AMC News : कापड बाजार, शहाजी रोड, गंज बाजारसह संपूर्ण बाजारपेठेत अतिक्रमणांवर कारवाई सुरू

AMC News : अहिल्यानगर शहरात स्टॉल लावण्यावरून अतिक्रमणधारक व दुकानदारांमध्ये झालेल्या वादानंतर आमदार संग्राम जगताप यांनी बाजारपेठेत व्यापाऱ्यांशी संवाद साधला. पोलिस प्रशासन व आमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार बाजारपेठ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे. बाजारपेठेत अतिक्रमणे थाटली जाऊ नयेत, यासाठी महानगरपालिकेचे स्वतंत्र विशेष पथक बाजारपेठेत नियुक्त करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत … Read more

ब्रेकिंग : महाराष्ट्राला मिळणार एक नवा रेल्वे मार्ग ! 1 हजार 886 कोटी रुपयांच्या ‘या’ Railway मार्गाला राज्य सरकार देणार 943 कोटी रुपयांचा निधी

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : महाराष्ट्रात आणि देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. कारण असे की रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे हा प्रवास खिशाला परवडणार आहे. दरम्यान रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाच्या माध्यमातून सातत्याने रेल्वेचे नेटवर्क विस्तारले जात आहे. देशात अजूनही अनेक मोठमोठ्या रेल्वे मार्ग प्रकल्पांची कामे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील रहस्यमय बेपत्ता प्रकरण 48 तासांत पोलिसांनी महिला शोधून काढली!

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे एका विवाहित महिलेच्या बेपत्ताच्या घटनेने गावात मोठी खळबळ उडवली. सदर महिला गाईसाठी गवत आणण्यासाठी शेतात गेली होती. मात्र, संध्याकाळपर्यंत ती घरी परतली नाही. तिच्या कुटुंबीयांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, तिथे तिच्या वस्त्रांचे काही तुकडे, गवत कापण्याचा विळा, मोबाईलचे कव्हर, बांगड्यांचे तुकडे आणि मंगळसूत्र सापडले. विशेष म्हणजे, त्या विळ्यावर रक्ताचे … Read more

संगमनेर साखर कारखाना निवडणूक : ही लढाई जिंकायचीच ! आमदार खताळांचा निर्धार

संगमनेर सहकारी साखर कारखाना हा ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांचा मालकीचा असून, सध्या काही जण त्याचा कारभार खासगी मालमत्तेप्रमाणे चालवत असल्याचा आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला आहे. सभासदांच्या बैठकीत त्यांनी या परिस्थितीला आळा घालण्यासाठी आणि कारखाना पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात आणण्यासाठी निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविण्याची घोषणा केली. ऊस उत्पादकांसाठी निर्णायक निवडणूक आमदार खताळ यांनी स्पष्ट … Read more

राहुरी शहरात दंगल घडवण्याचा कट दोन महिन्यांपासून सुरू असल्याचा आरोप, प्रशासनास निवेदन

राहुरी: शहरात मागील दोन महिन्यांपासून दंगल घडवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काही संघटनांकडून प्रशासनावर दबाव टाकून आणि खोटी माहिती पसरवून हिंदू तरुणांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा बुवासिंद बाबा तरुण मित्रमंडळाने केला आहे. २६ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली होती. या घटनेमुळे शहरात मोठा तणाव … Read more

RBI चा नियम मोडणाऱ्या बँकांना दणका, मार्च 2025 मध्ये ‘या’ 35 बँकांवर कठोर कारवाई, ग्राहकांवर काय परिणाम होईल? वाचा….

Banking News

Banking News : गेल्या काही महिन्यांमध्ये देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांवर मोठी कठोर कारवाई केलेली आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयकडून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत अनेक बँकांचे लायसन्स रद्द झाले आहे तर काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च 2025 मध्ये … Read more

अहिल्यानगरमध्ये जमीन किंवा घर घ्यायचे स्वप्न पाहताय? तर नव्या रेडीरेकनरप्रमाणे मोजावे लागणार एवढै पैसै?

अहिल्यानगर: जर तुम्ही अहिल्यानगरमध्ये घर किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर नोंदणी शुल्क विभागाने १ एप्रिलपासून जाहीर केलेल्या नव्या रेडीरेकनर दरांनुसार तुमच्यावर अतिरिक्त खर्च येणार आहे. या नव्या दरवाढीनंतर महापालिका तसेच ग्रामीण भागातील मालमत्ता खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महापालिका क्षेत्रात दोन वर्षांनंतर प्रथमच रेडीरेकनर दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. नव्या दरांनुसार … Read more

पालकांनो मुलाच्या करिअरची चिंता वाटतेय? तर मग ही चाचणी करून घ्या आणि मुलाचं करिअर सेट करा!

अहिल्यानगर: दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या, निकाल लवकरच लागतील. या टप्प्यावर पालकांना मुलांच्या करिअरबाबत मोठी चिंता असते. “मुलाने कोणता अभ्यासक्रम निवडावा?”, “त्याचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे?”, “त्याची खरी क्षमता कशात आहे?” – असे अनेक प्रश्न त्यांना सतावत असतात. योग्य निर्णय घेण्यासाठी काही चाचण्या उपयुक्त ठरू शकतात. तज्ज्ञांच्या मते, योग्य चाचणी केल्यास मुलाच्या भविष्यासाठी योग्य दिशा निवडता येते. … Read more

अहिल्यानगरकर इकडे लक्ष द्या! 1 लाख रूपये कमवण्याची संधी, फक्त द्यावी लागेल ही माहिती

अहिल्यानगर – राज्यात गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणे कायद्याने गुन्हा असूनही, काही ठिकाणी हे प्रकार गुपचूप सुरू असल्याचे उघड झाले आहे. यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कडक कारवाई केली जात आहे. सरकारने अशा अनधिकृत सोनोग्राफी केंद्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी एक विशेष योजना आणली आहे. जर कोणी अशा बेकायदेशीर प्रकारांबद्दल माहिती दिली, तर त्याला १ लाख रुपयांचे … Read more

आमदारांचं असतंय परफेक्ट नियोजन, दिवसाला ५० कार्यक्रमांना अशाप्रकारे लावतात हजेरी!

