अहिल्यानगर जिल्ह्याला मिळणार आणखी एक आमदार ? थेट दिल्लीत चर्चा..

Ahilyanagar News : महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागल्यानंतर विधान परिषदेच्या रिक्त जागांच्या चर्चा सुरु झाल्या. विधान परिषदेचे सहा आमदार विधानसभेत निवडून आल्याने त्यांच्या जागा रिक्त झाल्या. याशिवाय राज्यपाल नियुक्ती ५ जागाही भराव्या लागणार आहेत. म्हणजे सहा अधिक पाच अशा अकरा रिक्त जागांसाठी विधान परिषदेवर मागच्या दाराने आमदार होण्याची संधी आहे. आता याच रिक्त जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भरण्याचा मोठ्ठा गेम महायुती करु शकते. कारण नाराजांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले तर, स्थानिक स्वराज्य संस्थेत बाजी मारणे सोप्पे जाईल, हा महायुतीचा प्रयत्न आहे. ११ पैकी सहा जागा पक्षांच्या हातात आहेत. त्यात चार जागा भाजपच्या, एक जागा शिंदे गटाची तर एक जागा अजित पवार गटाची अशा जागा रिक्त आहेत. भाजपच्या याच रिक्त जागेवर नगर जिल्ह्यातील विवेक कोल्हे यांचे नाव सध्या चर्चेत आले आहे. कोल्हेंना संधी का मिळेल..? विवेक कोल्हे महत्त्वाचे का आहेत..? भाजपच्या डोक्यात काय आहे..? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न…

हा संपूर्ण व्हिडीओ