‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करा आणि वृद्धापकाळात स्वतःजवळ भरपूर पैसा ठेवा! म्हातारपण जाईल आरामात

Ajay Patil
Published:
investment scheme

जीवन जगताना वृद्धापकाळ म्हणजेच म्हातारपण हा कालावधी काहीसा संवेदनशील आणि तितकाच महत्त्वाचा असतो. कारण या टप्प्यामध्ये व्यक्तीचे शरीर थकलेले असते व त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचा कामधंदा होत नाही व त्यासोबतच या वयामध्ये अनेक शारीरिक व्याधींनी देखील व्यक्ती ग्रासले जाते.

त्यामुळे अशा या वयाच्या टप्प्यात व्यक्ती पैशांच्या बाबतीत कोणावर अवलंबून राहू नये याकरिता आतापासूनच पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. त्यामुळे म्हातारपणाच्या कालावधीत आर्थिक तंगी किंवा अडचण येऊ नये याकरिता जेष्ठ नागरिक एफडी सारख्या पर्यायांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात.

यामधून देखील चांगला परतावा मिळतो. परंतु या व्यतिरिक्त अशा काही योजना आहेत की ज्यामध्ये गुंतवणूक केली तर वृद्धापकाळाच्या कालावधीमध्ये चांगले पैसे मिळू शकतात व तुम्हाला पैशांच्या बाबतीत कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. अशाच महत्त्वाच्या गुंतवणूक योजनांची माहिती आपण या लेखात घेऊ.

 या योजनांमध्ये गुंतवणूक करा आणि आर्थिक दृष्टिकोनातून वृद्धापकाळ सुरक्षित करा

1- सीनियर सिटीजन सेविंग स्कीम सीनियर सिटीजन सेविंग स्कीम अर्थात जेष्ठ नागरिक बचत योजना ही एक सरकारी योजना असून या योजनेमध्ये पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. या योजनेच्या माध्यमातून गुंतवलेल्या पैशांवर 8.2 टक्क्यांनी व्याज मिळते व या योजनेत किमान 1000 रुपये तर कमाल 30 लाख रुपये गुंतवता येतात.

या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत आयकर कायदा कलम 80C अंतर्गत दीड लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर बचतीचा फायदा देखील मिळतो.

2- अटल पेन्शन योजना ही देखील एक सरकारी योजना असून 18 ते 40 वर्ष वयोगटातील नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास पात्र ठरतात. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे वय साठ वर्षे झाल्यानंतर गुंतवणूकदाराला एक हजार ते पाच हजार रुपये पर्यंत पेन्शनचा लाभ मिळतो. 18 ते 40 या वयाच्या कालावधीमध्ये तुम्ही या योजनेत किती गुंतवणूक केली आहे यावरून तुम्हाला किती पेन्शन मिळेल हे ठरते.

3- पोस्ट ऑफिस मंथली पेन्शन स्कीम पोस्ट ऑफिसची मासिक पेन्शन योजना म्हणजेच मंथली पेन्शन स्कीम ही एक महत्त्वाची योजना असून या योजनेअंतर्गत पाच वर्षापर्यंत पेन्शनचा लाभ मिळवता येतो. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 7.4% दराने व्याज मिळते

व यामध्ये तुम्ही किमान नऊ लाख आणि कमाल 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेच्या माध्यमातून एका व्यक्तीला कमाल 550 रुपये महिन्याला पेन्शनचा लाभ मिळतो व संयुक्त खाते असेल तर अशा खात्यावर कमाल नऊ हजार दोनशे पन्नास रुपये मासिक पेन्शन मिळते.

4- एसडब्ल्यूपी एसडब्ल्यूपी अर्थात सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन ही योजना देखील महत्त्वाची आहे व यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला महिन्याला निश्चित पेन्शनचा लाभ मिळतो.

परंतु ही योजना जरा जोखमीची असून बाजारातील चढउताराचा या योजनेवर परिणाम होतो. यामध्ये धोका असा आहे की जर बाजारामध्ये घसरण झाली तर गुंतवलेले पैसे बुडण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे जोखीम घ्यायची इच्छा असेल तरच या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe