Rural Business Idea: पैसे कमावण्यासाठी कशाला जाता शहरात? गावात राहून सुरू करा ‘हे’ व्यवसाय आणि कमवा लाखोत; वाचा माहिती

Ajay Patil
Published:
rural business idea

Rural Business Idea: सध्या ग्रामीण भागाकडून शहरांकडे होणारे स्थलांतर हा एक मोठा प्रश्न असून उदरनिर्वाहासाठी काहीतरी कामधंदा किंवा नोकरीच्या निमित्ताने अनेक लोक आता शहरांकडे जात आहेत. त्यामुळे शहरांवर प्रचंड प्रमाणात या सगळ्या गोष्टींचा दबाव येतो व पायाभूत सुविधांवर देखील बोजा पडतो.

त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही तुमच्या गावात राहणे आणि त्या ठिकाणीच काहीतरी उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करणे खूप गरजेचे आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ग्रामीण भागामध्ये देखील असे अनेक व्यवसाय आहेत की त्यांना खूप मोठी संधी आहे.

भागातील गरज व बाजारपेठेचा अभ्यास करून जर व्यवसायांची उभारणी केली तर तुम्ही तुमच्या घरी आणि गावीच राहून लाखो रुपये मिळवू शकतात. या अनुषंगाने या लेखामध्ये आपण असेच पाच व्यवसाय बघणार आहोत जे तुम्हाला कमी गुंतवणुकीत चांगला पैसा मिळवून देऊ शकतात.

 तुमच्या गावात सुरू करा हे व्यवसाय आणि कमवा लाखोत पैसा

1- किरकोळ विक्री दुकान ग्रामीण भागामध्ये अनेक किरकोळ वस्तूंची गरज भासते व ग्रामीण भागातील लोकांच्या विविध गरजा ओळखून अशा किरकोळ वस्तूंच्या विक्रीचे दुकाने चांगला नफा मिळवून देऊ शकतात. या प्रकारचा व्यवसाय हा ग्रामीण भागामध्ये चालणारा फायदेशीर व्यवसाय समजला जातो.

आज आपण पाहिले तर खेड्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात किरकोळ विक्री केंद्रांची कमतरता आहे व त्यामुळे खेड्यांमध्ये अशा प्रकारचा व्यवसाय जर व्यवस्थित अभ्यास करून उभारला तर चांगला फायदा होऊ शकतो. किरकोळ दुकान म्हणजेच रिटेल शॉप सेटअप करण्यासाठी तुम्हाला एखादे जागा निवडणे आवश्यक आहे व जवळपास कोणतेही समान वस्तू विक्री करणारे दुकान नसेल अशा ठिकाणी अशा स्वरूपाचे रिटेल शॉप तुम्ही टाकू शकता.

2- पिठाची गिरणी स्वयंपाकासाठी  प्रत्येक घरामध्ये पीठ हे लागतेच व त्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागात पिठाची गिरणी सुरू करणे हा एक फायद्याचा व्यवसाय होऊ शकतो. तसेच तुम्ही या माध्यमातून धान्य विक्री देखील करू शकता.

एवढेच नाहीतर पिठाच्या गिरणीच्या माध्यमातून तुम्ही हळद इत्यादीची पावडर बनवून त्याची विक्री करून देखील अतिरिक्त नफा मिळवू शकतात. त्यामुळे तुम्ही आवश्यक परवाना घेऊन जर पिठाची गिरणी ग्रामीण भागामध्ये सुरू केली तरी तुम्ही चांगला पैसा मिळवू शकता.

3- कपड्यांचे दुकान आजकाल फॅशन ही शहरांमध्येच नाही तर ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे. आताची तरुणाईचा अनेक फॅशनेबल कपडे परिधान करण्याकडे मोठ्या प्रमाणावर ट्रेंड आपल्याला दिसून येतो.

आपण पाहतो की अनेक ग्रामीण भागातून आजही चांगली कपड्यांची खरेदी करण्यासाठी शहराकडे जावे लागते. त्यामुळे तुमच्या गावात तुम्ही चांगल्या रेडिमेड कपड्यांचे दुकान सुरू करून चांगला नफा मिळू शकतात.

4- खते आणि कीटकनाशके ग्रामीण भागाचा आर्थिक कणा हा शेतीवर असल्यामुळे शेतीशी निगडित असलेल्या वस्तूंची विक्री हा व्यवसाय खूप चांगला पैसा मिळवून देऊ शकतो. यामध्ये खते आणि कीटकनाशके शेतीसाठी एक महत्त्वाचा भाग असल्यामुळे तुम्ही खते आणि कीटकनाशकाचे दुकान सुरू करून ग्रामीण भागामध्ये चांगला पैसा मिळवू शकता.

5- डेअरी सेंटर तुम्ही तुमच्या गावांमध्ये दूध गोळा करून ते जवळच्या शहरी भागात विक्री करू शकतात. ग्रामीण भागामध्ये देखील पाळीव प्राण्यांची संख्या कमी झाल्यामुळे आता खेड्यात देखील लोकांना दूध विकत घ्यावे लागते व तुम्ही अशा प्रकारे डेअरी सेंटर उभारून गावात देखील मोठ्या प्रमाणावर दुधाचा व्यवसाय करू शकतात. तुमच्या गावाचे दुधाची गरज भागवून तुम्ही लहान शहरांना देखील दूध पुरवठा करून त्या माध्यमातून चांगला पैसा मिळवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe