BOB Personal Loan: आधार कार्डचा वापर करून बँकेत न जाता बँक ऑफ बडोदा देईल 50 हजार ते 1 लाख रुपये पर्यंत कर्ज! कसे ते वाचा?

Ajay Patil
Published:
bob personal loan

BOB Personal Loan:- जेव्हा व्यक्तीला अचानकपणे मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज निर्माण होते तेव्हा व्यक्ती बँकांकडून पर्सनल लोन घेण्यासाठी अर्ज करतो. जवळपास सर्व बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोन दिले जाते व प्रत्येक बँकेचे यासंबंधी वेगवेगळे नियम व अटी असतात.

या नियम व अटींची पूर्तता करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोन दिले जाते. तसेच दुसरे म्हणजे सध्या तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये कर्ज घेणेदेखील एकदम सहज आणि सोपी गोष्ट झालेली आहे. अगदी मोबाईल नंबर व आधार कार्डचा वापर करून व त्यासोबत काही अटी पूर्ण करून घरी बसून कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो व काही कालावधीत लगेच बँकेत कर्जाची रक्कम देखील हस्तांतरित होते.

याच पद्धतीने तुम्हाला देखील जर पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुम्ही बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून घेऊ शकता व याकरिता फक्त तुमचा आधार कार्ड व मोबाईल नंबर आवश्यक असेल. तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे यामध्ये गरजेचे असते. याच अनुषंगाने या लेखात आपण बँक ऑफ बडोदा कडून पर्सनल लोन कसे घ्यावे व त्याचे नियम काय आहेत? याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

 पर्सनल लोनसाठी बँक ऑफ बडोदाच्या पात्रता अटी

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बँक ऑफ बडोदा कडून कर्ज घ्यायचे असेल तर तुमचे वय 18 ते 21 वर्षापेक्षा जास्त असावे.

2- सिबिल स्कोर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असावा.

3- बँक ऑफ बडोदा कडून घेतलेल्या पर्सनल लोन चा परतफेडचा कालावधी 12 ते 48 महिन्यांच्या दरम्यान असतो.

4- बँक ऑफ बडोदा कडून देण्यात येणाऱ्या पर्सनल लोनचा व्याजदर 9.99% आहे.

5- बँक ऑफ बडोदा च्या माध्यमातून पर्सनल लोन दिल्यानंतर त्यावर एक टक्के प्रक्रिया शुल्क आकारले जाते.

6- बँक ऑफ बडोदा पर्सनल लोन अंतर्गत तुम्ही 50000 पासून तर दहा लाख रुपये पर्यंत कर्ज घेऊ शकतात.

7- बँक ऑफ बडोदा कडून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर व्यक्तीचे किमान मासिक उत्पन्न पंचवीस हजार रुपये असणे गरजेचे आहे.

8- तसेच संबंधित व्यक्ती एक तर नोकरदार असावा किंवा व्यावसायिक असावा.

 बँकेत जाता घरी बसल्या करा कर्जासाठी ऑनलाईन अर्ज

1- याकरिता तुम्हाला बँक ऑफ बडोदा च्या www.bankofbaroda.in अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

2- त्यानंतर होमपेजच्या स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला लॉगिनचा पर्याय असेल व त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

3- त्यानंतर अर्ज करणाऱ्या युजरला त्याचा आयडी आणि पासवर्ड किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून त्या ठिकाणी लॉगिन करावे लागेल.

4- ही सगळी प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लोनचा पर्याय दिसतो व त्या ठिकाणी तुम्ही पर्सनल लोनवर क्लिक करावे.

5- यानंतर प्री अप्रुड पर्सनल लोनचा पर्याय तुमच्यासमोर उघडेल व त्यावर तुम्ही क्लिक करा.

6- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर परत एक पेज तुमच्यासमोर उघडेल व पुढील टप्प्यांमध्ये प्रोसिड या पर्यायावर क्लिक करावे.

7- या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.

8- त्यानंतर एक पेज उघडेल आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती टाकावी लागेल.

9- माहिती टाकल्यानंतर त्यावर एक ओटीपी पाठवला जाईल व तो तुम्हाला दिलेल्या जागेत नमूद करावा लागेल.

10- त्यानंतर तुम्हाला किती कर्ज हवे आहे ती रक्कम टाकावी आणि कर्ज परतफेड करण्याचा कालावधी निवडावा.

11- यापुढे तुम्हाला प्रोसिड या पर्यायावर परत क्लिक करावे लागेल.

12- त्यानंतर कर्जाच्या संबंधित अटी आणि शर्ती स्विकार करण्याच्या बटनावर क्लिक करावे लागेल.

13- या पद्धतीने अटी स्वीकारल्यानंतर तुम्हाला पुन्हा ओटीपी पाठवला जाईल व तो नमूद केल्यानंतर तुमची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होईल.

14- या सगळ्या प्रक्रिया नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल की कर्जासाठी मागितलेली रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केली जाईल.

अशा पद्धतीने तुम्ही बँकेत न जाता देखील ताबडतोब कर्ज मिळवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe