व्यक्ती आयुष्यभर नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून राबराब राबून, दिवस रात्र मेहनत करून पैसे कमवतात व आपल्या कुटुंबाच्या बाबतीत असलेली जबाबदारी पार पाडत असतात. परंतु जेव्हा व्यक्तीचे उतारवय सुरू होते तेव्हा मुलांवर अवलंबून राहायची वेळ येते.
अशा प्रसंगी आपण पाहतो की बऱ्याचदा उतारवयामध्ये मुलांच्या माध्यमातून आई वडिलांच्या बाबतीत असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या जात नाहीत व त्यामुळे ऐन उतारवयामध्ये बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते.
याकरिता सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून कोणावर अवलंबून राहायची वेळ येऊ नये याकरिता आतापासूनच नियोजन करून ठेवणे खूप गरजेचे असते.
म्हणजे तुम्ही अशा काही योजना आहेत की त्यामध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमच्या उतार वयात त्यांच्या बाबतीत कोणावर अवलंबून राहायची गरज पडणार नाही व तुमचे उतारवयात किंवा तुमचे म्हातारपण सुखात आणि आनंदात जाईल.
या दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली अटल पेन्शन योजना हा एक चांगला पर्याय असून यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर म्हणजेच उतार वयात आर्थिक सुरक्षा मिळते. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी ही योजना खूप फायद्याची असून बचत करण्यासाठी प्रोत्साहित करते.
अटल पेन्शन योजना देईल तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर आर्थिक समृद्धी
अटल पेन्शन योजना ही भारत सरकारची योजना असून या योजनेत 18 ते 40 वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकाला गुंतवणूक करता येते व त्यानंतर गुंतवणूकदाराला त्याच्या वयाच्या साठाव्या वर्षानंतर दरमहा 1000 पासून ते पाच हजार रुपये पर्यंत पेन्शनचा लाभ मिळतो.
यामध्ये जर तुम्हाला कमीत कमी योगदानात जास्तीचा फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात करणे गरजेचे आहे व या माध्यमातून प्रत्येक महिन्याला केवळ दोनशे दहा रुपयांचे योगदान देऊन तुम्ही साठाव्या वर्षी 5000 रुपयांची पेन्शन महिन्याला मिळवू शकतात.
तसेच सरकारच्या माध्यमातून किमान पेन्शन रकमेची हमी केंद्र सरकार देत असते. त्यामुळे तुमची पेन्शन सुरक्षित राहते. या योजनेत केंद्र सरकार तुमच्या योगदानाची जी काही रक्कम आहे तिच्या 50 टक्के किंवा कमाल 1000 प्रति वर्ष योगदान यामध्ये देते. या योजनेच्या दोन प्रमुख अटी आहेत.
त्यातील पहिली म्हणजे तुम्ही इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेत समाविष्ट असाल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळत नाही. तसेच दुसरी अट म्हणजे जर तुम्ही करदाते असाल तर तुम्हाला या माध्यमातून लाभ मिळत नाही.
वयानुसार गुंतवणुकीचे विविध पर्याय
समजा वयाच्या 40 व्या वर्षी तुम्ही गुंतवणूक सुरू केली किंवा सुरू करायची असेल व साठाव्या वर्षाच्या वयानंतर पाच हजार रुपये पेन्शन मिळवायचे असेल तर तुम्हाला या योजनेत प्रत्येक महिन्याला 1445 रुपयांचे योगदान द्यावे लागेल.
तसेच वयाच्या 32 व्या वर्षी जर तुम्ही या योजनेत सहभागी झाला तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 689 रुपये योगदान द्यावे लागेल. या योजनेमध्ये विविध प्रकारच्या पेन्शनचे पर्याय दिलेले आहेत.
त्यामुळे तुम्ही तुमची गरज आणि आर्थिक स्थिती ओळखून योजनेची निवड किंवा पेन्शन पर्याय निवडू शकतात. परंतु लवकरात लवकर जर गुंतवणूक सुरू केली म्हणजे कमीत कमी वयात जर या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला कमीत कमी पैसे भरून जास्तीत जास्त फायदा मिळवता येतो.