Post Office Schemes : महिलांसाठी पोस्टाच्या सर्वोत्तम 5 योजना, उत्तम परताव्यासह करात सूट !

Sonali Shelar
Published:
Post Office Schemes For Women

Post Office Schemes For Women : पोस्ट ऑफिस सर्व वयोगटातील लोकांसाठी बऱ्याच योजना ऑफर करते. त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये महिलांसाठी देखील अनेक योजना चालवल्या जात आहेत. ज्यात गुंतवणूक करून महिला सक्षम होऊ शकतात. पोस्टाच्या या योजनांवर चांगला परतावा मिळत आहे. पोस्ट ऑफिसकडून वेळोवेळी नवनवीन योजना सुरू केल्या जातात. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही पाच सर्वोत्कृष्‍ट योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्‍यामध्‍ये गुंतवणूक केल्‍याने महिला केवळ उत्‍तम परतावा मिळवू शकत नाहीत. तर त्यावर कर सूटही मिळते. कोणत्या आहेत या योजना चला पाहूया…

पीपीएफ

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करून महिला चांगला परतावा मिळवू शकतात. त्यामुळे महिलांचे भविष्यही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होणार आहे. यामध्ये सरकार सध्या ठेवींवर ७.१ टक्के परतावा देते. या विशेष योजनेत कोणतीही व्यक्ती एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकते. याद्वारे, प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट देखील उपलब्ध आहे.

महिला सन्मान बचत योजना

विशेषतः महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये कोणतीही महिला 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते. या गुंतवणुकीवर ७.५ टक्के व्याज आहे. त्याचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे.

सुकन्या समृद्धी योजना

मुलींना डोळ्यासमोर ठेवून ही सरकारी योजना बनवण्यात आली आहे. ज्यामध्ये 10 वर्षांपर्यंतच्या मुलीच्या नावाने खाते उघडता येते. कोणतेही पालक त्यांच्या मुलीच्या नावावर 250 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत सध्या ८ टक्के व्याज दिले जाते.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट स्कीम

महिलांसाठी गुंतवणूक करण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. या योजनेत तुम्हाला दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागेल. पाच वर्षांच्या या योजनेवर ७.५ टक्के व्याज मिळते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

ही योजना महिलांसाठी गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. ज्यामध्ये किमान रु. 1000 ते रु. पर्यंत कोणतीही रक्कम जमा केली जाऊ शकते. या ठेवीवर ७.७ टक्के व्याज दिले जाते. गुंतवणूकदार पाच वर्षांच्या कालावधीसाठी यामध्ये गुंतवणूक करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe