अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-संयुक्त अरब अमिरातीने (दुबई) रविवारी अधिक व्यावसायिकांना 10 वर्षाचा गोल्डन व्हिसा देण्यास मान्यता दिली. यात पीएचडी पदवी धारक, चिकित्सक, इंजिनीअर्स आणि विद्यापीठांचे काही विशेष पदवीधर देखील आहेत.
विशेष म्हणजे, युएई गल्फ देशांमध्ये स्थायिक होण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीत हातभार लावण्यासाठी प्रतिभावान आणि अधिक व्यावसायिक लोकांना गोल्डन व्हिसा देते. दुबईचे राज्यपाल शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी युएईचे पंतप्रधान आणि उपाध्यक्ष यांनी एका ट्विटमध्ये याची घोषणा केली.
काय आहे गोल्डन व्हिसा? :- व्हिसा क्लासला मूळ रूपात एक स्थायी निवास सिस्टीमच्या रूपात तयार करण्यात आला होता. मात्र त्यानंतर रेजिडेन्सी आणि परदेशी प्रकरणाचे डायरेक्टर जनरलनी सांगितले की ही वास्तवाल लाँगटर्म १० वर्षीय व्हिसा आहे.
गोल्डन व्हिसा एक प्रकारचे अनुदान आहे जे श्रीमंत व्यक्तींना दिले जाते ज्यामुळे देशात राहताना महत्त्वपूर्ण गुंतवणूक करू शकतील. या सिस्टीमचा वापर सरकार आपल्या टॅक्स आधाराला व्यापक बनवण्यासाठी करतात. यूएई गुंतवणूकदार आणि उद्योजकांसाठी विशेष रूपात बिझनेससाठी अनुकूल आणि टॅक्स फ्री वातावरण बनवण्यासाठी एक चांगले डेस्टिनेशन बनत आहे.
गोल्डन व्हिसा कोण मिळवू शकतं? :- यूएईचा गोल्डन व्हिसाचा नुकताच करण्यात आलेल्या विस्तारानुसार आता पीएचडीधारकांना मिळेल ज्यांनी जगातील टॉप ५०० पैकी एका युनिर्व्हसिटीमधून शिक्षण घेतले आहे. नव्या कायद्यानुसार प्रमाणित डॉक्टरही व्हिसा मिळवू शकतात.
कारण देश कोरोना व्हायरस महामारीपासून रेजिडेंट मेडिकलर्सची कमतरता भरून काढेल. कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोग्रामिंग इलेक्ट्रॉनिक्स, अॅक्टिव्ह टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल्स, एआय आणि बिग डेटा क्षेत्रात विशेष पदवी मिळवणारे इंजीनियरर्सही यासाठी पात्र आहेत.
हा व्हिसा माध्यमिक-विद्यालय अथवा युनिर्व्हसिटीच्या विद्यार्थ्यांना मिळू शकतो. ज्यांचा अॅकेडमिक रेकॉर्ड(९५ टक्क्याहून अधिक आहे). या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांसाठी लाँग टर्म व्हिसाही जारी केला जाऊ शकतो. हा व्हिसा खूप शिकलेल्या लोकांनाही मिळेल. तसेच त्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांना मिळेल ज्यांनी आपल्या निवडलेल्या क्षेत्रात विशेष कामगिरी केली आहे.
या दिवसापासून नवीन गोल्डन व्हिसा लागू होईल:- यावर गल्फ न्यूजने सांगितले की ,गोल्डन व्हिसा देखील विशेष पदवी धारकांना देण्यात येईल. यामध्ये महामारी विज्ञान, विषाणूशास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रातील तज्ञांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे याला युएईच्या मंत्रिमंडळानेही मान्यता दिली आहे.
1 डिसेंबर 2020 पासून हे नियम लागू होतील. डायनॅमिक जीवनशैली आणि सुरक्षितता यांव्यतिरिक्त युएई मधील जीवनशैली आणि वैशिष्ट्ये मानली जाणारी गोल्डन रेसिडेन्सी धारक आणि त्यांच्या कुटुंबीयांना 10 वर्षाचा रेजिडेन्सी व्हिसा देण्यात येईल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved