Today Gold Price : सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी देखील घसरण झाली आहे. त्यामुळे सोने काही प्रमाणात स्वस्त झाले आहे. तर चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे.
सोन्याचा भाव 150 रुपयांनी घसरून 62,950 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव 62,950 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. मात्र चांदीच्या दारात 200 रुपयांनी वाढून 76,200 रुपये किलोवर पोहोचली आहे.

जागतिक बाजारात सोने 6.60 डॉलरच्या वाढीसह 2023.15 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे तर चांदी 0.24 डॉलरने मजबूत होऊन 22.92 प्रति डॉलर औंसवर पोहोचली आहे.
देशातील प्रमुख राज्यातील सोने आणि चांदीचे दर
सोन्याचे आजचे नवीनतम दर जाहीर करण्यात आले आहेत. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 57,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 62,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच मुंबईत चांदीचा दर 76,000 रुपये प्रति किलो आहे.
नागपुरामध्ये सोने आणि चांदीचा आजचा दर जाहीर करण्यात आला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 57,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा दर 76 हजार रुपये प्रति किलो जाहीर करण्यात आला आहे.
पुणे शहरातील आजचे सोने आणि चांदीचे देखील नवीनतम दर जाहीर करण्यात आला आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 62,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 57,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. प्रति किलो चांदीचा दर 76,000 रुपये प्रति किलो आहे.
नाशिकमधील सोने आणि चांदीचे आजचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर 62,980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 57,730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर प्रति किलो चांदीचा दर 76,000 रुपये प्रति किलो आहे.
सोने आणि चांदी खरेदी करताना अनेकजण काही चुका करत असतात. त्यांच्या या चुका त्यांना आर्थिक झळ देऊ शकतात. सोने आणि चांदी खरेदी करताना त्यांची योग्य तपासणी करा.
कधीही सोने आणि चांदी खरेदी करताना दागिन्यांचे हॉलमार्क तपासणे गरजेचे आहे. दागिन्यांचे हॉलमार्क एजन्सी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सकडून ठरवण्यात आले आहे. यावरूनच तुम्ही खरे आहे की खते आहे हे तपासू शकता.