FD Interest Rates : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने द्विमासिक बैठकीत रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेव (FD) योजनेवरील व्याजदरात वाढ केली आहे.
ज्येष्ठ नागरिक आता सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या FD मध्ये गुंतवणूक करून 9% पेक्षा जास्त व्याज मिळवू शकतात. बँक आता ज्येष्ठ नागरिकांना 4.50 टक्के ते 9.10 टक्के आणि सर्वसामान्यांना 4 टक्के ते 8.60 टक्के 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या एफडीवर ऑफर करत आहे.

बँकेच्या वेबसाइटनुसार, हा व्याजदर दोन कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर उपलब्ध असेल. बँका आणि NBFC ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेव योजना ऑफर करत आहेत. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना आता 2 ते 3 वर्षात परिपक्व होणाऱ्या FD वर 9.10% व्याज मिळेल. त्याच वेळी, सामान्य ग्राहकांना या कालावधीतील ठेवींवर 8.6 टक्के दराने व्याज मिळेल. बँक 15 महिने ते 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी वृद्धांना 9 टक्के दराने व्याज देत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 7 दिवस ते 14 दिवसांच्या FD वर 4.50 टक्के दराने व्याज देत आहे. बँक 15 ते 45 दिवसांच्या मुदत ठेवींवर 4.75 टक्के व्याज देत आहे. 46 ते 90 दिवसांच्या FD वर 5.00 टक्के दराने व्याज दिले जाईल. 91 ते 6 महिन्यांच्या मुदत ठेवीवर 5.50 टक्के दराने व्याज मिळेल. तसेच बँक 6 महिने ते 9 महिन्यांपर्यंतच्या ठेवींवर 6.00 टक्के व्याज देण्याचे आश्वासन देत आहे. 9 महिन्यांपेक्षा जास्त आणि 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.50 टक्के दराने व्याज दिले जाईल.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक एका वर्षासाठी मुदत ठेवींवर 7.35 टक्के दराने व्याज देत आहे. बँक 1 वर्ष ते 15 महिन्यांच्या FD वर 8.75 टक्के व्याज देईल. बँक 15 महिने ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी ठेवींवर 9.00 टक्के दराने व्याज देत आहे. बँक 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंतच्या FD वर 9.10 टक्के दराने व्याज देईल. बँक 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 7.25 टक्के दराने व्याज देईल. बँक 5 वर्षांच्या एफडीवर 8.75 टक्के आणि 5 वर्षांवरील आणि 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 7.75 टक्के दराने व्याज देत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ही 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 564 पेक्षा जास्त बँकिंग आउटलेट आणि 5085 कार्यबल आणि 1.64 दशलक्ष ग्राहकांसह सर्वात वेगाने वाढणारी स्मॉल फायनान्स बँक आहे. SSFB बँक FD आणि बचत बँक ठेवींवर सर्वाधिक परतावा देण्याचा दावा करते.