एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांकरिता मोठी बातमी! जुलै महिन्याच्या ‘या’ तारखेला बँकेच्या या सेवा राहणार बंद, वाचा आणि होऊ शकणारी गैरसोय टाळा

Ajay Patil
Published:
hdfc bank

देशामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर जर आपण महत्त्वाच्या बँकांचा विचार केला तर यामध्ये एचडीएफसी या बँकेचे नाव अग्रस्थानी येते. भारतातील ही बँक खूप महत्त्वाची बँक असून संपूर्ण देशांमध्ये या बँकेचे साधारणपणे 9.3 कोटी ग्राहक आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने ग्राहक असलेल्या या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांच्या उत्तम सेवेकरिता व ग्राहकांचा उत्तम बँकिंगचा अनुभव वाढावा याकरिता अनेक प्रकारचे उपाययोजना करते.

याच उपाययोजनांचा भाग म्हणून एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून 13 जुलै रोजी बँकेच्या काही सेवा तात्पुरत्या काळाकरिता मर्यादित राहणार आहेत. याबाबत मिळालेली माहिती बघितली तर त्यानुसार एचडीएफसी बँक स्केलेबिलिटी वाढवण्याकरिता कोअर बँकिंग सिस्टमला नवीन इंजिनियर्ड प्लेटफॉर्मसह बदलणार आहे.

 बँक करणार आहे सिस्टम अपग्रेड

देशातील महत्त्वाची असलेली व संपूर्ण देशात नऊ कोटीपेक्षा जास्त ग्राहक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून बँक वापरकर्त्यांचा अनुभव वाढवण्याकरिता नवीन इंजिनिअर्ड प्लेटफॉर्मसह आपल्या कोअर बँकिंग प्रणाली मध्ये बदल करण्यात येणार आहे. या बदलामुळे बँकेचा जो काही परफॉर्मन्स आहे त्याचा वेग वाढण्यास मदत होणार आहे

या  अपग्रेडनंतर एचडीएफसी बँक साईज आणि बँकिंग व्हॉल्युमच्या बाबतीमध्ये देशातील सर्वात मोठे बँकांपैकी एक बनणार आहे. तसेच न्यू जनरेशन प्लॅटफॉर्मवर आपली कोअर बँकिंग प्रणाली देखील होस्ट करणार आहे.

हा सगळे अपग्रेडचे काम 13 जुलै रोजी पहाटे तीन वाजता सुरू होणार आहे व त्याच दिवशी दुपारी साडेचार वाजता संपणार आहे. त्यामुळे या 13.5 तासांच्या कालावधी करिता एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना बँकेच्या काही सेवांचा लाभ घेता येणार नाही.

 ग्राहकांना या कालावधीत या सेवा वापरता येणार नाहीत

त्याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 13 जुलै 2024 रोजी यूपीआय सेवा पहाटे तीन ते तीन वाजून 45 मिनिटे आणि सकाळी साडेनऊ ते दुपारी बारा वाजून 45 मिनिटांपर्यंत बंद राहणार आहे.

तसेच संपूर्ण अपग्रेड कालावधीमध्ये बँकेची नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवा देखील बंद राहणार असून या सेवांचा लाभ ग्राहकांना घेता येणार नाही. एवढेच नाही तर आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस सह सर्व फंड ट्रान्सफर मोड देखील अपडेट कालावधीमध्ये बंद असणार आहेत व याचा वापर ग्राहकांना करता येणार नाही.

 बँकेने ग्राहकांना दिला हा सल्ला

ग्राहकांना यामुळे कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवू नये म्हणून बँकेने 12 जुलै 2024 रोजी सायंकाळी साडेसात वाजेपूर्वी पुरेशी रक्कम काढून पैसे ट्रान्सफर करण्यासारखे सर्व कामे करण्याचा सल्ला ग्राहकांना दिला आहे. त्यामुळेच ग्राहकांची गैरसोय टाळण्याकरिता शनिवारी बँकेच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार आहे व हा शनिवार दुसरा असल्याने बँका बंद राहतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe