पुण्यात हरवलेली मुलगी पोलिसांना अहिल्यानगरमध्ये सापडली, मात्र तपासात पळवून आणल्याचे झाले उघड, एकजण ताब्यात

सोनई- खरवंडी येथील युवकाने पुणे, कोथरूड येथील २१ वर्षीय युवतीस पळवून आणले होते. या प्रकरणी शिंगणापूर पोलिसांनी संशयित इसमास व हरवलेल्या मुलीस कोथरूड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याबाबत शिंगणापूर पोलीस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी की, कोथरूड, पुणे येथील २१ वर्षीय युवती हरवल्याची फिर्याद दाखल झालेली होती. पुणे पोलिसांनी सूत्रे हलवत हरवलेली मुलगी खरवंडी (ता. नेवासा) … Read more

शिर्डी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

राहाता- शिर्डी येथे पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या खुनाच्या प्रकरणाचा निकाल काल मंगळवारी लागला असून, आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या सखोल तपासामुळे आणि न्यायालयीन प्रक्रियेमधील प्रभावी युक्तिवादामुळे या गंभीर गुन्ह्याला योग्य तो न्याय मिळाल्याचे बोलले जात आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की मागील भांडणाच्या कारणावरून खून करणाऱ्या अक्षय उर्फ बजरंग सुधाकर थोरात … Read more

शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी यासाठी श्रीगोंद्यात चक्काजाम आंदोलन, प्रहार जनशक्ती पक्षाच्या इशारा

श्रीगोंदा- शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ कर्जफाफी द्यावी या मागणीसाठी दि.२४ जुलै रोजी श्रीगोंदे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष सुरेश सुपेकर यांनी निवेदनाद्वारे इशारा दिला. भाजप सरकारने विधानसभा निवडणुकीत आम्हाला मते द्या, आमची सत्ता आल्यास सरसकट कर्ज माफी करू असे आश्वासन दिले होते मात्र सरकार … Read more

सोन्याच्या किमतीत 2180 रुपयांची वाढ! 23 जुलै रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold Rate Today

Gold Rate Today : सोन्याच्या किमतीत गेल्या दोन दिवसांच्या काळात जवळपास 2200 रुपयांची वाढ झाली आहे. 22 आणि 23 जुलै रोजी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याची किंमत 2180 रुपयांनी वाढली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सोन खरेदी करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना याचा फटका बसतोय तर दुसरीकडे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील एकल महिलांना सरकारी योजनांच्या माध्यमातून सक्षम करावे- जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

अहिल्यानगर- शासनाच्या विविध विकास योजनांच्या माध्यमातून एकल महिलांना प्राधान्य देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज प्रशासकीय यंत्रणेला केले. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात एकल महिला सक्षमीकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० या जयंती वर्षानिमित्त कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानिमित्ताने जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची … Read more

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

अहिल्यानगर- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी कृषिमंत्री हटावच्या जोरदार घोषणा दिल्या. या आंदोलनात शहर जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत कराळे, ज्येष्ठ नेते किसनराव लोटके, अशोक बाबर, प्रकाश पोटे, अथर खान, गौरव नरवडे, फरीन शेख, रुकैय्या शेख, अल्तमश जरीवाला, समीर … Read more

३१ जुलै पूर्वी शेतकऱ्यांनी खरिप पिक विमा भरून घ्यावा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांचे आवाहन

अहिल्यानगर- जिल्ह्यामध्ये खरीप २०२५ दरम्यान सरासरी ९४ क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये काही प्रमुख पिके आहेत. त्यात साधारणपणे कापूस दीड लाख हेक्टर, सोयाबीन दीड लाख हेक्टर तसेच सध्या मका पिकाखालील क्षेत्र देखील वाढत आहे. त्यात ९० हजार हेक्टर एक क्षेत्र आहे. बाजरी, मूग, तूर, उडीद यासारख्या पिकांची देखील पेरणी आपल्याकडे झालेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून खरीप … Read more

मुलीचा जन्मदर कमी असणाऱ्या गावांवर विशेष लक्ष देऊन व्यापक जनजागृती करा- जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

अहिल्यानगर- जिल्ह्यात मुलींच्या तुलनेत मुलांचा जन्मदर अधिक असून हे लिंग गुणोत्तर संतुलित करण्यासाठी प्रशासनाने गावपातळीवर विशेष मोहिम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यासंदर्भात स्पष्ट निर्देश देत, विशेषतः ज्या गावांमध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी आहे तिथे व्यापक जनजागृती व कृती आराखडा राबविण्यावर भर दिला. डॉ. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार नव्या रेल्वेस्थानकाची भेट ! रेल्वे मंत्रालयाकडे 949 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर

Maharashtra New Railway Station

Maharashtra New Railway Station : भारतात विमान, बस आणि रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवास केला जातो. यात बस आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. महाराष्ट्रात देखील हजारो किलोमीटर लांबीचे रेल्वे मार्ग तयार आहेत, तसेच अजूनही नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत. देशात जवळपास … Read more

अहिल्यानगरमधील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांची सरकारी अधिकारीपदी निवड

अहिल्यानगर- विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या १२ विद्यार्थ्यांची विविध शासकीय विभागांत अधिकारीपदी निवड झाली. या यशामुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा अधोरेखित झाला असून महाविद्यालयाच्या परिसरात आनंदाचे वातावरण आहे. महाविद्यालयास नॅशनल असेसमेंट ॲण्ड ॲक्रिडिटेशन कौन्सिल (नॅक) चे ए प्लस मानांकन प्राप्त असून स्थापत्य अभियांत्रिकी विभागास एनबीए नवी दिल्ली मान्यता प्राप्त … Read more

एमआयडीसी परिसरात बंगल्याच्या छतावर सुरू असलेला मावा कारखाना पोलिसांच्या विशेष पोलिस पथकाने केला उद्धवस्त

अहिल्यानगर- पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने नवनागापूर, एमआयडीसी परिसरात बंगल्याच्या छतावर पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला माव्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुगंधी तंबाखू, तयार मावा, कच्ची मावा सुपारी व चारचाकी वाहनासह ८ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम … Read more

ट्रॅक्टर चोरणाऱ्या भामट्यास एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर- तालुक्यातील हिंगणगाव येथून ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी एकास अटक केली असून, त्याच्याकडून २ लाख २० हजारांचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. विठठल बबन गांडुळे (वय ४३ रा. देवटाकळी ता शेवगाव जि. अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. हिंगणगाव येथून दि. १९ जुलै फिर्यादी एकनाथ दगडु झावरे रा हिंगणगाव ता. जि अहिल्यानगर यांच्या मालकीचा ट्रक्टर … Read more

भारतातील सर्वात स्वच्छ राज्यात मध्य प्रदेशने मारली बाजी, महाराष्ट्राची रँकिंग किती? पाहा संपूर्ण यादी

देशात स्वच्छतेच्या बाबतीत एक सकारात्मक आणि परिवर्तनकारी लाट निर्माण झाली आहे. ही लाट आहे ‘स्वच्छ भारत मिशन’च्या प्रेरणेतून उगम पावलेली. या मोहिमेने देशभरात स्वच्छतेला केवळ सरकारी उपक्रम म्हणून न पाहता एक सामूहिक जबाबदारी म्हणून स्वीकारण्याची नवी दृष्टी दिली आहे. विशेष म्हणजे काही राज्यांनी या लाटेला केवळ स्वीकारले नाही, तर आपली स्वतःची छाप देखील उमटवली आहे. … Read more

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! जुलैचा हफ्ता ऑगस्ट महिन्याच्या ‘या’ तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा लाडकी बहिण योजना चर्चेत आली आहे. या योजनेच्या अर्जदारांची सरकारकडून पुन्हा एकदा पडताळणी सुरू करण्यात आले असून या पडताळणीअंती लाखो महिला या योजनेतून बाद केल्या जात आहेत. यामुळे विरोधकांकडून सरकारला घेरले … Read more

भारतातील हे 6 समुद्रकिनारे पाहून तुम्ही गोवा-मालदीवला विसराल; न कसली गर्दी, न गोंगाट…फक्त निळाशार समुद्र आणि सुंदर नजारे

भारताच्या समुद्रकिनाऱ्यांची गोष्ट निघाली की अनेकांच्या डोळ्यांसमोर थेट गोवा, केरळ किंवा कधी कधी मालदीवचं स्वप्न उभं राहतं. पण, तुम्हाला माहिती आहे का, भारतात असे काही समुद्रकिनारे आहेत जे मालदीवच्या सौंदर्यालाही लाजवतील, आणि त्यांचं वेगळेपण पाहून परदेशी पर्यटकही चकित होतात? हे समुद्रकिनारे केवळ निसर्गसंपन्नच नाहीत, तर त्यांचं शांत, स्वच्छ आणि मन प्रसन्न करणारे वातावरण तुम्हाला दुसरीकडे … Read more

नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी मोतीयानी यास अटक

अहिल्यानगर: नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळाप्रकरणी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने मनोज वासुमल मोतीयानी (रा. सावेडी गाव, अहिल्यानगर) याला अटक केली आहे. त्याला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. बँकेचा तत्कालीन सहायक मुख्य व्यवस्थापक मनोज वसंतलाल फिरोदिया याने कुवत नसतानाही तारण मालमत्तांचे वाढीव दराचे मूल्यांकन अहवाल घेऊन कमाल मर्यादेचे कर्ज मंजूर करण्याची शिफारस केली. … Read more

तीन वर्ष अत्याचार अन शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांची पोलिस कोठडीत रवानगी

अहिल्यानगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण गुलाबराव काळे (रा. वैभव कॉलनी, रेणावीकर शाळेजवळ, सावेडी अहिल्यानगर) यांना कोतवाली पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात सोमवारी रात्री अटक केली. मंगळवारी दुपारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवासांची पोलिस कोठडी सुनावली. कोतवाली पोलिस ठाण्यात कर्जत येथील २१ वर्षीय पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून नगर शिवसेना शहरप्रमुख किरण गुलाबराव … Read more

जेवणाची चव वाढवणाऱ्या मिठाचेही 7 प्रकार, कोणते मीठ कशासाठी वापरतात जाणून घ्या !

आपण रोजच्या स्वयंपाकात वापरत असलेले पांढरे मीठ ही फक्त एक सुरुवात आहे. भारतीय स्वयंपाकघरात आणि जगभरातही अनेक प्रकारचे मीठ वापरले जाते. काही मीठ चवीसाठी प्रसिद्ध आहे, काही आरोग्यवर्धक गुणधर्मांसाठी, तर काही सौंदर्योपचारांमध्ये उपयोगी पडते. चला तर मग, जाणून घेऊया जगात प्रचलित असलेल्या मीठांचे हे अनोखे प्रकार. काळे मीठ हे काळे मीठ प्रामुख्याने हिमालयीन प्रदेशात आढळते, … Read more