8th Pay Commission : 8 व्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी ? किती वाढेल पगार ? वाचा माहिती

Ajay Patil
Published:

8th Pay Commission :- केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेल्या महागाई भत्ता नुकताच चार टक्क्यांनी सरकारने वाढवला असून आता तो 42 वरून 46 टक्के झालेला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारे महागाई भत्ता किंवा घरभाडे भत्ता आणि विविध प्रकारच्या सोयी आणि सवलती या प्रामुख्याने सातव्या वेतन आयोग अंतर्गत दिल्या जातात.

सातव्या वेतन आयोगानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांची आठवा वेतन आयोग लागू करण्यासंबंधीची मागणी असून मागिल काही दिवसापूर्वी आठव्या वेतन आयोग लागू करण्यासंबंधी सरकारचा कुठलाही विचार नसल्याचे स्पष्ट झाले होते.

परंतु सातव्या वेतन आयोगानंतर आठवा वेतन आयोग आणला जाऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. याविषयीचेच महत्त्वपूर्ण अपडेट या लेखात बघू.

8 वा वेतन आयोग होणार लागू?

केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता पुढील वर्षी आनंदाची बातमी येण्याची शक्यता असून ही बातमी वेतन आयोगाशी संबंधित असणार आहे. यासंबंधी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सातव्या वेतन आयोगानंतर आता आठवा वेतन आयोग आणला जाऊ शकतो.

याबाबत मात्र सरकारकडून अद्याप कुठल्याही प्रकारची औपचारिक वक्तव्य करण्यात आलेले नाही. परंतु सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत चर्चा सुरू झाली आहे व पुढील वर्षी मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता मोठी घोषणा करू शकते अशी देखील अपेक्षा आहे.

आठव्या वेतन आयोगाबाबत दिल्लीमध्ये कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे आंदोलन सुरू आहे. महिनाभरामध्येच सरकारने पुढील वेतन आयोगाबाबत परिस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

सरकारने यावर निर्णय घेतल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान पगारांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत आठवा वेतन आयोग येणार नाही अशी साधारणपणे चर्चा होती. परंतु त्याबाबत हालचाली किंवा चर्चा सुरू असल्याची सध्या माहिती समोर येत आहे. सरकारच्या माध्यमातून याला अजून कुठल्याही प्रकारचा दुजोरा देण्यात आलेला नाही. या प्रश्नाकडे सरकार लक्ष देत असल्याचे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

यासंदर्भात जर आपण सूत्रांवर विश्वास ठेवला तर 2024 मध्ये भारतात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत व त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग स्थापन करण्याबाबत चर्चा होऊ शकते. परंतु पुढच्या वर्षी नेमके कधी आठवा वेतन आयोग स्थापन केला जाईल हे सांगणे जरा घाईचे ठरेल.

मात्र आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो. तसेच आयोगाकरिता कोणतेही पॅनल तयार करण्याची गरज नसावी या बाजूने सरकार आहे व त्यापेक्षा वेतन आयोगातच वेतन सुधारण्याचे नवे सूत्र असावे याबाबत देखील विचार सुरू आहे.

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?

सूत्रांवर विश्वास ठेवला तर 2024 मध्ये आठवा वेतन आयोग स्थापन केला जावा त्यानंतर दीड वर्षात त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते जर असे झाले तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेमध्ये आठव्या वेतन आयोगात अनेक बदल होऊ शकतात. महत्वाच्या अशा फिटमेंट फॅक्टरच्या बाबतीत देखील काही बदल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सरकारच्या माध्यमातून दहा वर्षातून एकदा वेतन आयोग स्थापन केला जातो.

कर्मचाऱ्यांच्या पगारात किती होणार वाढ?

सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेत आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार असून सर्व काही सुरळीत राहिल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर 3.68 पटीने वाढेल. तसेच वेतन निश्चितीचा फार्मूला कुठलाही असला तरी मूळ वेतनात 44.44% वाढ होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe