Gold Price Hike:- सध्या जर आपण सोन्याच्या दरांचा विचार केला तर गेल्या आठ दिवसांमध्ये सोन्याच्या भावामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत असून मंगळवारी सोन्याचे भाव 64 हजार रुपयांवर पोहोचले होते तर आज जवळपास 66 हजार रुपयांच्या आसपास सोन्याचे दर आहेत.
प्रत्येक दिवसाला सोन्याच्या दरामध्ये एक नवीन उच्चांक गाठला जात असल्याची सद्यस्थिती आहे. तसेच यापुढे देखील सोन्याच्या दरामध्ये अशाच प्रकारची तेजी राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याच वेगाने जर सोन्याच्या दरात वाढ होत राहिली तर काही दिवसांमध्ये सोन्याचे दर 70 हजार रुपयापर्यंत पोहोचतील असा देखील अंदाज या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केला आहे. गेल्या दिवसापासून अचानकपणे सोन्याच्या दरामध्ये तेजी येण्याची कारणे पाहिली तर यामध्ये भारतातील स्थिर सरकार आणि अमेरिकन फेडरल रिझर्व बँक यांचा सरळ संबंध असल्याचे म्हटले जात असून तज्ञांचा तसा अंदाज आहे.
सोन्याच्या दारात अचानकपणे वाढ होण्याची ही आहेत कारणे
भारतातील स्थिर सरकार आणि अमेरिकन फेडरल रिझर्व बँकेचा सरळ संबंध सोन्याच्या दरात वाढ होण्यामागे असल्याचे तज्ञांचे म्हणणे असून अमेरिकन बँक ही एक मे ला व्याजदरामध्ये मोठी कपात करू शकते असे देखील संकेत देण्यात आले आहेत. त्यासोबतच येणाऱ्या कालावधीमध्ये महागाईचे आकडे गगनाला पोहोचतील अशी स्थिती आहे.
तसेच मे मध्ये अक्षय तृतीया देखील असणार आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमुळे सोन्याच्या मागणीत वाढ होईल व सोन्याचे दर देखील वाढतील अशी स्थिती आहे. साधारणपणे येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात आठ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. म्हणजेच तोळ्यामागे 5400 पर्यंत वाढ होईल अशी शक्यता आहे.
तसे पाहायला गेले तर मागच्या दोन महिन्यांमध्ये या क्षेत्रातील तज्ञांनी सोन्याच्या दरवाढी संदर्भात जे अंदाज वर्तवलेले होते त्याप्रमाणे किमती वाढल्या नाहीत. परंतु जर आता ज्याप्रमाणे किंमत वाढत आहे त्याप्रमाणे जर सोन्याच्या किमतीत वाढ झाली तर त्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व बॅंकेचे व्याजदर जबाबदार असू शकतात.
फेडरल बँकेचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी यासंबंधीचे संकेत दिलेले आहेत. बँकेचे व्याज दरात एक मे पासून कपात केली जाईल असा देखील एक अंदाज लावला जात आहे. त्यामुळे सोन्याच्या दारात अचानकपणे वाढ होताना दिसत आहे व येणार्या दोन ते तीन महिन्यांपर्यंत याचा परिणाम दिसू शकतो.
लोकसभा निवडणुकीचा प्रभाव
तसेच देशांमध्ये लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजत असून लोकसभेची रणधुमाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या लोकसभा निवडणूक नंतर देशात पुन्हा स्थिर सरकार सत्तेत येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे काही महिन्यांमध्ये आर्थिक डेटा सुधारेल असे देखील शक्यता आहे.
आर्थिक वर्ष 2024 चा चौथ्या तिमाही आणि संपूर्ण आर्थिक वर्षाचा डेटा एप्रिल आणि मे मध्ये जारी केला जाईल. यासोबतच महागाईच्या आकड्यात देखील सुधारणा होईल अशी शक्यता आहे. या सगळ्या परिस्थितीचा परिणाम सोन्याच्या दरात होईल.