Women Business Idea:- देशातील महिलांचा विचार केला तर आता पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे असून अगदी संरक्षण क्षेत्रापासून तर विमानाचे पायलट, संशोधन क्षेत्र, प्रशासकीय अधिकारी अशा प्रत्येकच क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने कामे करत आहेत.
एवढेच नाहीतर अनेक उद्योग व्यवसायामध्ये देखील महिलांनी उंच भरारी घेतलेली असून अनेक स्टार्टअप देखील महिलांनी यशस्वी करून दाखवलेले आहेत. परंतु अजून देखील बऱ्याच महिला या गृहिणी असून घरकाम करून अशा महिलांकडे खूप मोठ्या प्रमाणावर वेळ शिल्लक राहतो.
त्यामुळे अशा महिलांच्या मनामध्ये काहीतरी व्यवसाय घरबसल्या करता येईल का व त्या माध्यमातून कुटुंबाला काही आर्थिक हातभार लागेल का याबाबतीत मनात कायम विचार सुरू असतो. परंतु घराचे काम आटोपून घरबसल्या असा कुठला व्यवसाय करता येईल की ज्यायोगे आपल्याला चांगला पैसा मिळू शकेल? याबाबतीत मात्र गोंधळ उडताना दिसतो. त्यामुळे या लेखामध्ये आपण असे काही व्यवसाय पाहणार आहोत ज्या माध्यमातून महिला घरचे काम करून चांगल्या प्रकारे पैसा घरबसल्या मिळवू शकतात.
महिला हे व्यवसाय करून घरबसल्या कमवू शकतात चांगला पैसा
1- घरातून साडी विकण्याचा व्यवसाय– भारतामध्ये 66 कोटींपेक्षा जास्त महिला असून महिलांचे साडी हे मुख्य वस्त्र आहे. भारतातील सर्व महिला मोठ्या प्रमाणावर साड्या वापरतात म्हणूनच तुम्ही 25 ते 30 हजार रुपयांची गुंतवणूक करून घरामधून साडी विकण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात.
याकरिता जर तुम्ही सुरत, बेंगलोर, मुंबई, दिल्ली इत्यादी ठिकाणी होलसेल मध्ये साड्या खरेदी केल्या आणि घरी बसून त्यांची विक्री केली तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने या माध्यमातून पैसा मिळवू शकतात.
2- बेबीसिटिंग व्यवसाय– आजकाल आपण पाहतो तर शहरांमध्ये पती-पत्नी दोघेही नोकरी निमित्त बाहेर असतात. अशावेळी त्यांच्या मुलांची काळजी कशी घ्यायची हा प्रश्न त्यांच्या समोर असतो. त्यामुळे मोठ्या शहरातील अनेक महिला मुलांचा सांभाळ करून दर महिन्याला चांगले पैसे मिळवतात.
यामध्ये तुम्ही घरी बसून मुलांचे काळजी घेण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात व याकरिता तुम्हाला कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची गरज नसते. जेव्हा हा व्यवसाय चांगला सुरू होतो तेव्हा तुम्ही इतर महिलांना देखील कामावर यासाठी घेऊ शकतात. यामध्ये भविष्यातील सगळ्यात मोठी संधी म्हणजे तुम्ही स्वतःची नर्सरी शाळा देखील सुरू करू शकतात.
3- होम लॉन्ड्री सर्विस– मोठे शहरांमध्ये नोकरी किंवा व्यवसायामुळे लोक घरापासून दूर असतात. त्यामुळे अशा लोकांना नेहमीच लॉन्ड्री सेवेची आवश्यकता असते. आजकाल अनेक जोडपे आणि कुटुंबातील सदस्य देखील कपडे धुण्याची म्हणजेच लॉन्ड्री सेवा वापरत असतात. त्यामुळे तुम्ही घराच्या एका छोट्याशा खोलीमध्ये लॉन्ड्री सुरू करू शकतात. सध्या बाजारामध्ये या सेवेला खूप मागणी आहे. त्यामुळे या माध्यमातून तुम्हाला ग्राहक देखील चांगले मिळतात.
4- कृत्रिम दागिन्यांची विक्री– भारतातील महिलांचा विचार केला तर महिलांना दागिन्याची खूप मोठी आवड असते. त्यातल्या त्यात सध्या सोन्या-चांदीचे दागिने खूप महाग झाल्यामुळे बऱ्याच महिला या आर्टिफिशियल ज्वेलरी वापरतात. कारण हे कृत्रिम दागिने टिकाऊ आणि स्वस्त असतातच परंतु वापरण्यास देखील सुरक्षित असतात.
त्यामुळे तुम्ही कृत्रिम दागिने घाऊक मध्ये खरेदी करू शकता व ते घरी बसून विकू शकतात. तसेच भविष्यात ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या वेबसाईटवर आर्टिफिशियल ज्वेलरी ऑनलाइन विकू शकता किंवा याचे स्वतःचे दुकान देखील सुरू करू शकतात.
5- ब्रेकफास्ट कॉर्नर– तुम्ही नाश्ता केंद्र देखील सुरू करू शकता व हा व्यवसाय खूप सोपा असून महिलांसाठी हा व्यवसाय सुरू करायला काहीही समस्या येऊ शकत नाही. कारण महिला वर्गात स्वयंपाकाविषयी उत्तम कौशल्य असते व या कौशल्याचा वापर करून भरपूर पैसा मिळवता येतो.
जर आपण शहरांचा विचार केला तर या ठिकाणी छोटी नाश्ता केंद्र म्हणजेच ब्रेकफास्ट सेंटर प्रत्येक महिन्याला लाखो रुपये कमवतात. तुम्ही या करता एखादे छोटेसे दुकान भाड्याने घेऊन स्वतःचे ब्रेकफास्ट सेंटर म्हणजेच नाष्टा केंद्र सुरू करू शकता व चांगला पैसा मिळवू शकता.
6- गिफ्ट स्टोअर– आजकाल अनेक कार्यक्रमानिमित्त किंवा सणासमारंभा निमित्त अनेक वस्तू गिफ्ट देण्याचा ट्रेंड खूप लोकप्रिय झाला आहे. अगदी कॉर्पोरेट क्षेत्रात देखील एकमेकांना भेटवस्तू दिले जातात. यामध्ये लग्न असो किंवा वाढदिवस, लग्न असो किंवा कोणताही सण लोक आनंदाने एकमेकांना गिफ्ट देतात. त्यामुळे या संधीचे सोने करण्याच्या उद्दिष्टाने तुम्ही स्वतःची गिफ्ट शॉप सुरू करू शकता व या शॉपमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट म्हणजेच भेटवस्तू विकून चांगले पैसे कमवू शकतात.
अशा पद्धतीने तुम्ही हे व इतर व्यवसाय करून घरी बसून चांगला पैसा मिळवू शकतात.