Stock to buy : भविष्यात 4 हजाराचा आकडा पार करेल ‘हा’ शेअर, आत्ताच करा खरेदी…

Stock to buy : जर तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करण्यासाठी एक जबरदस्त स्टॉक शोधत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एक शेअरबद्दल सांगणार जो तुम्हाला भविष्यात उत्तम परतावा देईल.

आम्ही सध्या एंजेल वनचे शेअर्सबद्दल सांगणार आहोत. हा शेअर आज 2884 वर पोहोचला आहे. आणि येत्या काही दिवसांत 4000 पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. याचा अर्थ हा स्टॉक येत्या काही दिवसात सुमारे 40 टक्के परतावा देऊ शकतो. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने आपल्या एका नोटमध्ये आपली लक्ष्य किंमत 4000 रुपये प्रति शेअर केली आहे. यासोबतच गुंतवणूकदारांना खरेदीची शिफारस देखील केली आहे.

या वर्षी एंजल वन शेअर्सने 131 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मात्र, यावर्षी 20.27 टक्के नकारात्मक परतावा देखील दिला आहे. तर, गेल्या सहा महिन्यांत 27 टक्क्यांहून अधिक आणि एका महिन्यात सुमारे 5 टक्के परतावा दिला आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3896 रुपये आहे आणि नीचांक 1181.20 रुपये आहे.

जर आपण शेअर होल्डिंग पॅटर्नबद्दल बोललो तर, 24 मार्चपर्यंत त्यात प्रवर्तकांचा हिस्सा 38.21 टक्के होता. यामध्ये विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 23 डिसेंबरच्या 19.11 टक्क्यांवरून 24 मार्चमध्ये 17.27 टक्क्यांपर्यंत त्यांचा हिस्सा कमी केला आहे. याउलट, देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी त्यांचे स्टेक 9.32 टक्क्यांवरून 9.49 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत. तर, म्युच्युअल फंडांनी यामध्ये त्यांचा हिस्सा 7.26 टक्क्यांवरून 6.99 टक्क्यांवर आणला आहे.

टीप : येथे दिलेली माहिती केवळ शेअर्सच्या कामगिरीवर आहे हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणतीही गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. जेणेकरून तुम्हाला नुकसान सहन करावे लागणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe