कुत्र्याने कागद फाडल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून महिलेस कुऱ्हाडीने मारहाण

श्रीगोंदा : कुत्र्याने कागद फाडल्याचा जाब विचारल्याचा राग येवून, जाब विचारणाऱ्या महिलेस महिला व पुरूषांनी कुऱ्हाडीने बेदम मारहाण केली. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा येथे घडली आहे.या मारहाणीत शकुंतला बबन धोत्रे वय ६२ या गंभीर जखमी झाल्या आहेत.याबाबत धोत्रे यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धोत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे … Read more

जनताच पाच वर्षे तुम्हाला घरी बसवणार

कोपरगाव : केंद्रात महायुतीची सत्ता आहे. राज्यातही २०१९ ला महायुतीचीच सत्ता येणार असल्याने जनताच पाच वर्षे तुम्हाला घरी बसवणार आहे, असा टोला महायुतीच्या उमेदवार आ. स्नेहलता कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांना लगावला. यांना अडीच किलोमीटर लांब ठेवा, असे विधान काळे यांनी केले होते. त्याला आ. कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले. राज्यात केलेल्या विविध विकास … Read more

संगमनेरातील जनतेने निवडणूक हातात घेतली,परिवर्तन अटळ

संगमनेर : संगमनेरातील जनतेने निवडणूक हातात घेतली असून जनतेच्या सहकार्यामुळेच संगमनेरात परिवर्तन अटळ आहे असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले यांनी केले. संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि. १० ऑक्टोबर रोजी संगमनेर तालुक्यातील मंगळापूर, चिखली, धांदरफळ बुद्रुक, कौठे धांदरफळ या ठिकाणी प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. गावोगावी जाऊन … Read more

मुळा नदी बारमाहीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले- पिचड

अकोले : माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी मुळा बारमाहीचे स्वप्न पहिले होते ते आज पूर्ण झाले असून, मुळा नदीमध्ये ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले. अनेक धरणे बांधून शेवटच्या टप्यात पिंपळगावखांड हे धरण बांधून मुळा बारमाही केली. याचा मुळा खोऱ्यासह पठार भागातील गावांना लाभ झाला, असे वैभवराव पिचड यांनी म्हटले आहे. अकोले विधानसभा मतदारसंघातील व संगमनेर … Read more

कांदा @ ३५००

राहुरी शहर : कृषी उत्प्नन बाजार समितीच्या वांबोरी येथील केंद्रावर पाच दिवसांच्या बंदनंतर काल कांद्याच्या मोंढ्यावर ३ हजार ३४७ कांदा गोण्यांची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास ३५०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कांद्यास प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे- एक नंबर कांद्यास ३ हजार ते ३५०० रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्यास २ हजार २०० ते २ हजार … Read more

शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळीत

अहमदनगर : नगर शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाच्या दुरुस्ती कामांसाठी महापालिकेमार्फत शनिवारी (दि.१२) सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे याकाळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे शनिवारी (दि.१२) पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. शनिवारी बोल्हेगांव, नागापूर, सावेडी … Read more

मनपात १८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

अहमदनगर : मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या आदेशानुसार उपायुक्त प्रदीप पठारे यांनी एकूण १८ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी काढले असून त्यामध्ये नगररचना विभागातील ९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. यामध्ये गणेश क्यातम (पाणीपुरवठा विभाग), सतिष दारकुंडे (घनकचरा व्यवस्थापन विभाग), श्रीकांत दरेकर (प्रभाग समिती क्रमांक १), किशोर … Read more

शरद पवार दोषी नाहीत !

अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कोणत्याही संस्थेमध्ये थेट नाहीत मात्र, त्यांना गुन्ह्यामध्ये गोवण्यासाठी वेळप्रसंगी कायद्याची व्याख्या ह्या सरकारणे बदलली. शरद पवार व्यक्ती दोषी कसे? ते दोषी असतील तर मुख्यमंत्री फडणवीस, अमित शहा, पंतप्रधान यांनी जर घोटाळे केले असतील तर तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांना दोषी धरणार का? असा सवाल भारतीय कम्युनिस्ट … Read more

पाच वर्षानंतर निवडणुकांपुरता लोकांसमोर येत नाही

करंजी : पाच वर्ष घरी बसायचं आणि निवडणूक लागल्या की काहीतरी भावनिक मुद्दे घेवून मतदारांसमोर जायची पद्धत आता बंद झाली. बीड जिल्ह्याला पाणी देण्याचा प्रश्नच नाही. परंतु राहुरीकरांची निवडणूकीपुर्ती सहानूभूती मिळवण्याचा उद्योग विरोधी उमेदवार करत असून, मी गेली पंचवीस वर्षापासून आमदार आहे. त्याचे कारण मी बाराही महिने सर्वसामांन्य जनतेमध्ये असतो. या निवडणुकीत फॉर्म भरण्याचीच मानसिकता … Read more

युती सरकारच्या धोरणांमुळे मंदी : आ.जगताप

अहमदनगर : नगर शहराचा आमदार म्हणून पाच वर्षे काम करतांना शहराच्या विकासात मोलाची भर घातली असून मोठे विकास प्रकल्प मार्गी लावले आहेत. विकासकामे करण्याबरोबरच एमआयडीसीमध्ये धूळ खात पडलेल्या आयटी पार्कला पुनर्जीवित करून अनेक आयटी कंपन्यांना पाचारण करून शहरातील युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. एकीकडे विरोधक दादागिरी व गुंडशाहीने कायनेटिकसारख्या मोठ्या कंपनीच्या मालकांना मारहाण करून … Read more

चॉकलेट, पॅड, घोंगते वाटप, विधानसभा ही काय लुटुपुटूची लढाई आहे काय ?

