Gold Price : सोन्याचे भाव वाढतील की घटतील ? एका वर्षात..

एका आठवड्यात सोन्याच्या किमतींमध्ये प्रति तोळा 941 रुपयांनी वाढ झाली. हीच स्थिती चांदीची देखील आहे. मागच्या शनिवारी चांदीचा भाव 80 हजार 263 रुपये किलो होता. आज चांदीचे दर हे 81,510 रुपये प्रति किलोवर पोहोचले असून या आठवड्यात 1247 रुपयांनी चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

Ajay Patil
Updated:
gold price

Gold Price:- गेल्या कित्येक दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर दरवाढ झाल्याची स्थिती दिसून येत असून या दरवाढीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर थोड्याफार प्रमाणात ब्रेक लागल्याची स्थिती निर्माण झाली होती.

कारण अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून  सहा टक्क्यांपर्यंत कमी केले. म्हणजेच आयात शुल्कात कपात केली व त्यामुळे अर्थसंकल्प ज्या दिवशी सादर करण्यात आला त्याच दिवशी काही तासांनी सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्याचे आपण बघितले.

परंतु त्यानंतर मात्र सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे. या आठवड्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली असून गेल्या शनिवारी सोन्याचे भाव 69,663 रुपये प्रति तोळा होते तर आज सोन्याचे भाव 70604 रुपये प्रति तोळा म्हणजेच दहा ग्रॅम पर्यंत पोहोचलेला आहे.

या आकडेवारीवरून आपल्याला दिसून येते की एका आठवड्यात सोन्याच्या किमतींमध्ये प्रति तोळा 941 रुपयांनी वाढ झाली. हीच स्थिती चांदीची देखील आहे.

मागच्या शनिवारी चांदीचा भाव 80 हजार 263 रुपये किलो होता. आज चांदीचे दर हे 81,510 रुपये प्रति किलोवर पोहोचले असून या आठवड्यात 1247 रुपयांनी चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

 एका वर्षात सोन्याच्या दरात झाली 7000 रुपयांनी वाढ?

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार बघितले तर यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीमध्ये तब्बल 7252 रुपयांनी वाढ झाली आहे. या वर्षाच्या एक जानेवारीला सोन्याचे भाव 63 हजार 352 रुपयांवर होते

व ते आता 70 हजार 604 रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचलेले आहेत. तसेच एक जानेवारीला चांदीचे भाव 73 हजार 395 रुपये होते व ते आता वाढून 81510 रुपयांवर पोहोचलेले आहेत.

 येणाऱ्या दिवसात सोन्याचे दर वाढतील की घटतील?

भारतामध्ये जर आपण बघितले तर येणारा कालावधी हा सणासुदींचा कालावधी आहे व ऑगस्ट ते डिसेंबर या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये तब्बल आठ मोठे सण-उत्सव भारतामध्ये येणार आहेत.याशिवाय नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत 16 शुभ मुहूर्त विवाह साठी आहेत.

अशा परिस्थितीमध्ये सोन्याच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये जर आपण जागतिक सुवर्ण परिषदेच्या म्हणण्यानुसार बघितले तर त्यांच्या मते डिसेंबर पर्यंत दागिने, सोन्याचे बार आणि नाण्यांची मागणी वाढू शकते व मागणी वाढल्यामुळे 50 % अतिरिक्त मागणी निर्माण होऊन सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe