घर घ्यायचे आहे आणि त्याकरिता होमलोन घेण्याचा विचार करत आहात का? ‘या’ बँका देतात स्वस्तात होमलोन, वाचा या बँकांचे व्याजदर

स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपापल्या पातळीवर प्रयत्न करत असते. परंतु आजकाल घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येकालाच स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होत नाही. याकरिता बरेच जण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या गृह कर्जाचा म्हणजेच होमलोनचा आधार घेतात.

तसेच बँकांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या होमलोनची प्रक्रिया देखील अत्यंत सहज आणि सोपी करण्यात आल्यामुळे होमलोन घेणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. होम लोन हे दीर्घकालीन कर्ज असल्यामुळे खूप वर्षापर्यंत आपल्या आर्थिक परिस्थितीवर किंवा आर्थिक नियोजनावर या कर्जाचा प्रभाव पडत असतो.

त्यामुळे होमलोन घेताना कमीत कमी व्याजदरात कोणती बँक होमलोन देईल याचा तपास करणे खूप गरजेचे असते. कारण व्याजदर जर कमी असला तर त्याचा परिणाम तुमच्या कर्जावर होऊन तुमच्या पैशाची बचत होऊ शकते.या दृष्टिकोनातून आपण या लेखामध्ये अशा पाच बँकांची माहिती घेऊ ज्या सहज आणि कमी व्याजदरामध्ये होमलोन उपलब्ध करून देतात.

 या बँका देतात कमी व्याजदरात होमलोन

1- एचडीएफसी बँक एचडीएफसी बँक ही देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असून या बँकेच्या माध्यमातून विविध प्रकारचे कर्ज सुविधा प्रदान करण्यात येते. जर आपण होमलोनच्या संदर्भात पाहिले तर सध्या ही बँक होमलोन वर वार्षिक 9.4 ते 9.95 टक्के व्याजदर आकारत आहे.

2- स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक असून या बँकेच्या माध्यमातून इतर कर्जासोबतच होमलोनची सुविधा देखील देण्यात येते. समोरच्या व्यक्तीचा सिबिल स्कोर किती आहे यावर व्याजदर आकारला जातो व तो साधारणपणे 9.15% पासून ते 9.75 टक्क्यांपर्यंत असतो. स्टेट बँक ऑफ इंडियाने हे व्याजदर एक मे 2023 पासून लागू केले आहेत.

3- आयसीआयसीआय बँक आयसीआयसीआय बँक देखील देशातील महत्त्वपूर्ण बँक असून या बँकेच्या माध्यमातून देखील होमलोन प्रदान केले जाते व होमलोनवर ही बँक 9.40% ते 10.05% पर्यंत व्याजदर आकारते.

4- कोटक महिंद्रा बँक कोटक महिंद्रा बँकेच्या माध्यमातून देखील होमलोनची सुविधा देण्यात येते. ही बँक पगारदार व्यक्तीला जर होमलोन देत असेल तर ते 8.7 टक्के व्याजदराने देते व जर अर्जदार व्यावसायिक असेल तर त्याला 8.75 टक्के दराने होमलोन देते.

5- पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल अर्थात पीएनबी बँक होम लोन देताना प्रामुख्याने सिबिल स्कोर, कर्जाची एकूण रक्कम आणि कर्ज परतफेडीचा कालावधी यावर व्याजदर आकारते. तरीही साधारणपणे पीएनबी बँकेकडून होमलोन वर 9.4% ते 11.6% पर्यंत व्याजदर आकारला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe