भारतीय ग्राहकांसाठी आजचा स्मार्टफोन केवळ बोलणे आणि मेसेज पाठवण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, ग्राहकांना आता कॅमेरापासून स्टोरेजपर्यंत सगळं काही दमदार हवं असतं. विशेषतः जर तुम्हाला उत्तम फोटोग्राफी आवडत असेल, तर 200 मेगापिक्सेल कॅमेराचे स्वप्न आता फक्त महागड्या फोनपुरते उरलेले नाही. 25,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्येही असे फोन उपलब्ध झाले आहेत जे डीएसएलआरसारखी फोटो क्वालिटी, 4K व्हिडिओ, OIS, जलद चार्जिंग आणि आकर्षक डिझाइनसह येतात.

Redmi Note 13 Pro 5G
सर्वात आधी नाव घ्यावं लागेल Redmi Note 13 Pro 5G या फोनचं, जो सध्या Flipkart वर तब्बल 6,300 रुपयांच्या सूटनंतर फक्त 19,699 रुपयांना विकला जात आहे. त्यात 200MP चा OIS सह प्रायमरी सेन्सर दिला आहे, जो फोटोसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो लेन्ससह हा ट्रिपल कॅमेरा सेटअप तुम्हाला विविध प्रकारच्या फोटो शॉट्समध्ये मदत करतो. सेल्फीसाठीही 16MP कॅमेरा आहे. यामध्ये MediaTek Dimensity 7200 Ultra प्रोसेसर आहे जो स्पीडसह मल्टीटास्किंगसाठी परिपूर्ण आहे.
Honor 90 5G
दुसरा पर्याय म्हणजे Honor 90 5G. सुरुवातीला 29,999 रुपयांमध्ये लाँच झालेला हा फोन आता सवलतीनंतर 24,999 रुपयांत उपलब्ध आहे. यात Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरसह 6.7 इंचाचा क्वाड कर्व AMOLED डिस्प्ले मिळतो. 120Hz रिफ्रेश रेट आणि 1600 निट्स ब्राइटनेस यामुळे स्क्रीन अनुभव खूपच शानदार होतो. 200MP प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP डेप्थ कॅमेरा यामध्ये दिले आहेत. विशेष म्हणजे, 50MP चा फ्रंट कॅमेरा असलेला हा फोन व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी जबरदस्त ठरतो. यात 66W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देखील आहे.
Galaxy S24 Ultra 5G
सॅमसंगप्रेमींसाठी Galaxy S24 Ultra 5G हा एक उत्कृष्ट पर्याय आहे, त्याची किंमत 91,000 रुपये आहे. Samsung च्या अधिकृत साईटवर तो 1,19,999 रुपयांचा आहे, त्यामुळे Amazon वर सध्या मिळणारी 28,999 रुपयांची थेट सूट लक्षवेधी आहे. या फोनमध्ये 200MP चा कॅमेरा, दोन टेलिफोटो लेन्स, आणि जबरदस्त 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. त्याशिवाय सर्कल टू सर्च आणि AI नोट असिस्टसारखी वैशिष्ट्यं त्याला आणखी खास बनवतात. Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेट आणि 12GB RAM मुळे परफॉर्मन्समध्येही तो मागे नाही.
जरी Galaxy S24 Ultra हा प्रीमियम पर्याय असेल, तरी Redmi Note 13 Pro 5G आणि Honor 90 5G हे बजेट-अनुकूल मॉडेल्स सुद्धा अतिशय चांगले पर्याय आहेत. कमी किमतीत अधिक फीचर्स, DSLR-सरखी फोटो क्वालिटी आणि जबरदस्त परफॉर्मन्स हवे असल्यास, हे फोन सध्या बाजारात सर्वोत्तम ठरू शकतात.