महाराष्ट्रातील ‘या’ चहा विक्रेत्याने अशी लढवली आयडिया की 5 रुपयाच्या चहात दररोज कमवतो 7 ते 10 हजार! वाचा यशोगाथा

Ajay Patil
Updated:
success story

कुठलाही व्यवसाय म्हटले म्हणजे त्या व्यवसाय वाढीसाठी आपल्याला ज्याप्रमाणे सगळ्या गोष्टींची नियोजन करून त्याप्रमाणे सगळी कामे करावी लागतात. तसेच व्यवसायामध्ये कधीकधी अगदी छोट्या मोठ्या कल्पना देखील व्यवसाय वाढीसाठी खूप फायद्याच्या ठरतात.

या गोष्टींसोबत मग येते तो कष्ट तसेच प्रयत्नांमधील  सातत्य आणि व्यवसाय वाढीसाठी करावी लागणारे सगळ्या महत्वपूर्ण गोष्टी यांचा अंतर्भाव होत असतो. तसेच व्यवसाय तुमचा किती मोठा आहे किंवा किती छोट्या स्तरावर आहे याला महत्त्व नसते. परंतु जो व्यवसाय तुमचा आहे तो तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज करत आहात या गोष्टींना खूप महत्त्व असते.

अगदी कमीत कमी गुंतवणुकीतून सुरू केलेले व्यवसाय देखील लाखोच्या गुंतवणुकीत सुरू केलेल्या व्यवसायांपेक्षा जास्त नफा मिळवतात. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण धाराशिव मधील महादेव माळी यांचे उदाहरण बघितले तर फक्त तिसरीपर्यंत शिक्षण घेतलेले महादेव नाना माळी हे वीस वर्षापासून चहाचा व्यवसाय करतात.

परंतु हा त्यांचा व्यवसाय लाखोत गुंतवणूक केलेल्या व्यवसायांपेक्षा जास्त नफा त्यांना देतो. कारण त्यांनी या व्यवसायामध्ये एक नावीन्यपूर्ण कल्पना आणलेली आहे व ही कल्पनाच त्यांना चहाच्या व्यवसायाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवून देते.

 महादेव माळी फोनवर घेता चहाची ऑर्डर

याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रातील धाराशिव येथील रहिवासी असलेले महादेव माळी यांचे शिक्षण फक्त तिसरी पर्यंत झालेले आहे. साधारणपणे वीस वर्षापासून ते चहाच्या व्यवसायात असून  या व्यवसायाच्या माध्यमातून ते महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत. या व्यवसायात त्यांनी अनोखी कल्पना आणलेली आहे.

महादेव नाना माळी हे चहाची ऑर्डर फोनवरून घेतात व विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारच्या ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळा असो किंवा हिवाळा या कुठल्याही गोष्टींची तमा न बाळगता ते फोनवर मिळालेली ऑर्डर वेळेवर ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असतात. विशेष म्हणजे त्यांच्या चहाच्या व्यवसायाच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे

त्यामध्ये सुमारे पंधरा हजार नागरिक राहत असतील यातील बहुसंख्य त्यांचे ग्राहक आहेत. दररोज 50 ते 60 लिटर दुधाचा चहा ते बनवतात. विशेष म्हणजे शेजारील दोन ते तीन किलोमीटर अंतरातील गावांना ते घरपोच चहाची सेवा देतात. मग यामध्ये आपल्याला प्रश्न पडेल की जर घर पोहोच फोनवर चहा मिळत असेल तर चहाची किंमत जास्त असेल.

परंतु तसे काही नाही. महादेव नाना माळी यांनी त्यांच्या चहाच्या एक कपाची किंमत फक्त पाच रुपये इतकी ठेवलेली आहे व दररोज ते 1500 ते 2000 कप चहाची विक्री करतात.या माध्यमातून जर आपण दररोज त्यांना मिळणारा पैसा पाहिला तर तो तब्बल सात ते दहा हजार रुपयांच्या घरात आहे.

त्यांचे मुलं आणि पत्नीचा त्यांना खूप मोठा हातभार लागला असून त्या माध्यमातून त्यांनी चांगली आर्थिक प्रगती साधली आहे. तसेच फोनवर ऑर्डर घेऊन ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्यांनी इतर माणसं न ठेवता ती ऑर्डर ते स्वतः जाऊन पूर्ण करतात हे देखील एक विशेष आहे.

अशा पद्धतीने महादेव नाना माळी यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की व्यवसाय कितीही छोटा असला तरी देखील जर त्याच्यामध्ये अनोख्या कल्पनांचा अंतर्भाव केला तर आपल्याला चांगले यश आणि पैसा मिळवता येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe