रेल्वे प्लेटफॉर्मवर एखादे दुकान उघडा आणि महिन्याला लाखो कमवा! पण कसे उघडाल त्या ठिकाणी दुकान? कशी असते प्रक्रिया?

Ajay Patil
Published:
business idea

भारतीय रेल्वे हे वाहतुकीच्या दृष्टिकोनातून भारताची एक जीवन वाहिनी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. रेल्वेच्या माध्यमातून दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण रेल्वेने प्रवास करतो तेव्हा  कुठल्याही रेल्वे स्टेशनवर जेव्हा रेल्वे थांबते तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या प्लॅटफॉर्मवर अनेक वेगळ्या प्रकारचे दुकाने आपल्याला दिसून येतात

व यामध्ये खाद्यपदार्थांची विक्री करणारी दुकाने देखील दिसतात. अशा प्रकारचे रेल्वे प्लॅटफॉर्मवर खाद्यपदार्थ विक्री करून चांगला पैसा आपल्याला मिळवता येणे शक्य आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना रेल्वे प्लॅटफॉर्म वरील अशी दुकाने पाहून वाटले असेल की नेमकी या ठिकाणी दुकाने कसे उघडली जातात व याची नेमकी प्रक्रिया कशी असते?

जर तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल किंवा तुम्हाला देखील रेल्वे प्लॅटफॉर्मवर शॉप टाकून चांगला पैसा मिळवायचा असेल तर तुम्ही देखील ही गोष्ट करू शकतात. यासाठीची एक प्रक्रिया असते व ती पूर्ण करून तुम्हाला हे शक्य होते.

 रेल्वे प्लॅटफॉर्मवर दुकान उघडण्यासाठी कुठे कराल अर्ज?

तुम्हाला जर ट्रेनमध्ये केटरिंग टेंडर,रेल्वे प्लेटफॉर्म वर खाद्यपदार्थ आणि इतर आवश्यक वस्तूंचे दुकान उघडायचे असेल तर याकरिता सगळ्यात आधी तुम्हाला रेल्वे विभागाकडे अर्ज करावा लागतो. ही एक विशेष स्वरूपाची प्रक्रिया असते व या माध्यमातून भारतीय रेल्वे निविदा जारी करते व आवश्यक परवाना देखील जारी करते.

तुम्ही याबाबतची अधिक माहिती विविध रेल्वे विभाग आणि आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन यासंबंधीची अधिकची माहिती मिळवू शकतात. या ठिकाणी तुम्हाला स्टोअर टेंडर आणि केटरिंग विषयी संबंधित असलेली संपूर्ण माहिती उपलब्ध होते.

 रेल्वे शॉप टेंडर कसे मिळवाल?

साधारणपणे दररोज दोन कोटी पेक्षा जास्त प्रवासी भारतीय रेल्वेने प्रवास करतात. दररोज वेगवेगळ्या ठिकाणी हजारो रेल्वे गाड्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवतात. या कालावधीमध्ये प्रवासात असे अनेक थांबे असतात ज्या ठिकाणी प्रवासी खाण्यापिण्यासाठी ट्रेनमधून उतरतात. आपण पाहिले असेल की रेल्वे प्लेटफॉर्मवरील किंवा जंक्शनवरील चहाच्या टपऱ्यांवर नेहमीच गर्दी असल्याचे आपल्याला दिसून येते.

या सगळ्या व्यवसायातून अनेक दुकानदार खूप चांगले उत्पन्न मिळवतात. रेल्वे प्लेटफॉर्म व्यतिरिक्त लोक ट्रेनमध्ये पॅन्ट्री कारचे कंत्राट घेऊन देखील या माध्यमातून चांगले पैसे कमवतात. रेल्वे स्थानकावर तुम्हाला दुकान उघडायचे असेल तर त्यासाठी लागणारा खर्च हा दुकानाची जागा आणि आकारावर अवलंबून असतो.

मोठ्या रेल्वे जंक्शनवर स्टोअर उघडण्याचा खर्च जास्त तर छोट्या रेल्वे स्टेशनवर तो कमी असतो. दुकानाचा आकार आणि जागा यानुसार तुम्हाला रेल्वे कडून शुल्क आकारले जाते.

साधारणपणे रेल्वे प्लॅटफॉर्मवर बुक स्टॉल तसेच चहा कॉफी स्टोअर आणि खाद्यपदार्थ स्टॉल उघडण्यासाठी साधारणपणे 40 हजारापासून ते तीन लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. तसेच हे दर शहर आणि स्थानकाच्या स्थानानुसार बदलू शकतात. तसेच रेल्वे प्लेटफॉर्मवर अनेक छोटे स्टॉल देखील उपलब्ध करून देते व त्यांचे भाडे आणि खर्च खूप कमी असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe