Business Idea:- व्यवसाय करायचे म्हटले म्हणजे सगळ्यात अगोदर गुंतवणुकीसाठी पैसा आवश्यक असतो. कारण कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला अगोदर त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते व त्यानंतर आपल्याला व्यवसाय सुरू करता येतो.
व्यवसायामध्ये करावे लागणाऱ्या गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून बघितले तर आपल्याला व्यवसायांवर गुंतवणुकीचे प्रमाण कमी जास्त होताना दिसते. तसेच दुसरे म्हणजे तुम्ही जो व्यवसाय सुरू करणार आहात तो छोट्या स्तरावर सुरू करणार आहात की मोठ्या स्तरावर सुरू करणार आहात? यावर देखील गुंतवणुकीचे प्रमाण किंवा गुंतवणुकीची स्वरूप अवलंबून असते.
व्यवसायामध्ये असे अनेक व्यवसाय आहेत की तुम्ही अगदी कमीत कमी गुंतवणुकीत देखील त्या माध्यमातून लाखोत नफा महिन्याला मिळवू शकतात. यासाठी तुम्हाला फक्त बाजारपेठेत चांगली मागणी असणाऱ्या व्यवसायाची निवड करणे गरजेचे असते. कमीत कमी गुंतवणुकीत सुरू करता येतील अशा व्यवसायांची यादी खूप मोठी आहे.
आता त्यामधून नेमक्या व्यवसायाची निवड करणे खूप गरजेचे असते व तरच आपल्याला त्या माध्यमातून पैसा कमावता येईल.या लेखामध्ये आपण अशा एका व्यवसायाची माहिती घेणार आहोत जो सुरू करण्यासाठी तुम्ही कमीत कमी भांडवलात सुरू करू शकतात व चांगला नफा मिळवू शकतात.
50 हजार रुपये गुंतवणुकीत सुरू करा एलईडी बल्ब बनवण्याचा व्यवसाय
एलईडी बल्ब आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर एलईडी बल्बचा वापर प्रत्येक घरामध्ये होतो. असे म्हटले जाते की या एका एलईडी बल्बचे आयुष्य साधारणपणे पन्नास हजार तास किंवा त्यापेक्षा जास्त असते व हे बल्ब रिसायकल करता येतात. सीएफएल बल्ब प्रमाणे यामध्ये पारा नसतो व त्यामधील लिड आणि निकेल यासारख्या घटकांचा समावेश केलेला असतो.
या सगळ्या कारणांमुळे एलईडी बल्बचा वापर हा दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे. विशेष म्हणजे विजेची बचत करण्याच्या दृष्टिकोनातून एलईडी बल्ब फायद्याचे असल्याने कमीत कमी वीज बिल येण्याच्या दृष्टिकोनातून देखील एलईडी बल्बचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसून येत आहे.त्यामुळे एलईडी बल्ब बनवण्याचा व्यवसाय खूप फायद्याचा ठरू शकतो. विशेष म्हणजे यासाठीचे ट्रेनिंग देखील सरकारच्या माध्यमातून दिले जाते.
एलईडी बल्ब बनवण्याचे ट्रेनिंग कुठे घेता येते?
तुम्ही कमीत कमी गुंतवणूक करून देखील हा व्यवसाय सुरू करू शकतात. एलईडी बल्ब बनवण्याची ट्रेनिंग तुम्हाला घ्यायची असेल तर मिनिस्ट्री ऑफ मायक्रो, स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजेस अंतर्गत अनेक संस्था एलईडी बल्ब बनवण्याचे प्रशिक्षण देतात. तसेच आता स्वयंरोजगार कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील एलईडी बल्ब बनवण्याची ट्रेनिंग दिली जाते.
तसेच ज्या कंपन्या एलईडी बल्ब बनवतात त्या सुद्धा ट्रेनिंग उपलब्ध करून देतात. या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला एलईडी बल्बचे बेसिक नॉलेज तसेच एलईडी ड्रायव्हर, फिटिंग अँड टेस्टिंग आणि बेसिक ऑफ पीसीबी, आवश्यक साहित्याची खरेदी तसेच बल्ब बनवल्यानंतर विक्रीसाठीची मार्केटिंग आणि सरकारचे अनुदान इत्यादीबद्दल सगळी माहिती दिली जाते.
तुम्हाला जर छोट्या स्तरावर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही अगदी पन्नास हजार रुपयांमध्ये सुरू करू शकतात. कुठलेही दुकान न थाटता तुम्ही घरच्या घरी देखील आरामात याची सुरुवात करू शकतात.
एक एलईडी बल्ब बनवण्यासाठी किती येतो खर्च आणि किती मिळते उत्पन्न?
साधारणपणे एक एलईडी बल्ब बनवण्याकरिता पन्नास रुपये इतका खर्च येतो. परंतु जर त्याची बाजारातील विक्री पाहिली तर ती 100 रुपयापर्यंत विक्री केली जाते व एका बल्बवर दुप्पट नफा मिळतो.
या आकडेवारीनुसार जर आपण हिशोब घेतला तर एका दिवसात जर शंभर बल्ब बनवले व त्यांची विक्री केली तर पन्नास हजार रुपयांचे थेट उत्पन्न आपण एका दिवसात मिळवू शकतो
व अशा परिस्थितीत त्या महिन्याला एक लाख 50 हजार रुपये पर्यंत कमाई करता येणे या व्यवसायातून शक्य आहे. त्यामुळे तुम्हाला जर कमीत कमी भांडवलात व्यवसाय सुरू करायचा असेल तर एलईडी बल्ब बनवण्याचा व्यवसाय हा एक बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी ठरू शकतो.