अहिल्यानगर – ग्रामीण भाग असो की शहर, लग्न, वाढदिवस, साखरपुडा, बारसे, दुकान उद्घाटन असे विविध कार्यक्रम रोज ठरलेले असतात. या प्रत्येक कार्यक्रमाला आमदार आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावं, अशी जनतेची अपेक्षा असते. त्यामुळे दिवसभर धावपळ करत वेळेवर हजेरी लावण्याचं गणित आमदारांनी परफेक्ट जुळवलेलं असतं. यामुळेच त्यांची जनतेतली लोकप्रियता कायम राहते. आमदारांच्या स्वीय सहायकांशी संवाद साधला असता, … Read more

ठाणे आणि भिवंडीकरांसाठी महत्वाची बातमी ! आजपासून वाहतुकीतील बदल

Thane News : ठाणे-भिवंडी दरम्यान मेट्रोमार्गाचं काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) माध्यमातून जोमाने सुरू आहे. या अंतर्गत भिवंडीतील अंजूर चौक ते अंजूर फाटा या भागात लोखंडी खांबांवर गर्डर टाकण्याचं काम मंगळवारी, १ एप्रिल २०२५ पासून हाती घेण्यात आलं आहे. हे काम रात्रीच्या वेळी होणार असून, त्यासाठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मंगळवारी … Read more

सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! बुधवार 2 एप्रिल रोजी दहा ग्रॅम सोन्याच्या किमती कशा आहेत? तुमच्या शहरातील गोल्ड रेट लगेचच चेक करा

Gold Price Today

Gold Price Today : काल एक एप्रिल 2025 रोजी नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याच्या किमतीत मोठी वाढ नमूद करण्यात आली. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम मागे 930 रुपयांनी वाढली. आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम मागे 850 रुपयांनी वाढली. दरम्यान आज दोन एप्रिल 2025 रोजी सुद्धा सोन्याच्या किमतीत वाढ नमूद … Read more

अहिल्यानगरचे राजकीय वातावरण तापणार! थोरात आणि विखे साखर कारखान्यांची निवडणूक जाहीर

संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ३ एप्रिलपासून सुरू होणार आहे. थोरात कारखान्यासाठी ११ मे तर विखे कारखान्यासाठी ९ मे रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी आमदार बाळासाहेब … Read more

पुढील वर्षी सर्व शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू होणार का? पालकांमध्ये संभ्रम, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम?

राज्यातील सर्वच शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अभ्यासक्रम लागू केला जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केल्यानंतर शिक्षण क्षेत्रासह पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व वर्गांसाठी हा अभ्यासक्रम लागू होणार का? असे अनेक प्रश्न पालक उपस्थित करत आहेत. शिक्षणतज्ज्ञ, पालक आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करताना विविध मुद्दे समोर आले. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील MIDC ला ग्रामस्थांचा तीव्र विरोध, आमच्या काळ्या आईचा सौदा रद्द करा…

Ahmednagar News

अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कोंभळी, खांडवी आणि रवळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी नियोजित एमआयडीसीला तीव्र विरोध दर्शवला आहे. सरकारने चुकीच्या पद्धतीने उताऱ्यांवर नोंद लावून शेतजमिनी अधिग्रहण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याविरोधात शेतजमीन बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन छेडण्यात आले. कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीसाठी कोंभळी-थेरगाव आणि रवळगाव परिसरातील जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली … Read more

मुंबई ते गोवा प्रवास होणार वेगवान ! सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसं असणार वेळापत्रक? वाचा…

Mumbai Goa Railway News

Mumbai Goa Railway News : मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मध्य आणि कोकण रेल्वेच्या माध्यमातून उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी अतिरिक्त गर्दी पाहता समर स्पेशल ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन दरम्यान ही … Read more

शेतकरी झाले बांधावरूनच ऑनलाइन, घरबसल्या केले ४ कोटी ३५ लाख उताऱ्यांचे डिजिटल डाउनलोड

खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकऱ्यांची पीककर्जासाठीची धावपळ सुरू झाली आहे. पीककर्ज प्रक्रियेसाठी सातबारा, आठ-अ आणि फेरफार उताऱ्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. मात्र, या कागदपत्रांसाठी तलाठी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज आता राहिलेली नाही. राज्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत डिजिटल स्वाक्षरीयुक्त उताऱ्यांचे ऑनलाइन डाउनलोड मोठ्या प्रमाणावर सुरू केले आहे. भूमिअभिलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मागील … Read more

नगरच्या कापड बाजारात पोलिस चौकीची मागणी, व्यापाऱ्यांचे पोलिस अधीक्षकांना निवेदन

अहिल्यानगर : कापड बाजारातील एका व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. या परिसरातील वाढत्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने कापड बाजारात स्वतंत्र पोलिस चौकी स्थापन करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. या मागणीसाठी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. … Read more