अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- होंडाकडे अशा अनेक बाईक्स आहेत ज्या तरुणांना खूप आवडतात. होंडा एसपी 125 चीही एक खास ओळख आहे. या बाईकला फार थोड्या दिवसात लोकप्रियता मिळाली आहे. या बाईकवर कंपनी एकाच वेळी अनेक ऑफर देत आहे. चला जाणून घेऊया …
किंमत काय आहे ? :- देशाची राजधानी दिल्लीत होंडा एसपी 125 ची एक्स-शोरूम किंमत 76 ते 81 हजार रुपयांपर्यंत आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार एसपी 125 DRUM ची एक्स शोरूम किंमत 76,074 रुपये आहे. याशिवाय एसपी 125 DISC ची किंमत 80,369 रुपये आहे.

ऑफर काय आहे ?:- Honda SP125 वर बर्याच मोठ्या ऑफर्स आहेत. कोणत्याही डाउनपेमेंट शिवाय आणि कागदपत्रांशिवाय आपण ही बाइक घरी घेऊन जाऊ शकता. याशिवाय डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ईएमआयवर 5000 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक उपलब्ध आहे. तथापि, ही ऑफर केवळ काही खास बँकांच्या कार्डवर उपलब्ध असेल. या बँकांमध्ये येस बँक, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, स्टँडर्ड चार्टर्ड आणि फेडरल बँक यांचा समावेश आहे.
बाईकचे फीचर्स :- Honda SP125 मध्ये 125 सीसी, इंधन-इंजेक्टेड इंजिन आहे. बाईकमध्ये शार्प असणारी नवीन एलईडी हेडलॅम्प सेटअप, नवीन 5-स्पोक अॅलॉय व्हील्स आणि क्रोम शील्डसह एक नवीन एक्झॉस्ट मिळेल. बाईकचा रियर लुक बर्यापैकी बोल्ड आहे. मस्क्युलर फ्यूल टॅंक, एक स्पोर्टी लुक असलेले ग्राफिक्स आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved