Government Scheme: सरकारच्या ‘या’ योजनेतून 50 हजार रुपये कर्जाचा लाभ घ्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा! कसा कराल अर्ज?

Published on -

Government Scheme:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता ज्या योजना राबवल्या जातात त्या माध्यमातून त्या त्या घटकांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा हा त्यामागचा उद्देश असतो.

अनेक योजनांच्या माध्यमातून अनुदान किंवा कर्ज स्वरूपात मदत करून  व्यवसाय करण्याला प्रोत्साहन मिळावे याकरिता देखील प्रयत्न होताना आपल्याला दिसून येतात. भारतामध्ये बेरोजगारीची समस्या ही सगळ्यात मोठी समस्या असून बेरोजगारीचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर व्यवसायांशिवाय पर्याय नाही.

त्यामुळे व्यवसाय करण्यासाठी असलेली पैशांची समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक योजना महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. भारत सरकारच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी या असलेल्या योजनांमध्ये एक योजना म्हणजे पीएम स्वनिधी योजना ही असून ती देखील एक महत्त्वाची योजना आहे

व या माध्यमातून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत घेऊ शकतात. प्रामुख्याने ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाते व रस्त्यांवरील विक्रेत्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

 काय आहे नेमकी पीएम स्वनिधी योजना?

 या योजनेत क्रेडिट सुविधा उपलब्ध असून या माध्यमातून तुम्ही ते गहाण ठेवून कर्ज घेऊ शकतात. या मिळालेल्या कर्जाच्या माध्यमातून तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. साधारणपणे कोरोना कालावधीनंतर ही योजना सुरू करण्यात आलेली होती

व या योजनेमध्ये सरकार दहा हजारापासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य करते. जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रथम दहा हजार रुपयांचे कर्ज मिळते

व त्याची परतफेड केल्यानंतर 20000 रुपये व दुसऱ्यांदा 50 हजार रुपये कर्जाचा लाभ तुम्हाला दिला जातो. विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून जे काही कर्ज मिळते त्याची परतफेड तुम्हाला बारा महिन्याच्या आत करावी लागते.

 काय आहेत या योजनेचे फायदे?

1- या योजनेमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कर्ज दिले जाते.

2- कर्जाची मुदत पूर्ण होण्याच्या अगोदर जर तुम्ही परतफेड केली तर सात टक्के सबसिडी मिळते.

3- यामध्ये तुम्ही जेव्हा डिजिटल पेमेंट करतात तेव्हा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला कॅशबॅकचा फायदा मिळतो.

4- यामध्ये जर आपण कॅशबॅकचे स्वरूप पाहिले तर लाभार्थ्याला ते पंचवीस रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जात असतो.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात?

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रामुख्याने आधार कार्ड, बँक खाते क्रमांक( बँक खात्याचा तपशील ), पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर आवश्यक असतो.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा कराल?

1- तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन या योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो.

2- याकरिता तुम्हाला एक फॉर्म दिला जातो व तो भरल्यानंतर तुम्ही त्याच्यासोबत लागणारी कागदपत्र जोडणे गरजेचे असते.

3- तसेच तुम्ही हे कर्ज कोणत्या व्यवसायासाठी घेणार आहात हे देखील तुम्हाला सांगावे लागते.

4- त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते व तुम्ही पात्र असाल तर कर्ज दिले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe