चेक बाउन्स झाला तर काय करावे ? तज्ञ लोकांनी स्पष्टच सांगितलं

Ahmednagarlive24 office
Published:
Cheque Bounce

Cheque Bounce : अलीकडे छोट्या-मोठ्या सर्वच पेमेंटसाठी यूपीआय पेमेंट एप्लीकेशनच्या माध्यमातून व्यवहार केले जात आहेत. यासाठी विविध डिजिटल पेमेंट एप्लीकेशन विकसित झाले आहेत. फोन पे, गुगल पे, अमेझॉन पे, पेटीएम यांसारख्या अप्लिकेशनच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट केले जात आहे.

विशेषता शासनाने जेव्हापासून कॅशलेस इकॉनोमीला चालना देण्यास सुरुवात केली आहे तेव्हापासून या एप्लीकेशनचा वापर अधिक वाढला आहे. यूपीआय पेमेंटसोबतच अलीकडे चेकने पेमेंट करणाऱ्यांची संख्या देखील मोठी वाढली आहे. अनेकदा मोठ्या पेमेंटसाठी चेकचा वापर केला जातो.

अनेक लोक चेकच्या माध्यमातून पेमेंट करतात आणि पेमेंट स्वीकारतात. चेकने पेमेंट करणाऱ्यांचे काही प्रश्न देखील आहेत. अनेकांच्या माध्यमातून जर समोरच्या पार्टीने दिलेला चेक बाउन्स झाला तर काय केले पाहिजे ? असा सवाल उपस्थित केला जात होता.

जर तुम्हीही कधी चेकच्या माध्यमातून पेमेंट घेतलेले असेल आणि समोरच्याने दिलेला चेक बाऊन्स झाला असेल ? तर अशा व्यक्ती विरोधात काय कारवाई होऊ शकते, असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच उपस्थित झाला असेल. यामुळे आज आपण याच प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण चेक बाउन्स झाला तर काय करावे याविषयी माहिती पाहणार आहोत.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला चेक दिला असेल आणि तो चेक बाउन्स झाला असेल आणि पैसे देतो-देतो असे सांगत असेल तर तुम्ही त्याला 30 दिवसाच्या आत लीगल नोटीस पाठवायला हवी. तीस दिवसांच्या आत लीगल नोटीस पाठवल्यानंतर तुम्ही 15 दिवस सदर व्यक्ती पैसे देतो की नाही याची वाट पहा.

जर समजा सदर व्यक्तीने लीगल नोटीस पाठवूनहीं पैसे दिले नाहीत तर मग त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. अशा व्यक्ती विरोधात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 च्या कलम 138 नुसार गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe