Reduce Electricity Bill Tips:- आजकाल महागाई भरमसाठ वाढलेली असून या मागच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला अनेक प्रकारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. अगदी दैनंदिन वापराच्या वस्तूंचे दर देखील गगनाला पोहोचलेले असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे नाकीनऊ आल्याची सद्यस्थिती आहे.
जर आपण महिन्याचा होणार आहे एकूण खर्च पाहिला तर तो फार मोठ्या प्रमाणावर आहे व यामध्ये प्रमुख खर्च हा दर महिन्याचे जे काही विज बिल आपल्याला भरावे लागते त्यासाठी होतो. कारण विजेचा वापर सध्या भरमसाठ वाढलेला आहे.कारण घरामध्ये विद्युत उपकरणे वापरले जातात व त्यामुळे विज बिल वाढते.

साहजिकच या वाढत्या विज बिलाचा बोजा हा नागरिकांवर प्रचंड प्रमाणात येतो. जास्त करून घरामध्ये एसी तसेच कुलर, फॅन, वाशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटर सारखे उपकरणे मोठ्या प्रमाणावर वापरले जातात व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विज बिल येते. परंतु तुम्ही काही गोष्टींची जर काळजी घेतली तर तुमचे महिन्याचे विज बिल निम्म्यावर येऊ शकते.
या टिप्स वापरा आणि विज बिल अर्ध्यावर आणा
1- जेव्हा ही उपकरणे चार्ज झाल्यानंतर मुख्य स्विच बंद करावा– घरातील फोन चार्जर आणि लॅपटॉप चार्जर सारखे उपकरणे आपण नेहमी इलेक्ट्रिक बोर्डला कनेक्ट केलेले असतात. त्यामुळे विजेचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो.
तुम्ही जर अशा प्रकारे चार्जर नेहमी कनेक्ट ठेवून चालू ठेवले तर विजेचा वापर सुरूच राहतो. याकरता तुम्ही आठवणीने स्मार्टफोन किंवा लॅपटॉप चार्ज झाल्यावर बोर्ड सॉकेट मधून चार्जर काढून टाकावे.
2- टीव्हीला कधीही स्टॅन्डबाय मोड मध्ये ठेवू नका– बरेचदा आपण रिमोटने टीव्ही बंद करतो आणि त्याचा स्विच पूर्णवेळ चालूच राहतो. या परिस्थितीला आपण स्टँड बाय मोड असे देखील म्हणतो.
जर तुम्ही टीव्हीला स्टँड बाय मोड ठेवले तर त्याचा विद्युत प्रवाह वाया जातो आणि विजेचा वापर वाढू शकतो. त्यामुळे टीव्ही कधीही स्टँडबाय मोडला ठेवू नये.
3- 5 स्टार रेटेड विद्युत उपकरणे खरेदी करा– जर तुम्हाला भरपूर प्रमाणात विजेची बचत करायची असेल तर तुम्ही नेहमी पाच स्टार रेटेड असलेली विद्युत उपकरणे खरेदी करणे गरजेचे आहे.
अशा प्रकारचे विद्युत उपकरणे तुम्ही खरेदी करून वीज वापर 40 टक्क्यांनी कमी करू शकतात व तुमचा विजेचा खर्च कमी होतो. कितीही केले तरी कमीत कमी 30 टक्के तरी विजेची बचत तुम्ही करू शकतात.
4- घरातील बल्ब आणि ट्यूबलाइटवर साचलेली धूळ स्वच्छ करणे– आम्ही तुम्हाला सांगतो की, बल्ब आणि ट्यूबलाइट इत्यादी वस्तूंवरचा धूळ असेल तर ती साफ करून घेणे गरजेचे आहे. कारण धुळीमुळे बऱ्याचदा घरात कमी प्रकाश मिळतो आणि त्यामुळे आपण बऱ्याचदा जास्त बल्ब लावण्याचा प्रयत्न करतो.
5- सौर पॅनलचा वापर करा– तसेच तुम्ही सरकारी योजनेचा फायदा घेऊन सोलर पॅनल बसवू शकतात व त्या माध्यमातून तयार झालेल्या विजेचा वापर घरासाठी करू शकतात. याकरिता तुम्ही पंतप्रधान सूर्यादय योजनेकरिता अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊन सोलर पॅनल बसवू शकतात.













