Bal Jeevan Bima Yojana:- आपण पैशांची ज्या प्रकारे गुंतवणूक करतो ती प्रामुख्याने आपल्या भविष्यामध्ये येणाऱ्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी आर्थिक सुस्थिती रहावी याकरिता प्रामुख्याने करत असतो. यामध्ये जर आपण भविष्यकालीन आर्थिक गरजांचा विचार केला तर जेव्हा गुंतवणुकीच्या सुरुवातीला मुलं लहान असतात.परंतु कालांतराने त्या मुलांचा शिक्षणाचा खर्च हा प्रचंड प्रमाणात वाढतो.
त्यासोबतच शिक्षणानंतर मुलांचे लग्न कार्याचा खर्च देखील जास्तच असतो. या दृष्टिकोनातून बहुतांशी गुंतवणूक केली जाते किंवा पैशांची बचत केली जात असते. त्यामुळे गुंतवणूकदार अनेक चांगल्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये बहुतांश गुंतवणुक ही बँकांच्या मुदत ठेव योजना आणि पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांमध्ये जास्त प्रमाणात केली जाते.
यामध्ये जर आपण पोस्ट ऑफिस चा विचार केला तर या माध्यमातून देखील खूप चांगल्या पद्धतीच्या गुंतवणूक योजना राबवल्या जातात. म्हणून तुम्हाला देखील जर तुमच्या मुलांचे भविष्य उज्वल करायचे असेल व त्यांच्यावर होणारा भविष्यातील लग्न किंवा शिक्षणासारखा खर्च योग्य रीतीने पार पाडायचा असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या बाल जीवन विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत केलेली गुंतवणूक तुमच्या मुलांचे भविष्य आर्थिक दृष्टिकोनातून सुनिश्चित करते.
कसे आहे पोस्ट ऑफिसच्या बाल जीवन विमा योजनेचे स्वरूप?
पोस्ट ऑफिसची ही योजना असून बाल जीवन विमा योजना आहे व ही योजना पोस्ट ऑफिसच्या पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत येते. प्रामुख्याने ही योजनाच लहान मुलांकरिता बनवण्यात आलेली असून या अंतर्गत पाच ते वीस वर्षे वयोगटातील मुलांचा जीवन विमा उतरवता येतो. या अंतर्गत दोन मुलांसाठी विमा घेता येणे शक्य आहे.
ज्याप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलांच्या वयाचे अट आहे तसेच पालकांच्या वयाची अट असून ही योजना जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा पालकांचे जास्तीत जास्त वय 45 वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या माध्यमातून तुमची कुठल्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी केली जात नाही
व जेव्हा तुम्ही ही पॉलिसी घेता अगदी त्याच वेळेपासून तुमच्या मुलाला विम्याचे संरक्षण प्राप्त होते. तसेच या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जर पॉलिसी घेतली गेली व त्यानंतर पालकांचा मृत्यू झाला तर प्रिमियम भरायची गरज भासत नाही. जेव्हा पॉलिसी परिपक्व म्हणजेच पूर्ण होते तेव्हा बोनसची रक्कमेसह विम्याची रक्कम देखील दिली जाते.
बाल जीवन विम्याचा फायदा कसा मिळतो?
बाल जीवन विमा योजने अंतर्गत जास्तीत जास्त तीन लाख रुपयांचे विम्याचे संरक्षण दिले जाते व यामध्ये तुम्ही प्रति महिना किंवा त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रिमियम म्हणजेच ईएमआय पेमेंट निवडू शकतात.
बाल जीवन विमा मध्ये एक हजार रुपयांच्या रकमेवर प्रतिवर्षी 52 रुपयाचा बोनस मिळतो. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या मुलाच्या उज्वल भवितव्य करिता गुंतवणुकीचा प्लॅनिंग करत असाल तर बाल जीवन विमा योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.