काय सांगता… चक्क 1 इंटरव्यू घेण्यासाठी मोजले 51 कोटी रुपये

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-सोशल मीडियावर सध्या एक मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. ब्रिटीश राजपुत्र हॅरी आणि राणी मेगन यांची ही मुलाखत असून ही मुलाखत एका वेगळ्या कारणासाठी गाजली.

या रॉयल फॅमिलीची ज्या व्यक्तीने मुलाखत घेतली होती तीचे नाव आहे ओप्रा विन्फ्रे… जी मुलाखत घेण्यासाठी जगप्रसिध्द आहे. दरम्यान सीबीएसने चॅनलने ही मुलाखत घेण्यासाठी होस्टला किमान 51 कोटी रुपये दिले.

हे वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात नुसार समोर आले. हॅरी आणि मेगन हे एका राज घराण्यातील जोडपं आहे, त्यामुळे प्रसारण मुलाखतींसाठी अधिकार खरेदी करण्यासाठी सीबीएस चॅनलने प्रसिद्ध होस्ट ओप्रा विन्फ्रे यांना 51 कोटी ते 65 कोटी रुपये दिले, अशी माहिती समोर आली आहे.

हॅरी आणि मेगन यांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचे मानधन दिलेलं नाही. टॉक शो ओप्रा विन्फ्रे हा तिचा प्रसिध्द शो आहे. त्यात तिनं आतापर्यत जगातील वेगवेगळ्या प्रसिध्द लोकांची मुलाखत घेतली आहे.

ज्यावेळी रॉयल फॅमिलीतील हॅरी आणि मेगननं ओप्राला मुलाखत दिली तेव्हा त्या मुलाखतीनं सगळ्यांना हादरवून सोडलं होतं. त्यात शाही रॉयल परिवारावर गंभीर आरोप करण्यात आले होते.

त्या मुलाखतीचे प्रसारण अमेरिकेतील सीबीसी या चॅनेलवरुन करण्यात आले होते. आता त्याची चर्चा ब्रिटन पासून अमेरिकेपर्यत जवळपास अनेक देशांमध्ये सुरु आहे.

मुलाखत घेणारी ओप्रा विन्फ्रे आहे तरी कोण? :- ओप्रा विन्फ्रे ह्या 67 वर्षाच्या टॉक शो होस्ट, टीव्ही प्रॉड्यूसर, अभिनेत्री, लेखिका अशा विविध कामांसाठी ओळखल्या जातात.

फोर्ब्स magazine च्या अहवालनुसार ओपरा विनफ्री या 19 हजार 700 कोटी रुपयांच्या मालकीण आहेत, त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आहे.

त्यांच्या आयुष्याची सुरवात त्यांनी खूप कठीण परिस्थितीतून केली. ओप्रा विन्फ्रे यांनी, हॅरी आणि मेगन सोबत होस्ट केलेला Interview रविवारी रात्री 8 वाजता (अमेरिकन वेळेनुसार) सीबीएस चॅनलवर दाखवला गेला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe