Investment Tips: ‘हे’ आहे 10 ते 20 रुपयांमध्ये करोडपती होण्याचे सूत्र! वाचा संपूर्ण माहिती

Ajay Patil
Published:
investment tips

Investment Tips:- प्रत्येकाला  आयुष्यामध्ये श्रीमंत व्हायचे असते व त्याकरिता प्रत्येक व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करत असतो व या माध्यमातून पैसा जास्तीत जास्त कसा कमावता येईल या दृष्टीने प्रयत्नशील असतो.

परंतु यामध्ये तुम्ही किती पैसा कमावता यापेक्षा कमावलेला पैशांची बचत आणि त्या बचतीची गुंतवणूक कशी करता याला खूप महत्त्व आहे. बरेचदा आपण पाहतो की दहा ते वीस हजार रुपये पगार कमावणारा व्यक्ती हा महिन्याला 35 हजार रुपये कमावणाऱ्या व्यक्ती पेक्षा जास्त श्रीमंत असल्याचे आपल्याला दिसून येते. कारण या व्यक्तींनी दुसरे असे काहीच केले नसते.

त्यांनी फक्त कमावलेल्या पैशाची व्यवस्थित बचत केलेली असते व या बचतीची गुंतवणूक चांगल्या ठिकाणी केलेले असते. त्यामुळे तुम्हाला देखील जर भविष्यामध्ये श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला देखील गुंतवणूक करावी लागते.

गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक ही खूप मोठ्या रकमेची करावी असं काही नसते. तुम्ही अगदी छोट्यातली छोटी रक्कम देखील चांगल्या योजनेमध्ये गुंतवली आणि त्यामध्ये सातत्य ठेवले तर काही वर्षांमध्येच तुम्ही लखपती ते करोडपती होऊ शकतात.त्यामुळे या लेखात तुम्ही अगदी दिवसाला दहा ते वीस रुपये गुंतवून कसे श्रीमंत होऊ शकतात? याबद्दलची माहिती बघू.

 कसे बनता येऊ शकते लखपती?

 तुम्हाला जर लखपती व्हायचे असेल तर तुम्ही किती कमाई करतात याला जास्त महत्व नसून तुम्ही जे काही कमावता त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करून तुम्ही लखपती होऊ शकतात.

अगदी छोट्या प्रमाणात गुंतवणूक करू शकतात व ही गुंतवणूक तुम्हाला योग्य दिशेने आणि दीर्घ कालावधीसाठी करावी लागेल. यामध्ये अगदी तुम्ही दररोज दहा ते वीस रुपये वाचवून देखील करोडपती किंवा लखपती होऊ शकतात.

 कसे होईल हे शक्य?

 याकरिता तुम्हाला दीर्घकालीन स्वरूपात गुंतवणूक करणे गरजेचे आहे. समजा तुम्ही दररोज दहा रुपयांची बचत केली तर एका महिन्यामध्ये तुम्ही 300 रुपये वाचवतात व या तीनशे रुपयांची तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी करणे गरजेचे आहे.

यामध्ये जर तुम्ही 35 वर्षांकरिता प्रत्येक महिन्याला तीनशे रुपयांची एसआयपी केली आणि त्यावर जर तुम्हाला 18% परतावा मिळाला तर या छोट्याशा  गुंतवणुकीवर 35 वर्षानंतर तुम्ही 1.1 कोटी रुपयांचे मालक व्हाल.

एवढेच नाही तर महिन्याला वीस ते पंचवीस हजार रुपये कमाई असणारा माणूस देखील करोडपती होऊ शकतो. याकरिता तुम्ही प्रत्येक महिन्याला पाचशे रुपयांपासून सुरुवात करू शकता. जर पाहिले तर प्रत्येक महिन्याला 1000 रुपये किंवा दोन हजार रुपयांचे बचत करणे काहीही अशक्य नाही.

अशा मध्ये जर वीस ते पंचवीस हजार रुपये कमाई असेल तर दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करून तुम्ही चांगल्या प्रकारे फंड तयार करू शकतात. यामध्ये फक्त तुम्हाला प्रत्येक महिन्याला एसआयपी सुरू ठेवायची आहे आणि पगार वाढल्यानंतर गुंतवणुकीत वाढ करायची आहे.

यामध्ये तुम्ही सुरुवात करताना तुमचे जे काही उत्पन्न आहे त्याच्या दहावा भाग गुंतवायचा आहे. म्हणजेच दहा हजार रुपये उत्पन्न असेल तर एक हजार रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवणे गरजेचे आहे.

 कोणत्या वयात गुंतवणूक करणे फायद्याचे राहील?

 तुम्ही जितक्या लवकरात लवकर गुंतवणूक करायला सुरुवात कराल तितके तुमचे लखपती किंवा करोडपती होण्याचे ध्येय गाठणे तुम्हाला सोपे जाईल. समजा वीस वर्षाचा तरुण आहे व दररोज 30 रुपयांची एसआयपी करत असेल तर तो त्याच्या वयाच्या साठ वर्षानंतर 12% व्याजाने 1.07 कोटी रुपये जमा करू शकतो.

या कालावधीमध्ये चार लाख बत्तीस हजार रुपयांची गुंतवणूक करणे गरजेचे आहे व 15 टक्के परतावा जर यावर मिळाला तर दोन कोटी ८२ लाख रुपयांचा फंड जमा होतो. तुम्ही वयाची चाळीशी ओलांडली असेल तरी देखील तुम्ही साठव्या वर्षापर्यंत एक कोटी रुपयांचा निधी जमा करू शकतात.

याकरिता तुम्हाला उरलेली वीस वर्ष जास्त प्रमाणामध्ये मात्र गुंतवणूक करावी लागेल. एक महिन्याला जर तुम्ही दहा हजार रुपयांची एसआयपी करत असाल तर वयाच्या साठव्या वर्षी 12% रिटर्न या दराने एक कोटी रुपये जमा करू शकतात व 15 टक्के परतावा मिळाला तर मात्र ही रक्कम दीड कोटी रुपये होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe