गावठी कट्ट्याची विक्री करणाऱ्यास अटक.

अहमदनगर :- नगर- सोलापूर रस्त्यावरील वाळुंज टोलनाक्याजवळ एक व्यक्ती गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार पवार यांच्या पथकाने टोलनाक्याजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. ४० हजारचा गावठी कट्टा हस्तगत शौकत दादा शेख (२२, रा. जामा मस्जिदजवळ, घोगरगाव, ता. श्रीगोंदे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ४० … Read more

तरुणाची गोळ्या घालून हत्या.

वृत्तसंस्था :- रत्नागिरी शहरात वैयक्तिक वादातून मित्रानेच मित्राची गोळ्या झाडून हत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी सावकारी व्यवहार करणारा आनंद क्षेत्री रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास त्याच्या 5 मित्रांसह चारचाकी गाडीतून जात असताना गाडीतील त्याच्या एका मित्रानेच रिव्हॉल्वरने आनंदवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ही घटना … Read more

श्री शिवशंभो प्रतिष्ठान अहमदनगरची कार्यकारिणी जाहीर.

अहमदनगर :- सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात गेल्या 20 वर्षा पासून कार्यरत असलेल्या श्री शिवशंभो प्रतिष्ठान अहमदनगर ची सन 2019-2021 या तीन वर्षासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नुकतीच प्रतिष्ठान च्या सदस्यांची बैठक पार पडली. त्या मध्ये नवीन कार्यकारिणी निवडण्या संदर्भात प्रस्ताव मांडला गेला. त्यामध्ये खालील प्रमाणे सर्वानुमते कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्ष- अँड. शिवाजी अण्णा … Read more

नगरसेवक मुदस्सर शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल.

अहमदनगर :- वंजारगल्लीतील दंगलीच्या गुन्ह्यात बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक मुदस्सर जहांगीर शेख यांच्यासह शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गाडीला कट मारल्याच्या वादातून शुक्रवारी वंजारगल्ली येथे दोन गटसमोरासमोर येऊन दगडफेक झाली. त्यात दोन्ही गटांतील सात जण जखमी झाले होते. याप्रकरणी सुरुवातीला पोलिस कर्मचारी बाळकृष्ण दौंड यांच्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील ६० जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न … Read more

आमदार जगताप पिता-पुत्र अडचणीत !

अहमदनगर :- भाजपचा महापौर होण्यासाठी जगताप यांच्या आदेशानेच नगरसेवकांनी मतदान केल्याचे स्पष्ट झाल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच जाहीर नाराजी व्यक्त केली असून जगताप पितापुत्रांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. राजकीय अडचणी वाढल्या ! विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप व त्यांचे पुत्र नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप या पिता-पुत्रांसमोरील राजकीय अडचणी … Read more

पारनेर तालुक्यातील युवकाची आत्महत्या.

पारनेर :- तालुक्यातील वडगाव सावताळ येथील किरण छबन निवडुंगे (वय २१) या युवकाने आपल्या राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. ३ रोजी दुपारी १२.०० च्या सुमारास घडली. 

Read more

मनपा पाणी योजनेची वीज होणार खंडित ?

अहमदनगर :- शहर पाणी पुरवठा योजनेच्या वीज पुरवठयाच्या बिलापोटी कोटयावधी रुपयांची थकबाकी मनपाने गेल्या काही महिन्यांपासून थकविल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी महावितरणद्वारे मनपाला नोटीस बजावून पाणी योजनेची वीज तोडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. थकबाकी १७९ कोटींवर पोहचली ! महापालिकेच्या पाणी योजनेची थकबाकी १७९ कोटींवर पोहचली असून शासनाच्या निर्देशानुसार महावितरणने मनपाला जुन्या थकबाकीचे हप्ते करुन दिले … Read more

बांधकाम व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या.

मुंबई : रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदी आता बांधकाम व्यावसायिकांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसून येत आहे. प्रकल्प रखडल्याने मानसिक तणावाखाली असलेल्या चेंबूर येथील बिल्डरने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिकांपैकी एक असलेल्या संजोना बिल्डर्सचे संजय अग्रवाल यांचे चेंबूर येथील सिंधी कॉलनीत कार्यालय आहे. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते कार्यालयातील त्यांच्या चेंबरमध्ये … Read more

त्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा – छिंदम

अहमदनगर :- महापौर पदाची निवडणुक प्रक्रिया पार पडत असतांना पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यासमोर मतदान चालू असतांना मारहाण करुन शिवीगाळ व घोषणाबाजी करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधित नगरसेवकांवर प्रशासनाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमने मनपा आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे. …तर हा हल्ला झाला नसता   या निवेदनात … Read more

मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला फसवले.

अहमदनगर :- धनगर समाज़ाला आरक्षण मिळण्यासाठी लवकरच जामखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी दिली. धनगर आरक्षण व सध्याची राज़कीय परिस्थिती, यावर विचारविनिमय करण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहावर डॉ. इंद्रकुमार भिसे यांच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजाची बैठक पार पडली, या वेळी ते बोलत होते.   धनगर समाजाच्या लोकांना ‘अनुसूचित जमाती’चे प्रमाणपत्र द्यावे. ते … Read more

महापालिकेचे ‘ते’ कर्मचारी अखेर निलंबित !

अहमदनगर :- कामावर हजर न झालेल्या २१ कर्मचाऱ्यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी मनपासमोर धरणे आंदोलन केले होते. घनकचरा विभागाने कामाच्या सोयीसाठी २१ कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेश दिले होते. पूर्वसूचना न देता परस्पर कामावर गैरहजर राहिल्याने… बदली आदेशानुसार रुजू होण्यास नकार दिल्याने प्रशासनाने त्यांना कामावर हजर होण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या. ते कामावर रुजू न … Read more

मतदारसंघात सव्वा कोटीची कामे पूर्ण : आ.मोनिका राजळे.

पाथर्डी :- विकासकामांच्या माध्यमातून प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. शेवगाव व पाथर्डी मतदारसंघात मुस्लिम समाजाच्या जमातखान्यासाठी विविध गावांत मिळून सव्वा कोटीची कामे पूर्ण झाली. सर्वांचे योगदान लाभल्यास कामाची गती वाढण्यास मदत होते, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. कसबा भागातील मुस्लिम समाजाच्या जमातखान्यासाठी अल्पसंख्याक निधीतून दहा लाख खर्चाच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी राजळे बोलत होत्या.

नगर-मनमाड मार्गावर बैलगाडीला भरधाव कारची धडक.

राहुरी :- डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला स्विफ्ट कारची धडक बसल्याने ऊसतोड मजूर दाम्पत्य गंभीर जखमी झाले. जखमींना प्रवरानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नगर-मनमाड मार्गावरील जोगेश्वरी आखाडा परिसरात बुधवारी सायंकाळी हा अपघात झाला. अपघातात कारचा झाला चक्काचूर… शिवाजी किसवे व त्यांची पत्नी राधाबाई (टाकळीमानूर, तालुका पाथर्डी) हे उसाची वाहतूक करणारे … Read more

शिवाजी महाराजांवर आज व्याख्यान

अहमदनगर :- शिवाजी महाराज – द मॅनेजमेंट गुरू या विषयावर प्रा. नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान रविवारी (६ जानेवारी) संध्याकाळी ५ वाजता सावेडीतील माउली सभागृहात आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती निखिल आरू यांनी शुक्रवारी दिली. ट्रान्सफॉर्मिंग नगरच्या वतीने तरुणांसाठी या व्याख्यानाचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे.

लवकरच नगरला ३०० कोटी मिळणार !

  अहमदनगर – सरकार महापौरांच्या पाठीशी असून मनपाला ३०० कोटी देणार आहोत. नगरला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. आगामी काळातील लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दानवे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी ३६ मतदारसंघांत दौरे केले आहेत. बुथस्तरापासून संघटन करण्याचा त्यांचा उद्देश आहे. आम्ही जेथे शब्द दिले ते पाळले आहेत.शुक्रवारी … Read more

क्षुल्लक कारणावरून दोन दुचाक्या जाळल्या.

अहमदनगर :- लहान मुलांचा गाडीला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून शहरातील वंजारगल्ली भागात शुक्रवारी दुपारी युवकांंच्या दोन गटांत धुमश्चक्री झाली.वाद वाढत गेल्याने संतप्त जमावाने दोन दुचाक्या जाळल्या. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दंगलीत सहा जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. वंजारगल्ली भागात दुपारच्या सुमाराला लहान मुलांचा … Read more

आमदार संग्राम जगतापांची आम्हाला किव येते !

अहमदनगर :- सोधा राजकारणासाठी समाजाचा विसर पडलेल्या आमदारांनी पक्षनिष्ठा वेशीवर टांगली आहे. आम्हाला झोपडपट्टीवासीयांचा पक्ष म्हणून हिणवणाऱ्या आमदारांचीच आम्हाला किव येते, अशी टीका शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी राष्ट्रवादीचे नाव न घेता केली. सातपुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. ‘सोधा राजकारणासाठी आमदारांनी … Read more

पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास सक्तमजुरी.

अहमदनगर :- ऑगस्ट २०१७ मध्ये कुरणदरा (ता. राहुरी) येथे पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने आरोपीला ७ वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.  गोपीनाथ नाथू केदार (३८, कुरंदरा शेरी चिखलठाण, ता. राहुरी) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी गुरुवारी दुपारी हा निकाल दिला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे … Read more