माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ‘या’ महिलांना मिळणार 4500 रुपये! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

ळगाव येथील दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी नवीन माहिती दिली व त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करतील अशा महिलांना तीन हफ्त्यांचे म्हणजेच एकूण चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत.

Ajay Patil
Published:
majhi ladki bahin yojana

मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातून महिलांच्या माध्यमातून खूप मोठा प्रतिसाद मिळालेला असून आतापर्यंत संपूर्ण राज्यात एक कोटी चाळीस लाख महिलांची नोंदणी पूर्ण झालेली आहे.

या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची घोषणा केली व या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.

या योजनेचा पहिला हप्ता हा 17 ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनाच्या आधी दिला जाणार असून यासाठीची जय्यत तयारी देखील प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच या सगळ्या परिस्थितीमध्ये लाडक्या बहिणींना भेटण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दौरा सुरू करण्यात आलेला

असून काल म्हणजेच मंगळवारी जळगाव जिल्ह्यातून पहिल्या दौऱ्याला सुरुवात करण्यात आलेली आहे. या दौऱ्या दरम्यान या योजनेच्या पहिल्या हप्त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली व ती निश्चितच महिलांसाठी महत्त्वाची आहे.

 या महिलांच्या खात्यात जमा होणार 4500 रुपये

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पहिला हप्ता जमा केला जाणार आहे व त्यासाठीची तयारी देखील जोरात सुरू आहे.

अशा परिस्थितीमध्ये लाडक्या बहिणींना भेटण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दौरा सुरू असून काल जळगाव जिल्ह्यातून पहिल्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे व या दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्या संदर्भात एक मोठी घोषणा केली.

या योजनेमध्ये आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख महिलांची नोंदणी पूर्ण झालेली आहे व पहिला हप्ता जमा व्हायला फक्त आता दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत. याप्रसंगी जळगाव येथील दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी नवीन माहिती दिली व त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करतील अशा महिलांना तीन हफ्त्यांचे म्हणजेच एकूण चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत.

म्हणजेच या योजनेअंतर्गत 31 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. परंतु या योजनेची सुरुवात मुळातच जुलै महिन्यापासून करण्यात आलेली आहे  व त्यानंतर 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली होती.

अशा परिस्थितीमध्ये ज्या महिलांनी जुलै महिन्यात किंवा 17 ऑगस्ट पूर्वी अर्ज केलेला आहे त्यांना दोन हप्त्याचे पैसे म्हणजेच तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळणार आहे. तर ज्या महिला 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करतील त्यांना सप्टेंबर महिन्यात जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिन्यांचे एकूण पंधराशे प्रमाणे तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत

व ते त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जाणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नंतर सुद्धा ही योजना सुरू राहणार असून महिलांना प्रत्येक महिन्याला  पंधराशे रुपये मिळणार असल्याची महत्त्वाची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe