जर तुम्हाला सतत फोन चार्ज करत बसण्याचा कंटाळा आला असेल आणि तुम्हाला एक असा स्मार्टफोन हवा असेल जो संपूर्ण दिवस काय, तर दोन दिवसही सहज चालेल, तर 7000mAh किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेची बॅटरी असलेले स्मार्टफोन तुमच्यासाठी योग्य ठरतील. आजच्या घडीला बाजारात असे बरेच स्मार्टफोन उपलब्ध आहेत, जे फक्त मोठी बॅटरीच नाही, तर जबरदस्त परफॉर्मन्स, आकर्षक डिझाइन आणि दमदार फीचर्ससह येतात. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही स्मार्टफोन मॉडेल्सबद्दल, जे तुमचं चार्जिंगचं टेन्शन पूर्णपणे दूर करू शकतात.
iQOO Neo 10

iQOO Neo 10 हा फोन त्याच्या प्रचंड 7000mAh बॅटरीसाठी ओळखला जातो. इतकी मोठी बॅटरी असूनही त्यात 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे, ज्यामुळे फोन केवळ काही मिनिटांत चार्ज होतो. याचा बेस व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 31,999 रुपयांना उपलब्ध आहे. जर तुम्हाला आणखी जास्त स्टोरेज हवा असेल तर टॉप व्हेरिएंट 40,999 रुपयांत मिळतो.
Realme GT 7
Realme GT 7 देखील या यादीत एक उत्तम पर्याय मानला जातो. यात 7000mAh बॅटरी असून 120W चार्जिंगसह हा फोन ऊर्जा आणि गती दोन्हीचा संगम आहे. याचा 8GB + 256GB व्हेरिएंट 39,999 रुपयांत मिळतो.
Vivo T4 5G
Vivo T4 5G हा फोन खासकरून त्याच्या 7300mAh बॅटरीसाठी चर्चेत आहे. यामध्ये 90W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे, जो या रेंजमध्ये फारच कमी फोन्समध्ये मिळतो. त्याची किंमत 21,999 रुपयांपासून सुरू होते आणि अधिक स्टोरेज असलेला टॉप व्हेरिएंट 25,999 रुपयांना विकला जातोय.
Oppo K13 5G
Oppo K13 5G हा फोन 7000mAh बॅटरी आणि 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह येतो. हा फोन खासकरून बजेटमध्ये उत्तम बॅटरी बॅकअप शोधणाऱ्यांसाठी योग्य आहे. बेस व्हेरिएंट 17,999 रुपयांत मिळतो, तर 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 19,999 रुपयांना उपलब्ध आहे.
iQOO Z10 5G
iQOO Z10 5G हा फोनसुद्धा 7300mAh बॅटरी आणि 90W चार्जिंगसह एक पॉवरहाऊस मानला जातो. याची सुरुवातीची किंमत 21,999 रुपये असून टॉप व्हेरिएंट 25,999 रुपयांना बाजारात उपलब्ध आहे.
जर तुम्हाला मोठा बॅटरी बॅकअप हवा असेल आणि चार्जिंगची कटकट टाळायची असेल, तर हे स्मार्टफोन नक्कीच तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतात. त्यातही फास्ट चार्जिंगमुळे केवळ मोठी बॅटरीच नव्हे, तर वेळेचीही बचत होते.