बाईक घेण्याचा विचार करताय ? ‘ह्या’ 4 बाइक्सच्या किमती अगदी कमी, बसतील तुमच्या बजेटमध्ये

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- जर तुम्ही नवीन बाईक घेण्याचा विचार करत आहात आणि बजेटसुद्धा कमी आहे. तर ‘या’ आहेत 50 हजारापेक्षा कमी किंमतीच्या जबरदस्त बाईक.

तसेच या बाईक मायलेजच्या बाबतीत एकदम उत्तम आहेत. या बाइक्स इंधन कार्यक्षम असून अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला स्वस्त बाईकविषयी सांगणार आहोत जे तुमच्या बजेटमध्ये बसतील.

१) हीरो एचएफ डिलक्स : इंजिन आणि पॉवरबद्दल हीरो एचएफ डिलक्समध्ये ९७.२ सीसी एअर कूल्ड फोर स्ट्रोक सिंगल सिलिंडर ओएचसी इंजिन आहे जे ८००० आरपीएम वर ५.९ केडब्ल्यू आणि ६००० आरपीएम वर ८.०५ न्यूटन मीटर पीक टॉर्क जनरेट करते.एचएफ डिलक्समध्ये फोर स्पीड कॉन्स्टेंट मेष गिअर बॉक्स स्थापित आहे.

जर आपण हीरो एचएफ डिलक्सच्या परिमाणांबद्दल बोललो तर त्याची लांबी १९६५ मिलीमीटर, रुंदी ७२० मिलीमीटर, उंची २४५ मिलीमीटर,

व्हीलबेस १२३५ मिलीमीटर, ग्राउंड क्लीयरन्स १६५ मिलीमीटर आणि इंधन टाकीची क्षमता ९.६ लीटर आहे. हीरो एचएफ डिलक्सची किंमत ४९४९० रुपये (एक्स-शोरूम) आहे, तर हीरो सुपर स्प्लेंडरची किंमत६९४५० रुपये (एक्स-शोरूम) आहे.

२) बजाज प्लॅटिना :-102CC इंजिन असणारी बजाज कंपनीच्या या बाईकमध्ये 4Gearboc दिले आहेत. तसेच डोंगराळ भागात किंवा शहरात चालविण्यास कोणताच अडथळा येत नाही. 8BJP पावर आणि 8.6 Newton मीटर टॉर्क जनरेट करु शकते. या बाईकची सीट लांब असून त्याची किंमत 47,405 रुपये एवढी आहे.

३) TVS स्टार सिटी प्लस:- बजाज कंपनीच्या मॉडेलमधील सर्वात जास्त चालणाऱ्या बाईकमध्ये 107.7CC देण्यात आले आहे. तर 109.7CC Engine,8.3 BHP पावर आणि 8.7 Newton मीटर टॉर्क जनरेट करण्याची क्षमता या बाईकमध्ये आहे. या बाईकची शोरुम किंमत 45,991 रुपये आहे.

४) यामाहा Saluto RX  :- यामाहा Motar India ची ही भारतातीतल जास्त जबरदरस्त बाईक आहे. त्यामध्ये 110CC Engine, 7.39BHP पावर आमि 8.5 Newton मीटर टॉर्क तयार करते. या बाईकची किंमत 47,721 रुपये एवढी आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment