Bank FD Interest Rate: ‘या’ बँकांमध्ये कराल एफडी तर मिळेल सर्वात जास्त व्याजाचा फायदा! मिळेल भरघोस परतावा

Published on -

Bank FD Interest Rate:- गुंतवणूक ही बाब आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून भविष्यकालीन आर्थिक भवितव्य चांगल्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून असते. गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय  उपलब्ध असून ज्यामधून गुंतवणूकदारांना केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो

आणि गुंतवणूक सुरक्षित राहते अशा ठिकाणी गुंतवणूक करत असतात. यामध्ये विचार केला तर बँकांच्या मुदत ठेव म्हणजेच एफडी योजना या सर्वात विश्वासार्ह मानले जातात व मिळणारा परतावा आणि सुरक्षितता या दृष्टिकोनातून बँकातील मुदत ठेव योजनांना अनन्यसाधारण महत्व आहे.

त्यामुळे या लेखात आपण देशातील ज्या काही लघु वित्त बँका आहेत त्या बँकांमध्ये जर एफडी केली तर एफडी वर आठ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळते. त्यामुळे या लेखामध्ये आपण अशा कोणत्या लघु वित्त बँका आहेत त्यामध्ये एफडीवर आठ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळते त्यांची माहिती घेऊ.

 या लघु वित्त बँकांमध्ये मिळते सर्वात जास्त व्याज

1- एयु स्मॉल फायनान्स बँक ही बँक सामान्य नागरिकांना सात दिवस ते दहा वर्षाच्या कालावधीच्या एफडी मध्ये गुंतवणुकीची संधी देते व यावरील व्याज 3.75% ते आठ टक्क्यादरम्यान असून जी एफडी 18 महिन्यात परिपक्व होते अशा एफडीवर कमाल आठ टक्के व्याज मिळत आहे. या बँकेकडून हे व्याजदर 24 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आला आहेत.

2-ESAF स्मॉल फायनान्स बँक ही बँक सामान्य नागरिकांना सात दिवस ते दहा वर्षाच्या एफडीवर चार टक्के ते 8.25% पर्यंत व्याज देत असून दोन वर्ष ते तीन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर कमाल 8.25% व्याज देत असून हे व्याजदर एक जानेवारी 2024 पासून लागू आहेत.

3- फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ही बँक सर्वसामान्य नागरिकांना सात दिवस ते दहा वर्षाच्या कालावधीच्या एफडीवर तीन टक्के ते 8.61 टक्क्यांपर्यंत व्याज देत असून 750 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याजदर 8.61% टक्के देत आहे. हे दर 28 ऑक्टोबर 2023 पासून लागू आहेत.

4- जन स्मॉल फायनान्स बँक ही बँक सात दिवस ते दहा वर्षाच्या एफडीवर सामान्य नागरिकांना तीन टक्के ते 8.50% इतके व्याजदर देत असून 365 दिवसात परिपक्व होणारी जी एफडी आहे त्यावर कमाल 8.50% व्याज उपलब्ध आहे. हे व्याजदर 2 जानेवारी 2024 पासून लागू आहेत.

5- सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ही बँक सर्वसामान्य नागरिकांना सात दिवस ते दहा वर्षाच्या मुदत ठेवीवर चार टक्के ते 8.65% इतका व्याजदर देत असून दोन वर्ष दोन दिवसात परिपक्व होणाऱ्या एफडीवर 8.65% जास्तीत जास्त व्याज या बँकेच्या माध्यमातून मिळत आहे. हे व्याजदर 22 डिसेंबर 2023 पासून लागू आहेत.

6- उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ही बँक सात दिवस ते दहा वर्षाच्या कालावधीसाठी केलेल्या एफडी वर सर्वसामान्य नागरिकांना 3.75% ते ८.२५ टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. 560 दिवसात परिपक्व होणाऱ्या एफडीवर जास्तीत जास्त 8.25 टक्के व्याजदर देत असून हे दर एक जून 2023 पासून लागू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe