमध्ये नव्याने नियोजन करावे लागू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe