Upcoming IPO : IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी आहे. या आठवड्यात 4 कंपन्यांचे IPO उघडणार आहेत. RR केबल, Samhi Hotels, Zaggle Prepaed Ocean Services आणि Chavda Infra चे IPO उघडणार असून, जे गुंतवणूकदार IPO मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
R R Kable IPO

हा IPO, 13 सप्टेंबर 2023 रोजी उघडणार आहे. गुंतवणूकदारांना या IPO वर 15 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकता. हा IPO 12 सप्टेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. RR केबलच्या IPO चा प्राइस बँड 983 रुपये ते 1035 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. कंपनी IPO च्या माध्यमातून 1964 रुपये उभारण्याचा प्रयत्न करेल.
Samhi Hotels IPO
14 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2023 या कालावधीत गुंतवणूकदार या SME IPO घेऊ शकतील. कंपनीने 1200 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आणि 1.35 कोटी शेअर्स विक्रीसाठी जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या कंपनीच्या आयपीओची प्राइस बँड अद्याप ठरलेली नाही. येत्या काही दिवसांत कंपनी प्राइस बँडची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे.
Zaggle Prepaid Ocean Sevices IPO
हा IPO 14 सप्टेंबर रोजी उघडेल. आयपीओ 18 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूकदारांसाठी खुला राहील. गुंतवणूकदार 13 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीच्या IPO वर बेट लावू शकतील. या कंपनीच्या IPO ची किंमत बँड अजून जाहीर झालेली नाही.
Chavda Infra IPO
गुजरातस्थित या कंपनीचा IPO 43.26 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. कंपनीने 60 ते 65 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. गुंतवणूकदार 12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीत IPO वर सट्टा लावू शकतील.