Business Loan: तुम्हीही व्यवसाय उभारणीसाठी सरकारकडून घेऊ शकतात 15 लाख रुपयांचे कर्ज! सरकारच्या ‘या’ पोर्टलवर करा अर्ज

Published on -

Business Loan:- भारत सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत असून या माध्यमातून तरुण-तरुणींना तसेच गरजू व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा या दृष्टिकोनातून आर्थिक मदत करण्यात येत आहे.

मदत बऱ्याचदा कर्ज स्वरूपात केली जाते किंवा अनुदान स्वरूपात केली जाते. अशा योजनांच्या मदतीने व्यवसाय उभारून व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभे राहता यावे व आर्थिक दृष्टिकोनातून स्वयंपूर्णता यावी त्यासाठी या योजना खूप महत्त्वाच्या आहेत.

याच पद्धतीने तुम्हाला देखील व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु तुमच्याकडे त्याला लागणारा पैसा नाही. तर काळजी न करता तुम्ही सरकारच्या  नुकत्याच सुरू केलेल्या एका योजनेच्या माध्यमातून तब्बल 15 लाख रुपयांचे बिजनेस म्हणजेच व्यवसाय कर्ज घेवू शकणार आहेत.

याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सुरज पोर्टल सुरू केलेले आहे व या पोर्टलच्या माध्यमातून केंद्र सरकार अनेक प्रकारच्या महत्त्वपूर्ण योजना राबवत आहे.

 पीएम सुरज पोर्टलच्या माध्यमातून मिळेल व्यवसायासाठी कर्ज

केंद्र सरकारच्या अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत असून या सगळ्या योजनांचा लाभ देता यावा याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सुरज पोर्टल सुरू केले असून या पोर्टलच्या माध्यमातून केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे.

या पीएम सुरज पोर्टलच्या माध्यमातून व्यवसाय उभारण्यासाठी 15 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकार देत आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेऊन ज्या लोकांना पैशाअभावी व्यवसाय सुरू करता येऊ शकलेला नाही. त्यांना आता आरामात व्यवसाय सुरू करता येणे शक्य झालेले आहे.

तसेच या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला याकरता  बँकेत जाण्याची गरज नसून तुम्ही पीएम सुरज पोर्टलच्या माध्यमातून घरी बसून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.

 अशा पद्धतीने करा कर्जासाठी अर्ज

1- तुम्हाला देखील या योजनेकरिता अर्ज करायचा असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला पीएम सुरज पोर्टलचे अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

2- त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला क्लिक हियर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

3- त्या ठिकाणी तुम्हाला नोंदणी फॉर्म मिळेल तो काळजीपूर्वक भरावा लागेल.

4- त्या ठिकाणी आवश्यक माहिती भरून झाल्यानंतर विचारलेले कागदपत्र स्कॅन करून अपलोड करावे लागतील.

5- त्यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

6- नंतर त्या ठिकाणी तुम्हाला लॉगिन डिटेल्स मिळतील व या मदतीने तुम्ही तुमच्या अर्जाची स्टेटस जाणून घेऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News