सुपरहिट आहे जिओचा हा 90 दिवसांचा प्लॅन! ‘या’ प्लॅनमध्ये मिळेल 180GB नियमित डेटा व 20GB अतिरिक्त डेटा आणि बरेच फायदे…

रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असून संपूर्ण भारतामध्ये या कंपनीचे करोडो ग्राहक असून ग्राहकांमध्ये लोकप्रिय म्हणून जिओ ओळखली जाते. जर आपण एअरटेल किंवा वोडाफोन आयडिया सारख्या टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज प्लान बघितले तर त्या तुलनेत मात्र जिओचे रिचार्ज प्लान हे परवडणारे आणि स्वस्त असल्याचे आपल्याला दिसून येते.

Ajay Patil
Published:
jio recharge

Jio Affordable Recharge Plan:- रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असून संपूर्ण भारतामध्ये या कंपनीचे करोडो ग्राहक असून ग्राहकांमध्ये लोकप्रिय म्हणून जिओ ओळखली जाते. जर आपण एअरटेल किंवा वोडाफोन आयडिया सारख्या टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज प्लान बघितले तर त्या तुलनेत मात्र जिओचे रिचार्ज प्लान हे परवडणारे आणि स्वस्त असल्याचे आपल्याला दिसून येते.

जिओच्या माध्यमातून अनेक आकर्षक असे रिचार्ज प्लान आणले गेले आहेत व त्या माध्यमातून जिओ युजर्सना अनेक प्रकारचे फायदे मिळतात.

यापैकी जर आपण असाच एक उत्कृष्ट आणि ग्राहकांना परवडेल असा जिओचा रिचार्ज प्लान बघितला तर तो 90 दिवसापर्यंत व्हॅलिडीटी असलेला प्लॅन असून तो दीर्घ वैधता प्लॅनमध्ये गणला जातो. नेमक्या या 90 दिवसाच्या प्लानमध्ये ग्राहकांना नेमके कोणते फायदे मिळतात ते आपण थोडक्यात बघू.

899 रुपयांचा आहे हा विशेष फायद्याचा प्लान
जिओ 899 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी म्हणजेच वैधता 90 दिवसांची आहे. या कालावधीमध्ये जिओ ग्राहकांना दररोज शंभर एसएमएस मोफत मिळतात व त्यासोबत दोन जीबी डेटा मिळतो. म्हणजेच एकूण या प्लॅनच्या व्हॅलिडीटी कालावधीमध्ये 180 जीबी डेटा मिळतो व ग्राहकांना या नियमित डेटासह वीस जीबी अतिरिक्त डेटा देखील मिळतो.

म्हणजेच एकूण 200 जीबी डेटा या प्लॅनमध्ये ग्राहकांना मिळतो. तसेच देशातील कुठल्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलचा लाभ देखील ग्राहकांना घेता येतो.

दैनंदिन डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर इंटरनेटचा वेग कमी होऊन तो 64Kbps इतका कमी होतो. तसेच या रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना जिओ सिनेमा, जिओ टीव्ही तसेच जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊड इत्यादी सुविधांचा लाभ देखील मिळतो.

किती आहे या प्लानचा एका दिवसाचा खर्च?
जर आपण जिओच्या या 899 रुपयांच्या प्लॅनची किंमत पाहिली तर ग्राहकाला दररोज त्याची किंमत फक्त दहा रुपये इतकी मोजावी लागते. म्हणजेच एकंदरीतपणे हा ग्राहकांना परवडेल अशा प्रकारचा रिचार्ज प्लान आहे.

जिओने सादर केला नवीन वर्षाचा स्वागत प्लॅन
येणाऱ्या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षाचे स्वागत नावाचा खास प्रीपेड रिचार्ज प्लान आणला असून या प्लॅनची किंमत 2025 रुपये आहे.

या प्लॅनमध्ये दोनशे दिवसांची व्हॅलिडीटी देण्यात आली असून दररोज 2.5GB 4G डेटा यामध्ये मिळतो. तसेच अमर्यादित 5G डेटा देखील यामध्ये उपलब्ध आहे. अनलिमिटेड कॉलिंग तसेच शंभर SMS प्रति दिवस इत्यादी सेवा देखील यामध्ये मिळतात. या प्लॅनची देखील एक दिवसाची किंमत बघितली तर ती दहा रुपये इतकीच आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe