नशिबाची अशीही साथ! शेळ्या चारून उदरनिर्वाह करणारा व्यक्ती झाला करोडपती, उसने 40 रुपयाने बदलवले नशीब

Published on -

बरेच जण म्हणतात की नशिबात असेल तर होईल किंवा नशिबाने साथ दिली तर नक्कीच चांगले दिवस येतील किंवा यश मिळेल. परंतु बरेच व्यक्ती म्हणतात की नशीबवापेक्षा प्रयत्न केल्याने यश मिळते. यश मिळवायचे असेल तर प्रचंड प्रमाणात कष्ट आणि प्रामाणिकपणे प्रयत्न हे यशाच्या शिखरापर्यंत व्यक्तीला नेतात.

यशामागे जेवढे प्रयत्नांचा किंवा कष्टाचा वाटा असतो तितका नशिबाचा नसतो असा देखील एक मतप्रवाह समाजामध्ये आहे. परंतु काही घटना अशा घडतात की यामध्ये प्रयत्नांना कुठल्याही प्रकारचा थारा न राहता फक्त नशिबाने ही गोष्ट घडली असे म्हणण्याची वेळ आपल्यावर येते.

खरं पाहायला गेले तर या घटना तशाच प्रकारच्या असतात. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण पश्चिम बंगाल राज्यातील एका रोजंदारी करणाऱ्या मजुराचा विचार केला तर प्रयत्नांपेक्षा कधीकधी नशीब देखील वरचढ ठरते हे आपल्याला दिसून येते याचे प्रत्ययतर आपल्याला नक्कीच येईल.

 पश्चिम बंगालमधील हा मजूर काही तासात झाला करोडपती

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पश्चिम बंगाल राज्यातील पूर्वबर्दवान या परिसरामध्ये राहणाऱ्या व रोजंदारीवर उदरनिर्वाह करणारा एक मजूर काही तासांमध्ये करोडपती झाला आहे. जेव्हा तो गवत कापण्यासाठी गेलेला होता व त्या ठिकाणाहून घरी आल्यानंतर त्याला ही बातमी समजली.

त्यानंतर त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. पश्चिम बंगालमधील मंगळकोट मधील खुर्तूबापूर या गावातील भास्कर माळी हे मोलमजुरी करून आणि शेळ्या चारून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु गेल्या दहा वर्षापासून त्यांना लॉटरी तिकिटे खरेदी करण्याचा छंद होता. या माध्यमातून कधीतरी आपले नशीब चमकेल व आपण करोडपती होऊ हे स्वप्न त्यांचे होते.

अगदी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी रविवारी सकाळी एका ओळखीच्या व्यक्तीकडून चाळीस रुपये उसनवारीने घेतले व त्यातून लॉटरी तिकीट खरेदी केले व त्याच दिवशी नशिबाने त्यांना इतकी प्रचंड प्रमाणात साथ दिली की या तिकिटावर ते त्याच दिवशी दुपारी करोडपती झाले.चाळीस रुपये उसने घेऊन त्यांनी बस स्टैंड वरून असलेल्या लॉटरी काउंटरवरून 60 रुपयाचे 95H83529 या क्रमांकाचे तिकीट घेतले. त्यानंतर ते घरचे कामाला लागून गेले.

परंतु त्याच दिवशी त्यांना दुपारी लॉटरीमध्ये पहिले बक्षीस मिळाल्याचे कळले व हे कळल्यावर त्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही. याबद्दल बोलताना लॉटरी तिकीट विक्रेते मौलिक शेख मामेझुल यांनी म्हटले की रविवारी दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी त्यांना कळले की गावातील भास्कर माळी यांनी एक कोटी रुपयांचे पहिले बक्षीस जिंकले आहे. मौलिक हे गेल्या दहा वर्षापासून या परिसरात लॉटरी काउंटर लावत आहेत. एका गरीब मजूराने त्यांच्या दुकानातून खरेदी केलेल्या तिकिटावर तो करोडपती झाल्याचा खूप आनंद त्यांना देखील झाला आहे.

अशा पद्धतीने बऱ्याचदा प्रयत्नांपेक्षा नशीब देखील खूप मोठी साथ देऊन जाते असेच आपल्याला या उदाहरणावरून म्हणावे लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe