SBI FD Scheme:- आपण जो काही पैसा कमावतो त्या पैशांची केलेली बचत आणि त्या बचतीची गुंतवणूक ही बाब आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण जो काही पैसा कमावतो त्या पैशांची गुंतवणूक अगदी चांगल्या ठिकाणी करणे खूप गरजेचे असते.
सध्या जे काही गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकी सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजनांचा लाभ घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. यामध्ये जर आपण पाहिले तर बहुसंख्य गुंतवणूकदार गुंतवणूक करताना प्रामुख्याने बँकांच्या मुदत ठेव योजनांची निवड प्रामुख्याने करतात.

कारण परतावा आणि गुंतवणुकीची सुरक्षितता या दृष्टीने बँक हा विश्वासू पर्याय आहे. त्यामुळे बँकांच्या माध्यमातून देखील मुदत ठेव योजनांसाठी अनेक आकर्षक ऑफर दिल्या जातात. अगदी याच अनुषंगाने आपण स्टेट बँक ऑफ इंडियाची WeCare FD योजनेचा
विचार केला तर या माध्यमातून एसबीआय ने ग्राहकांना खास ऑफर दिली असून गुंतवणूकदारांचे पैसे यामध्ये दुप्पट होऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाची ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत आहे. याच योजनेविषयीची थोडक्यात माहिती आपण या लेखात घेऊ.
काय आहे एसबीआयची SBIWeCare FD योजना?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असून यामध्ये बँक कोणत्याही एफडी वर सामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अधिकची व्याज देते. सध्या या एसबीआय वूई केअर एफडी योजनेमध्ये 7.50% इतके व्याज देत आहे.
साधारणपणे या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना कमीत कमी पाच वर्षे तर जास्तीत जास्त दहा वर्षांसाठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. समजा या योजनेमध्ये जर गुंतवणूकदारांनी पाच लाख रुपये गुंतवले तर या योजनेच्या मॅच्युरिटीवर म्हणजेच ही योजना परिपक्व झाल्यानंतर दहा लाख रुपयांचा परतावा मिळेल.
म्हणजेच या योजनेतील गुंतवणुकीवर दिल्या जाणाऱ्या 7.5 टक्के व्याजदरानुसार दहा वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होतील. म्हणजे जर तुम्ही या योजनेत पाच लाख रुपये गुंतवले तर दहा वर्षांमध्ये 5.5 लाख रुपयांचे व्याज तुम्हाला मिळेल.
एसबीआयच्या माध्यमातून दहा वर्षाच्या नियमित एफडीवर 6.5% व्याज दिले जात आहे. साधारणपणे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एफडी वरचे व्याजदर हे साडेतीन टक्के ते 7.60 टक्क्यापर्यंत आहे.
स्टेट बँकेच्या माध्यमातून एसबीआय वूई केअर एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास साधारणपणे नियमित एफडी पेक्षा 0.30 टक्के जास्तीचे व्याज दिले जात आहे. तसेच या एफडी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला कर्जाची सुविधा देखील मिळू शकते.
या योजनेची अंतिम तारीख
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या महत्त्वपूर्ण असलेल्या या एफडी योजनेमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर यासाठीची अंतिम मुदत ही 31 मार्च 2024 पर्यंत आहे.