कर्जत : आपण गेली पाच वर्षे काम केले म्हणून काही चुका झाल्या असतील ज्यांनी कामेच केली नाहीत. त्यांच्या चुका कोणत्या होणार यांनी कोणती कामे केली तर फक्त काटा मारला, भाडे थकवले व आता कोणते कामे सुरू आहेत. तर चॉकलेट, पॅड, घोंगते वाटप, विधानसभा ही काय लुटुपुटूची लढाई आहे काय, असा प्रश्न उपस्थित करत ना.प्रा.राम शिंदे … Read more

मला संधी द्या मी संघर्ष करायला तुमच्या बरोबर राहील

राहुरी ;- वांबोरी चारीचे पाणीचे पाणी टेलपर्यंत पोहोचविण्याचे काम १० वर्षांत आमदार शिवाजीराव कर्डिले यांना जमले नाही. ते काम खासदारांनी करून दाखवले. आता मला संधी द्या, वांबोरी चारीच्या प्रश्नावर मी संघर्ष करायला तुमच्या बरोबर राहील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला. पाथर्डी तालुक्यातील मिरी, रुपेवाडी, केशव शिंगवे, चिंचोडी, शंकरवाडीसह … Read more

दहा वर्षात आ. कर्डिलेंनी कोणती पाणी योजना राबविली ?

राहुरी शहर : माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी त्यांच्या २५ वर्षांच्या कार्यकाळात तालुक्यात अनेक पाणी योजना शासनाकडून मंजूर करून त्या कार्यान्वित केल्या. आज जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाई असताना राहुरी तालुक्यात अपवादात्मक ठिकाणी टँकर सुरू होते. आमदार कर्डिले १० वर्षांपासून तालुक्याचे आमदार होते. या काळात त्यांनी एक तरी पाणी योजना राबविली का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर-राहुरी … Read more

तरुणीचा लॉजमध्ये गळा आवळून खून

सांगली : घरी मैत्रिणींसमवेत जेवण्यास जातो, असे सांगून घराबाहेर पडलेल्या तरुणीचा लॉजमध्ये रुमालाने गळा आवळून खून झाल्याची घटना गुरुवार दि. १० रोजी दुपारी उघडकीस आली. वृषाली अर्जुन सूर्यवंशी (वय १९, रा. कोल्हापूर रोड, सांगली) असे तिचे नाव आहे. शहरातील एसटी स्टँड समोरील टुरीस्ट लॉजमध्ये तिसऱ्या मजल्यावर रुम नं. १०८ मध्ये ही घटना घडली. अविनाश लक्ष्मण … Read more

पराभवाची जाणीव झाल्यामुळे दल बदलूंनी पक्ष बदलला

वैराग (सोलापूर): कोणत्या पक्षावर बोलावे यावर बार्शी तालुक्यात येण्यापूर्वी बाहेरच्या नेत्यांना विचार करावा लागतो. पराभव रणात नाही तर मनात होतो. त्यातूनच त्यांना पराभवाची जाणीव झाल्यामुळे दल बदलूंनी पक्ष बदलला, अशी खरमरीत टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वैराग येथे केली. राष्ट्रवादीचे बार्शीचे उमेदवार निरंजन प्रकाश भूमकर यांच्या प्रचारार्थ बोलताना ते पुढे म्हणाले, ही निवडणूक दोन … Read more

काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था जेलरसारखी

सोलापूर : राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती शोले चित्रपटातील जेलरसारखी झाली आहे. ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी बचे तो पिछे आओ!’ असे म्हणण्याची पाळी या नेतृत्वावर आली आहे. राज्यातील भाजपा-शिवसेना महायुतीने गेल्या पाच वर्षांत विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे विरोधकांना आमच्या विरुद्ध लढण्याची ताकदच राहिली नाही. राज्यात व देशात पुढील २५ वर्षे … Read more

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार !

मुंबई: एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना विविध सणांना ३१ ऑक्टोबर २०१५ च्या परिपत्रकानुसार अग्रीम देण्यात येतो. या वर्षीही या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये अग्रीम दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे. दिवाळी अग्रीमसाठी कर्मचाऱ्यांनी विहित नमुन्यात अर्ज करण्यास सुरुवात केली आहे.

सरकारने टाळूवरचे लोणी खाल्ले : थोरात

औसा : मराठवाडा आणि राज्यात शेतकऱ्यांना पीकविमा न देणाऱ्या विमा कंपन्यांना १,१०० कोटींचा नफा झालाच कसा, असा सवाल करीत यात सरकारने टाळूवरचे लोणी खाल्ले, असा आरोप करून या सरकारला राज्यातील शेतकरी व जनता नक्कीच धडा शिकवेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. औसा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बसवराज … Read more