पीएम किसान आणि प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा काय आहे एकमेकांशी संबंध? दोन्ही योजनांचा एकत्र लाभ घेता येऊ शकतो का? वाचा नियम

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. यामध्ये शेती क्षेत्राशी निगडित असलेल्या अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी देखील अशा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान आणि कर्ज स्वरूपामध्ये मदत करण्यात येते.

तसेच काही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळावा हा सरकारचा उद्देश आहे. त्यामध्ये जर आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना व किसान मानधन योजना या दोन्ही योजना खूप महत्त्वाचे आहेत.

बऱ्याचदा आपल्यापैकी बरेच जणांना प्रश्न पडत असेल की या दोन्ही योजनांचा लाभ एकत्रितरीत्या शेतकऱ्यांना घेता येतो का? या योजनांचा एकमेकांशी संबंध काय आहे? तर यासंबंधीचीच माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना

ही योजना प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असून केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. आपल्याला माहित आहे की या योजनेच्या माध्यमातून एका वर्षामध्ये शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत ही तीन टप्प्यांमध्ये विभागून करण्यात येते. म्हणजेच एका हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा लाभ दिला जातो. आजपर्यंत या योजनेचे 16 हप्ते वितरित करण्यात आले असून लवकरच सतरावा हप्ता देखील वितरित केला जाईल अशी शक्यता आहे.

 प्रधानमंत्री किसान मानधन योजना

प्रधानमंत्री किसान मानधन योजना देखील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे. या योजनेचे वेगळेपण म्हणजे ही एक पेन्शन योजना असून या योजनेच्या अंतर्गत साठ वर्षानंतर शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयांची पेन्शन मिळते.

या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला 55 ते 200 रुपयांपर्यंत रक्कम भरावी लागणार आहे. वयाची साठ वर्षापर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागते व साठ वर्षानंतर प्रत्येक महिला तीन हजार रुपयांची पेन्शन मिळते.

 या दोन्ही योजनांचा काय आहे संबंध एकाच वेळी घेता येऊ शकतो का लाभ?

जर आपण पंतप्रधान किसान सन्माननिधी योजना व प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर या दोन्ही योजनांचा एकमेकांशी संबंध आहे. म्हणजे जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी केली असेल तर तुम्ही थेटपणे प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत देखील सामील होऊ शकतात.

याचा अर्थ तुम्हाला या दोन्ही योजनांचा फायदा एका वेळी घेता येऊ शकतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ घ्यायचा असेल त्या शेतकऱ्यांनी तातडीने कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असते व त्यानंतर तुम्हाला या दोन्ही योजनांचा लाभ मिळू शकतो. या दोन्ही योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असल्याने शेतकऱ्यांनी या दोन्ही योजनांचा लाभ घ्यावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe