Credit Card For Women:- जर आपण सध्या महिलांचा विचार केला तर प्रत्येक क्षेत्रात पहिला पुढे असून मग ते संरक्षण क्षेत्र असो की हवाई क्षेत्र, संशोधन क्षेत्र असो की कृषी क्षेत्र अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या पुरुषांच्या बरोबरीने आपल्याला काम करताना सध्या दिसून येतात.
अनेक प्रकारच्या आर्थिक आघाड्यांवर देखील महिला पुरुषांच्या सोबत काम करताना आपल्याला दिसतात. अगदी घर सांभाळण्यापासून तर मोठमोठे उद्योग व्यवसाय सांभाळण्यापर्यंत महिला यशस्वी झाल्याची सध्या स्थिती आहे.

त्यामुळे महिलांच्या जर आर्थिक बाजूचा विचार केला तर कुटुंबाच्या संबंधित अनेक पैशांच्या बाबतीतले निर्णय महिलांना घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांना पैशांची बचत आणि गुंतवणूक या गोष्टींवर खूप लक्ष देणे गरजेचे असते.
त्यामुळे या आर्थिक नियोजनाचा भाग म्हणूनच बऱ्याचश्या महिला क्रेडिट कार्ड वापरतात. कारण क्रेडिट कार्ड जर नियोजन करून व्यवस्थित वापरले तर हा एक फायद्याचा व्यवहार ठरतो. जर तुम्ही क्रेडिट कार्डची बिल वेळेवर भरले तर क्रेडिट कार्ड वापरणे नक्कीच फायद्याचे ठरते.
अनेक बँका क्रेडिट कार्डच्या माध्यमातून महिलांना कॅशबॅक, मोफत विमान तिकीट तसेच सुलभ ईएमआय, रिवार्ड पॉईंट्स इत्यादी फायदे देत असतात. याचा अनुषंगाने देशातील कोणत्या बँका महिलांना डोळ्यासमोर ठेवून कोणती विशेष क्रेडिट कार्ड जारी करतात किंवा क्रेडिट कार्ड देतात याबद्दलची माहिती आपण या लेखात बघू.
महिलांसाठी फायद्याचे आहेत ही क्रेडिट कार्ड
1- एचडीएफसी सॉलिटेअर क्रेडिट कार्ड- एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून हे क्रेडिट कार्ड जारी केले जाते. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही थायरोकेअर कडून आरोग्य पॅकेजचा लाभ घेऊ शकतात. या क्रेडिट कार्डची वार्षिक किंवा नूतनीकरण फि रुपये 2499 रुपये आहे.
हे कार्ड तुम्ही नूतनीकरण केल्यावर तुम्हाला दुसऱ्या वर्षापासून 2500 रिवार्ड पॉईंट्स मिळू शकतात. एचडीएफसी सॉलिटेयर क्रेडिट कार्ड तुम्हाला प्रत्येक 150 रुपये खर्च केल्यावर तीन रिवार्ड पॉईंट देते. एक्सेलरेटेड रिवार्ड्स पॉईंट्स नावाच्या सुविधेअंतर्गत तुम्ही तुमच्या सर्व किराणा आणि जेवणाच्या खर्चावर अतिरिक्त 50 टक्के रिवार्ड पॉईंट मिळवू शकतात.
तसेच काही खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदीच्या स्टॉल वरून रुपये दोन हजार किमतीचे व्हाउचर घेऊ शकतात.
एचडीएफसी सॉलिटेअर क्रेडिट कार्डचा एकत्रित खर्च दर सहा महिन्यांनी किमान दोन लाख रुपये असणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही अनेक देशांतर्गत एअरलाइन्सवर तुमचे सर्व रिवार्ड पॉईंट रीडिम करू शकतात. तसेच या क्रेडिट कार्डवर तुम्हाला पेट्रोल पंपावर इंधन अधीभारावर सूट मिळते.
2- एसबीआय सिंपली क्लिक क्रेडिट कार्ड- एसबीआय सिंपली क्लिक क्रेडिट कार्ड अनेक फायदे देते. ई शॉपिंग रिवार्ड्स, माइल स्टोन रिवार्ड्स इत्यादी फायदे या कार्डवर मिळतात.
तसेच वार्षिक 499 रुपये शुल्क भरून तुम्ही ॲमेझॉन ऑनलाईन वरून पाचशे रुपयांची गिफ्ट कार्ड मिळवू शकतात. क्रेडिट कार्डवरील वार्षिक खर्च एक लाख रुपये पेक्षा जास्त असल्यास पुढील वर्षासाठी वार्षिक शुल्क माफ केले जाते. ॲमेझॉन व्यतिरिक्त तुम्ही बुक माय शो,
इझी डिनरवर ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर तुम्हाला 10× रिवार्ड पॉईंट्स मिळतील. या खरेदी व्यतिरिक्त एसबीआय सिंपली क्लिक क्रेडिट कार्डवर सर्व ऑनलाईन खरेदीवर 5x रिवार्ड पॉईंट ऑफर करते. रुपये पाचशे ते रुपये तीन हजार मधील व्यवहारांवर तुम्ही इंधनावर एक टक्क्यांपर्यंत बचत करू शकतात.
3- कोटक सिल्क इन्स्पायर क्रेडिट कार्ड- कोटकच्या कोटक सिल्क इन्स्पायर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कपड्यांच्या खरेदीवर खर्च केलेल्या प्रत्येक शंभर रुपयांवर 5x रिवार्ड पॉईंट मिळतात. तसेच इतर कुठल्याही प्रकारच्या खरेदीवर खर्च केलेल्या प्रत्येक दोनशे रुपयांकरिता एक रिवार्ड पॉईंट मिळतो.
हे कार्ड विमा संरक्षणासह येते आणि काही फसव्या व्यवहारांच्यामध्ये देखील तुम्हाला 75 हजार रुपयांपर्यंतचे कव्हर मिळते.
जर तुम्ही ॲड ऑन कार्ड साठी अर्ज केला असेल तर कार्डधारकाला प्राथमिक कार्डाचे सर्व फायदे मिळतात. विशेष म्हणजे हे कार्ड तुम्हाला कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय मिळणे शक्य आहे. कारण ते एफडीवर देखील मिळू शकते.
4- आरबीएल बँक मासिक ट्रीट क्रेडिट कार्ड- आरबीएल बँकेचे मासिक ट्रिट क्रेडिट कार्ड किराणा सामान खर्च, बिल पेमेंट तसेच स्विगी आणि बुक माय शो वर कॅशबॅक देते. जर तुमचा खर्च एका महिन्यात तीन हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर पुढील महिन्याची फी 75 रुपये असेल
आणि जीएसटी देखील माफ होतो.. प्रत्येक महिन्याला तुम्ही किराणा मालावर खर्च केला तर दहा टक्के कॅशबॅक मिळतो. तसेच तुम्ही ऑनलाईन खरेदी केली तर प्रत्येक 100 रुपयांवर दोन रिवार्ड पॉईंट मिळतात. तसेच ऑफलाईन खरेदी वर तुम्हाला प्रत्येक 100 रुपये खर्चावर एक रिवार्ड पॉईंट मिळतो.
तसेच तुम्ही देशात कुठेही इंधन भरले तर पाचशे रुपये तर चार हजार रुपये पर्यंतच्या व्यवहारावर शंभर रुपयापर्यंतचा इंधन अधिभार म्हणजेच सर चार्जवर सूट मिळते.