तुम्ही 35 व्या वर्षी गुंतवणुकीला सुरुवात करून देखील होऊ शकतात कोट्याधीश! फक्त करा ‘हे’ काम

तुम्ही उशिराने जरी गुंतवणूक करायला सुरुवात केली तरी यामध्ये फार मोठा फरक पडत नाही. अगदी 35 व्या वर्षी गुंतवणूक सुरू करून देखील एक कोटी रुपयांचा निधी सहज तयार करता येऊ शकतो. परंतु याकरिता फक्त योग्य गुंतवणूक प्लॅन असणे गरजेचे आहे.

Ajay Patil
Published:
investment plan

आपल्याला मोठ्या संख्येने असे अनेक व्यक्ती दिसून येतील की त्यांचे वय 30 ते 40 वर्षाच्या दरम्यान आहे व त्यांनी अजून पर्यंत देखील गुंतवणुकीला सुरुवात केलेली नाही व आता ते या वयाच्या कालावधीमध्ये गुंतवणूक सुरू करण्याचा विचार करत आहेत व त्यांना या वयात गुंतवणूक सुरू करून कोट्यावधी रुपयांचा फंड तयार करायचा आहे.

परंतु ते आता या वयात गुंतवणूक करून शक्य आहे का? हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. परंतु जर या प्रश्नाचे उत्तर बघितले तर तुम्ही उशिराने जरी गुंतवणूक करायला सुरुवात केली तरी यामध्ये फार मोठा फरक पडत नाही. अगदी 35 व्या वर्षी गुंतवणूक सुरू करून देखील एक कोटी रुपयांचा निधी सहज तयार करता येऊ शकतो. परंतु याकरिता फक्त योग्य गुंतवणूक प्लॅन असणे गरजेचे आहे.

 म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक करू शकते हे शक्य

1- म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना या गोष्टी लक्षात ठेवा बरेच व्यक्ती हे केवळ मागील परतावा डोक्यात ठेवून म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करतात. परंतु आपल्याला हे माहिती असणे गरजेचे आहे की म्युच्युअल फंड योजना या हमी किंवा खात्रीशीर परताव्याच्या नसून यामध्ये काही प्रकारच्या जोखीम देखील असू शकतात.

म्युच्युअल फंड मध्ये जो काही पैसा गुंतवलेला असतो तो पैसा मार्केट तज्ञांनी पूर्णपणे संशोधन करून अनेक ठिकाणी गुंतवलेला असतो. सगळ्यात अगोदर ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

2- म्युच्युअल फंडमधील योग्य योजना शोधण्यासाठी रिसर्च करणे तुम्ही जर 35 वर्षाचे असाल आणि एक कोटी रुपयांचा निधी तुम्हाला जमा करायचा असेल तर याकरिता तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल

तर तुम्हाला एसआयपीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला सातत्याने एका निश्चित रकमेची गुंतवणूक करणे गरजेचे राहील व याकरिता निश्चितच तुम्हाला एक चांगली योजना निवडावी लागेल. म्हणून अशा योजनांची निवड करताना तुम्ही योग्य प्रकारे रिसर्च म्हणजे संशोधन करणे गरजेचे राहील.

 35 व्या वर्षी गुंतवणूक करून तुम्ही एक कोटी कसे जमा करू शकाल?

साधारणपणे म्युच्युअल फंड एसआयपी दीर्घकालीन गुंतवणुकीवर 12 टक्के वार्षिक परतावा देते. या आधारे जर आपण एसआयपी कॅल्क्युलेटर नुसार बघितले तर त्याच्या 35 व्या वर्षी जर एखाद्या गुंतवणूकदाराने प्रत्येक महिन्याला  5300 रुपयांची गुंतवणूक एसआयपीमध्ये केली तर पुढील 25 वर्षात एक कोटी रुपयांचा निधी तयार होईल.

पंचवीस वर्षानंतर त्याचे एकूण जमा रक्कम एक कोटी 57 लाख 466 रुपये होईल. या एकूण रकमेमध्ये 15 लाख 90 हजार रुपये तुम्ही गुंतवाल व  तुम्हाला 84 लाख 67 हजार 466 रुपयांचा अंदाजे परतावा मिळेल.

म्युच्युअल फंड योजनेमध्ये जर 12 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला तर तुम्ही 25 वर्षाच्या आधीच एक कोटी रुपयांची बचत करू शकतात. परंतु ह्या कॅल्क्युलेटरनुसार आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे की या ठिकाणी गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा 12% इतका धरण्यात आलेला आहे. जो कमी किंवा जास्त देखील होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe